‘बधाइ दो’ मुळं चर्चेत आलेलं ‘लॅव्हेंडर मॅरेज’ हे नक्की काय प्रकरण आहे.

राजकुमार राव, आयुषमान खुराणा, भूमी पेडणेकर ,गजराज राव आणि नीना गुप्ता या सगळ्यांच्या पिक्चरचा विषयच आजकाल जरा हटके असतोय. मग ते जोर लगा के हैशा मधला बॉडी शेमिंगचा विषय असू दे की बाला मधला किंवा  शुभमंगल सावधान मधला इरेक्टाइल डिसफंक्शनचा असू दे कि बधाई हो मधला वयस्कर कपलचा मुलं होऊ देण्याचा विषय सोसायटीनं टॅबू मानलेल्या या विषयांवर या कलाकारांनी बरोबर भाष्य केलं.

आता बधाई -२ म्हणजेच बधाई दो च्या निमित्ताने राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर असाच एक नवीन विषय हाताळताना दिसणारा आहेत.

तर तो विषय आहे लॅव्हेंडर मॅरेजचा. आता पिक्चरमध्ये कोण काय करतंय हे तर तुम्ही बघालाच त्यामुळं आपण डायरेक्ट आपल्या मुद्यावर येऊ.

तर ह्या लॅव्हेंडर मॅरेजचा विषय आहे LGBTQ समुदायाशी निगडित.

आर्टिकल ३७७ मधून समलैंगिकता हा एक क्राइम म्हणून वगळला जाऊनही समाज समलैंगिक जोडप्यांना मान्यता द्यायला तयार नाहीये. समलैंगिक जोडप्याच्या लग्नाला सरकारपण विरोध करतंय.

आता हे झालं समाज आणि सरकारचं पण घरचे तरी कुठे समलैंगिकतेला मान्यता द्यायला तयार आहेत. त्यामुळं इंटरकास्टला तयार नं होण्याऱ्या माता-पित्यांना समलैंगिकतेवर तयार करणं लांबच राहिलं.

मग शेवटी पोरं-पोरी अशी काय ट्रिक करतेयत की घरच्यांना मान्य करण्याशिवाय पर्यायच नसतोय.

लॅव्हेंडर मॅरेज अशीच एक ट्रिक समजा. जेव्हा एकाद्या गे मुलाला किंवा लेस्बियन मुलीला घरचे लग्नासाठी फोर्स करतेयत तेव्हा ते पार्टनर तर ऑपोझिट जेंडरचा निवडतात पण तो ही समलैंगिक. म्हणजे लेस्बियन मुलीला जबरदस्तीने लग्न करावं लागत असेल तर ती गे मुलगा शोधते. आणि वाइस व्हर्सा.

मग एकदा का लग्न झालं की दोघं आपापल्या लैंगिकतेनुसार संबंध ठेवण्यास स्वतंत्र.

म्हणजे समाजाच्या डोळ्यात जरी ते नॉर्मल नवरा बायको म्हणनू राहत असले तरी पर्सनल आयुष्यात ते आपली समलैंगिकतेची ओळख जपत असतात. 

तशी हि कॉन्सेप्ट जुनीच आहे. आता पुढारलेलं म्हणून दाखवत असलेले अमेरिका-युरोपातील देश हें एकेकाळी समलैगिंकतेला जोरदार विरोध करत असंत. त्यामुळं तिथे जुन्या काळात सेलिब्रिटी अशी लग्न करत असत. 

आजही समलैंगिकता मान्य नसल्याने अनेक पोरं-पोरींना त्यांच्या लैंगितेविरोधात जाऊन लग्न करावं लागतं आणि आयुष्यभर जे ते नाहीत तेच जीवन जगावं लागतं. त्यामुळं अशा लोकांसाठी ही लग्न वरदान ठरू शकतात असं काहींचा म्हणणं आहे. त्यामुळं अशा संकल्पनांचा अजून प्रचार व्हावा असं त्यांचं म्हणणं असतं.तर अशी लग्न मान्य ना करता समलैंगिकांनी मोकळेपणाने आपली ओळख सांगावी असं सांगणारीही काही मंडळी आहेत. समलैंगिकता हे नैसर्गिक असल्याचा त्यांचं म्हणणं असतं. 

आता कोणी आपल्या खाजगी आयुष्यात काय करावं आम्ही सांगणार नाही. बाकी या लग्नावर तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर खाली कमेंट करून जरूर सांगा.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.