सोनिया गांधी जर पंतप्रधान झाल्या तर मी टक्कल करून घेईन, सुषमांनी धमकी दिली होती

हा तो काळ होता तेंव्हाचा जेंव्हा सुषमा स्वराज यांना भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे उत्तराधिकारी मानले जात होते.जेंव्हा कर्नाटकातील बेल्लारी मतदारसंघातून यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विरोधात त्यांनी लोकसभा निवडणूक लढवल्यानंतर त्यांची उंची वाढली. मात्र, त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यावेळी सुषमा स्वराज म्हणाल्या होत्या की, जर का सोनिया गांधी पंतप्रधान झाल्या तर मी मुंडन करेन.

खरं तर हे प्रकरण १९९६ पासून सुरू होते. दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघातून सुषमा स्वराज विजयी झाल्या होत्या. त्या वेळच्या वाजपेयी सरकारमध्ये त्या माहिती आणि प्रसारण मंत्री झाल्या. त्यांनी १९९८ मध्ये १२ व्या लोकसभेत पुन्हा विजय मिळवला आणि पुन्हा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. यानंतर सुषमा स्वराज यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ सोडले आणि ऑक्टोबर ते डिसेंबर १९९८ या काळात त्या दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री झाल्या. मात्र, दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर त्या केंद्रीय राजकारणात परतल्या.

१९९९ मध्ये सुषमा स्वराज यांनी कर्नाटकातील बेल्लारी मतदारसंघातून तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विरोधात निवडणूक लढवली तेव्हा त्यांची सर्वाधिक चर्चा झाली होती. मात्र, त्या निवडणुकीत सुषमा यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. सोनिया गांधी यांना ५१.७ टक्के मते मिळाली, तर ४४.७ टक्के मते सुषमा यांच्या बाजूने होती. त्यावेळी सुषमा स्वराज एप्रिल २००० मध्ये संसदेत परतल्या. त्या उत्तराखंडमधून राज्यसभेचे खासदार म्हणून निवडून आल्या. त्यादरम्यान त्यांनी जानेवारी २००३ पर्यंत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली.

२००४ साली देशाचे पंतप्रधानपद सोनियांना मिळू नये, यासाठी केशवपन करून फरशीवर झोपण्याची धमकीही सुषमा स्वराज यांनी दिली होती.  

२००४ साल आले होते. तेंव्हा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली होती आणि सोनिया गांधी पंतप्रधान होणार असल्याच्या चर्चांना वेग आला होता. त्यावेळी सुषमा स्वराज यांचे वेगळेच रूप पाहायला मिळाले. सोनिया गांधी पंतप्रधान झाल्या तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन, अशी घोषणा त्यांनी केली होती. तसेच केस कापून मी माझे संपूर्ण आयुष्य भिकाऱ्यासारखे घालवीन. मी रंगीत कपडे सोडून पांढरे कपडे घालीन. मी जमिनीवर झोपेन आणि भाजलेले चणे खाऊन राहीन

दोघींमधला हा दुरावा कालांतराने मावळला…..

स्वत:कडे त्याचे श्रेय घेतांना स्वराज म्हणतात, शेखर गुप्तांच्या एनडीटीव्ही वरील ‘वॉक द टॉक शो’ मधे सोनियांची मुलाखत पाहिल्यानंतर, सर्वप्रथम मी सोनियांच्या निवासस्थानी गेले. संसदीय कामकाज मंत्रिपद तेव्हा माझ्याकडे अन् विरोधी पक्षाचे नेतेपद सोनियांकडे होते. त्यांची भेट घेणे मंत्री म्हणूनही माझे कर्तव्य होते. मी थेट सोनियांच्या निवासस्थानी गेले. तेव्हापासून दुरावा संपला अन् मला वाटते आज लोकसभेचे विरोधी पक्षनेते पद माझ्याकडे आल्यानंतर, तसाच प्रतिसाद मला त्यांच्याकडूनही मिळतो आहे. 

सोनिया अगोदर खूप शांत असायच्या. कधी फारसे बोलायच्या नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावर क्वचित प्रसंगीच स्मितरेषा उमटायची. परस्पर संवादाची सवय त्यांना नव्हती. आता मात्र हे चित्र बदलले आहे, अलिकडे मोकळेपणाने त्या संवाद साधतात, अशी पुष्टीही सुषमांनी जोडली होती.

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.