वाढीव कांती शाहनं अजरामर गुंडा पिक्चरसाठी सेन्सॉर बोर्डला गंडवलं होतं…

‘मेरा नाम है बुल्ला… रखता हूँ खुल्ला’ तुम्ही म्हणाल भिडू येड लागलंय काय? शिव्या कशाला देतोय? तर भिडू लोक, हा आहे डायलॉग, तेही ऐतिहासिक गुंडा पिक्चरमधला.

गुंडा पिक्चर ना ऑस्करला गेला, ना त्याला फिल्मफेअर मिळालं, मिरची आणि पान पसंद अवॉर्ड्समध्येही हा पिक्चर कुठंच नाहीये. पण तरीही हा पिक्चर ऐतिहासिक आहे. याची स्टोरी, याचे डायलॉग्स, यातले कॅरॅक्टर्स हा लय डीप आणि नाद विषय आहे.

हा पिक्चर बनवणाऱ्या कांती शाहची स्टोरी पण लय वाढीव आहे, पण ती नंतर कधीतरी… आज आपला विषय आहे गुंडा. या पिक्चरमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्यांनी नंतर सांगितलं होतं, की या पिक्चरची स्क्रिप्टच तयार नव्हती. पण तरीही यातले डायलॉग्स सगळ्या जगाच्या पाठीवर गाजले.

वाह! खोटे सिक्के ने क्या बात बोली है, बोली है तो ऐसी बोली है, जैसे बंदूक की गोली है…

लोड नका घेऊ, हा पण डायलॉग आहे. या पिक्चरमध्ये सायकल मागं लपून गोळी चुकवणारा मिथुन होता, बुल्ला या खुंखार नावाचा मुकेश रिषी होता, शक्ती कपूरचं नाव होतं चु*या (मस्करी नाही भिडू खरंच), आपले मराठमोळे हिरे मोहन जोशी आणि दीपक शिर्केही या पिक्चरमध्ये होते आणि एक वाढीव कॅरॅक्टर होतं, हरीश पटेलचं… त्याच्या नावाचाही एक खास डायलॉग होता…

मेरा नाम है इबू हटेला, मा मेरी चुडैल की बेटी, बाप मेरा शैतान का साला, खायेगा केला?

पिक्चरची स्टोरी सांगून आम्ही काय तुमचा रसभंग करणार नाय. कारण ‘गुंडा’ हा अनुभवण्याचा विषय आहे. आता त्यात फक्त डायलॉगच वाढीव आहेत, असं नाय.. तर काय काय सिन पण डेंजर आहेत. आता बुल्ला आणि चु*या नावाची कॅरॅक्टर्स असतील, तर वाढीवपणा लक्षात येतोच.

आता हा असला पिक्चर सेन्सॉर बोर्डकडून पास कसा काय झाला, हा एक गंभीर प्रश्न आहे. तर त्यामागं होती, कांती शाहची डोकॅलिटी.

नियमानुसार कांती भाऊंनी, पिक्चर सेन्सॉर बोर्डाला पाठवला. त्यातले डायलॉग, सीन्स आणि लोकांची नावं बघूनच सेन्सॉर बोर्डच्या फ्युजा उडाल्या असणार. गार पडलेल्या बोर्डानं कांतीभाऊंना सांगितलं.. ‘भावा हे घे ४० कट्स, हे कट्स कर तरच आम्ही तुला ॲडल्ट सर्टिफिकेट देऊ.’ कांतीभाऊंनी कट्स-बिट्स करुन पिक्चर पाठवला आणि पुढं पिक्चर सगळीकडे रिलीझही झाला.

मुंबईतल्या काही पोरी पिक्चर पाहायला गेल्या. त्यातले डायलॉग्स आणि बाकी मटेरियल बघून त्या हँग झाल्या. त्यांनी सेन्सॉर बोर्डला पत्र लिहिलं आणि विचारलं की, असा स्त्री विरोधी पिक्चर तुम्ही रिलीजच कसा काय केला. बोर्ड वाल्यांनी थिएटरमध्ये जाऊन बघितलं, तर कट न केलेला पिक्चर. आता सेन्सॉर बोर्ड वाल्यांच्या बत्त्या डीम व्हायची वेळ आली. त्यांनी जरा शोध घेतला आणि त्यांना कांतीभाऊंची डोकॅलिटी लक्षात आली.

त्यानं स्कीम केली होती, सेन्सॉर बोर्डनं जे कट्स सुचवले होते, ते करुन पिक्चर सेन्सॉर बोर्डला पाठवला. आणि कट न केलेला पिक्चर थिएटरमध्ये लावला. सगळी पब्लिक हसून येडी झाली. कांतीभाऊ पिक्चर थिएटरमध्ये लावून थांबले नाहीत, तर त्याच्या डीव्हीडीही बनवल्या. त्यामुळं थिएटरमधून काढला, तरी त्याचं सेन्सॉर न झालेलं व्हर्जनच सगळीकडे पसरलं.

आता त्याच्या फिल्म्स चांगल्या की वाईट, हा न संपणारा वाद आहे. पण एका गुंडा पिक्चरसाठी कांती शाहचे हजार बंडल पिक्चर माफ…गुंडासाठी सेन्सॉर बोर्डाला चुना लावलेला कांती शाह पुढं सेन्सॉर बोर्डचाच अध्यक्ष बनला.  जणू काय तो म्हणाला असेल…

गुंडागिरी को खतम करने के लिये… मुझे खुद गुंडा बनना पडेगा…        

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.