मुंबई उभी राहण्यामागे अमेरिका आणि विदर्भाच्या कापसाचे गृहयुद्ध होते.

अमेरिकेत १८६१ ते १८६५ गृहयुद्ध सुरु झाले.आणि त्या गृहयुध्दाने मुंबई उभी केली आणि या सगळ्यामागे होता विदर्भाचा कापूस.

कापूस म्हटले की महाराष्ट्रात मराठवाडा विदर्भामधला जिव्हाळ्याचा विषय. भारतात महाराष्ट्र व गुजरात हे दोन राज्य कापूस उत्पादनाच्या बाबतीत सर्वात पुढे आहे. विदर्भात तर कापूस हा आजवर जगण्याचा आणि मारण्याचा विषय ठरलाय. कापूस म्हणजे अंग झाकणारा ,जखम झाल्यानंतर रक्त थांबवणारे वाण.

तर असं हे कापूस  एका बलाढ्य देशाला गृहयुध्दास सामोरं जायला भाग पाडू शकते हेच त्या कापसाप्रमाणे सफेद झूट वाटणारे ठरू शकते. मात्र अमेरिकेच्या सोळाव्या राष्ट्राध्यक्षाला संपवायला कापूस कारणीभूत होता.

अमेरिका म्हणजे कापसाच्या जीवावर अर्थव्यवस्था टिकून मोठा होत गेलेला देश.

अमेरिकेने युद्ध करून ब्रिटिश वसाहतकारांना घालवून दिले. परंतु ब्रिटिशांनी घालून दिलेल्या परंपरेला तसेच चालू ठेवले होते. त्या काळातील अमेरिकेच्या दक्षिण भागातील वसाहतीमध्ये आफ्रिकेमधील कृष्णवर्णिय लोक ब्रिटिशांनी मजुरी करायला गुलाम म्हणून आणले होते. ब्रिटिशाना हाकलून लावल्या नंतरही अमेरिकेच्या शेत मालकाने कृष्णवर्णियांना गुलाम म्हणून कायमच ठेवले होते.

देशाची अर्थव्यवस्था व शेती कापसावर अवलंबून असलेल्या अमेरिकेने व्हर्जिनिया , जॉर्जिया या राज्यातील सुपीक जमिनीच्या कापूस पिकासाठी त्यांची गुलामगिरी व शोषण चालूच ठेवले होते.साधारणता तेव्हा अमेरिकेत माणूसपण हरवलेले पंधरा लाख आफ्रिकन गुलामगिरी करत होते.

पश्चिम महाराष्ट्रात जसा ‘ऊस’ तस अमेरिकेच्या दक्षिण राज्यात ‘कापूस’ नगदी पीक व सधनतेसाठी महत्वाचा होता.

यामधूनच अमेरिकेच्या उत्तरेकडून रोष निर्माण व्हायला लागला. या रोषाचे रूपांतर सुरु झाले ते अमेरिकेतल्या दक्षिण राज्याशी लढायला. आणि सुरु झाला यादवी युद्धाचा आरंभ. अमेरिकेतल्या उत्तरेकडील शोषणाच्या विरोधात उभी राहिलेली राज्य अमेरिकेतल्या दक्षिण राज्यातील सुरु असलेल्या शोषणाला थांबवायला युद्धभुमीकेत घेऊन गेली.

अमेरिकेत गृहयुद्ध सुरु झाले. आणि ब्रिटनला अमेरिकेतून होणाऱ्या कापसाची निर्यात बंद झाली.

गृहयुद्धापूर्वी ब्रिटन भारताकडून केवळ २० टक्के कापूस आयात करत होता. मात्र आता त्यांची गरज वाढली होती.अमेरिका सर्वात जास्त कापूस उत्पादन करणारा देश गृहयुद्धात अडकला होता आणि मागणी व कापसाची कमतरता निर्माण होताच कापसाच्या किंमती गगनाला भिडल्या होत्या. याच परिस्थितीचा फायदा घेत मुंबईतील काही व्यापाऱ्यांनी गुजरातच्या शेतकऱ्यांना कापूस पिकवण्यास सुरवात करायला गळ घातली.

शेतकऱ्यांनी प्रतिसाद देताच ही तफावत अवघ्या काही महिन्यात भरून निघाली.(परिस्थिती बघून शेतीत पीक काढण्याची ही कला गुजराथी लोकांकडुन शिकण्यासारखी आहे.गुजरात जगातील कापसाची मागणी बघून या उत्पादनात उतरला आणि आज गुजरात देशात कपडा व्यापारात महत्वाचे स्थान निर्माण करण्यास पण पुढे गेला.) व मुंबई हे कापूस निर्यात करणारे केंद्र ठरले.

विदर्भ व गुजरातचा कापूस मुंबईतून निर्यात व्हायला सुरवात होताच मुंबई हे रोजगाराचे केंद्र बनत गेली.

हाच काळ होता तो मुंबईची लोकसंख्या झपाट्याने वाढवण्यास कारणीभूत ठरला. कापसाने भूमिहीन लोकांना मुंबईतून रोजगार निर्माण करून दिला होता. मुंबईची किंमत वाढली होती. कापसाच्या व्यापाराला बघून अनेक कुशल कारागीर व उद्योजक मुंबईकडे येण्यास सुरु झाले.

मुंबई आधुनिक शहर म्हणून उभे राहाले. गृहयुद्ध संपेपर्यंत एकट्या मुंबईने ७० दशलक्ष पाउंड इतकी कमाई फक्त कापसाच्या व्यापारावर काळात केली होती. मुंबई देशभरातील लोकांना खेचून आणणारी मायानगरी बनत गेली.

१८६१ ते १८६५ पर्यंत चाललेल्या या युद्धात उत्तर अमेरिकेच्या राज्यांचा विजय झाला. पांढऱ्या सोन्याच्या (कापूस) कारणाने काळ्या चेहऱ्याच्या लोकांना आपले स्वातंत्र्य व हक्क मिळवता आले.

गृहयुद्धाच्या संकटातून अमेरिकेला बाहेर काढणारे शोषणाची ,गुलामगिरीची प्रथा संपवणारे लिंकन मात्र याच शोषण आणि गुलामगिरीच्या प्रेमात असलेल्या लोकांकडून मारले गेले.  एक संवेदनशील वकील, एक लोकप्रिय राष्ट्राध्यक्ष रिपब्लिकन पक्षाकडून सत्तेत आला.स त्तेत असलेला पूर्ण काळ अमेरिकेने गृहयुद्धात घालवला गृहयुद्ध संपताच लिंकन यांना जगतातून निरोप घ्यावा लागला.

एवढं सगळ एका कापसामुळे घडलं.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.