पोलीस न वाटणारा पोलीस अधिकारी !

सिंघम पोलीस अधिकारी वाटण्यासाठी काय असावं लागतं तर पिळदार मिश्या. अमुक इंचाची छाती. सहा फुट उंची. पिळदार शरीर आणि डोळ्यांवर रेबॅनचा गॉगल. या सगळ्या गोष्टी जमल्या तर तो होतो सिंघम पोलीस अधिकारी.

पण सध्या महाराष्ट्रात अशा एका अधिकाऱ्याची हवा आहे ज्याच्याकडे यापैंकी काहीही नाही तरी त्यांचा उल्लेख आदराने केला जातो. त्यांच नाव घेतलं तर गुन्हेगारांना मोक्का आणि तडीपार शब्द आठवतात. तरुणांना सिंघम वाटतो तर सामाजिक भान जपणाऱ्यांना वर्दीतला एक सच्चा माणूस  वाटतो.

असा सच्चा माणूस म्हणजे सातारचे पोलीस अधिक्षक संदिप पाटील !

संदिप पाटील यांच गाव वाळवा तालुक्यातील येलूर. ते सातारच्या सैनिक स्कूलला शिकले. त्यानंतर त्यांनी NDA मध्ये प्रवेश घ्यायचं ठरवलं. पण फिजीकलमधून ते बाहेर पडले. नंतर इस्लामपूरच्या कॉलेजमधून इंजिनीयर झाले. पुढं प्रशासनात जायचं म्हणून दिल्ली गाठलं. पास झाले. IPS झाले आणि महाराष्ट्र केडर मिळालं. दरम्यान लव्ह मॅरेज देखील झालेलं.

कुठही आपल्या परस्थितीच केललं ग्लोरिफिकेशन नाही. माझा प्रवास, मी अधिकारी कसा घडलो सांगणाऱ्यांच्या गर्दीत एक अधिकारी आपणाला सांगतो, मी काय घडवलं !!!

ते आले, त्यांनी पाहीलं आणि त्यांनी जिंकलं याप्रमाणे या माणसांने ठरवल्याप्रमाणे केलं. या प्रवासापर्यन्त आदर्श वाटणारी अनेक माणसं पुढं रस्ता चुकतात पण संदिप पाटलांचा रस्ता पक्का होता.

त्यांनी प्रशासनात येवून त्यांनी एक भारी काम केलं.

वयाच्या २६ वर्षी त्यांना चंद्रपुरमध्ये पहिलं पोस्टिंग मिळालं. पोस्टिंगच्या पहिल्याचं दिवशी काय झालं तर धमकी देणारी एक हजार पत्र ऑफिसला आली. नक्षलवादी भागात या घटना सामान्य. पण संदिप पाटलांनी त्या माणसांना शोधून काढलं आणि त्यांच्यावर कारवाई केली. नोकरीच्या पहिल्याच दिवशी लक्षात आलं संदिप पाटील हे अजब रसायन आहे.

पुढे परभणीचे अधिक्षक म्हणून काम करत असताना त्यांनी गडचिरोली जिल्हा आग्रह करुन घेतला. पहिले मराठी अधिक्षक म्हणून गडचिरोली जिल्ह्याला पोलिस अधिक्षक मिळाले. पहिल्यांदा अशीच त्यांची ओळख निर्माण झाली पण पुढे त्यांच काम संदिप पाटील कोण आहेत ते सांगण्यासाठी पुरेसं बोलकं ठरलं.

संदिप पाटलांनी गडचिरोलीची जबाबादारी घेतली. नक्षलवादी भागात भूसुरंग पेरल्यामुळे होणाऱ्या पोलिसांची संख्या मोठ्ठी. संदिप पाटलांच्या काळात हि संख्या शून्यावर आली. २०१४-१५-१६ मध्ये भूसुरंग पेरल्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्या पोलिसांची संख्या आहे शुन्य. त्याचं महत्वाच कारण म्हणजे CRPF प्रमाणे त्यांनी पोलीस खात्यात IED अर्थात भूसुरंग शोधण्यासाठी खास पथक तयार केले. त्यासाठी ६० पोलिस स्टेशन त्यांनी ट्रेन केले.

नक्षलवादी भागात संदिप पाटलांनी केलेली दुसरं महत्वाचं काम म्हणजे लोकशाहीची पेरणी.

नक्षलवादी भागात त्यांनी आत्मसमर्पण योजना चालू केली. लोकांचा विश्वास संपादन केला. त्यातूनच १०९ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. हाच आकडा पुढे वाढत गेला. त्यांच्या काळात तब्बल १७४ नक्षलवाद्यांना बंदुका टाकून पुन्हा समाजात येता आलं. त्यांना जमिनी देण्यात आल्या.

याच काळात राज्यात निवडणुकांचे पडघम वाजू लागले. राज्यात निवडणुका शांततेत होवून द्यायच्या असतील तर गडचिरोलीत विशेष खबरदारी घ्यावी लागते. संदिप पाटील यांनी या काळात तब्बल २५० किलो RDX चा साठा पकडला. या काळात एकाही पोलिसाचा मृत्यू झाला नाही. निवडणुका शांततेत पार पडला.

म्हणूनच एका बैठकीत स्वत: निवडणूक आयुक्त संदिप पाटलांना म्हणाले, “YOU ARE THE STAR OF MAHARASHTRA”

अशा या माणसातल्या अधिकाऱ्याची सातारा अधिक्षक म्हणून बदली झाली. साताऱ्यात येताच संदिप पाटलांनी आवाहन केलं, बुके नको बुक द्या !!!

सातारकरांना देखील जाणिव झाली, काहीतरी खास आहे मोठ्या उत्साहाने माणसं त्यांना भेटू लागली. पुस्तक भेट देवू लागली. त्यातून गोळा झालेली तब्बल पाच ते सहा हजार पुस्तक या माणसाने ज्ञानाची शिदोरी म्हणून गडचिरोलीला पाठवून दिली.

एकीकडे सातारा जिल्हा गुन्हेगारीमुक्त जिल्हा करण्यासाठी त्यांनी कंबर कसली तर दुसरीकडे पोलिसांना स्मार्ट करण्यासाठी डोकं चालवण्यास सुरवात झाली.

साताऱ्यातील गुन्हेगारांवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई होवू लागली. त्यांच्या काळात विक्रमी अशी कारवाई करण्यात आली आहे. गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यात यश मिळालं. त्याचसोबत जिल्ह्यातील ३७ पोलिस ठाणी स्मार्ट करत साताऱ्याला पहिला स्मार्ट पोलिस जिल्हा बनवण्याच काम त्यांनी केलं.

संदिप पाटील सगळ्याच पातळ्यांवर  हिरो होते. खरा दबंग, खरा सिंघम जो असाच असतो. इतक्यात बातमी आली संदिप पाटलांची बदली झाल्याची. आत्ता संदिप पाटील पुणे ग्रामिणला जात आहे. साताऱ्यात बदली रद्द व्हावी म्हणून लोकांनी ठिय्या आंदोलन चालू केलय.

शांततेत काम करणाऱ्या अधिकाऱ्यासाठी लोकं रस्त्यावर येण्याची दुर्मिळ गोष्ट असते. संदिप पाटलांमुळे ते घडतय. यात सर्व गोष्टी आल्या.

15 Comments
 1. Sunil Nannaware says

  JAY HIND Sir

 2. Sunil Nannaware says

  God in man.jay Hind

 3. Anonymous says

  Jay hind

 4. Anonymous says

  Jay Hind sir…U r the ideal as well as real hero of Police Department

 5. Anonymous says

  jay hind sir .welcome to pune rural sir….u r the hindustani ideal and real hero of police department.

 6. Anwar says

  खूप सुंदर सर
  मुंबई ला पन गरज आहे सिंघम ची

 7. Asmita mangesh chatte says

  Khup chan kam krtay sir tumhi ….

 8. Hari Narayan Singh says

  Ex sub Major HN Singh. I appreciate such officer who is realy a mssion in his life .He has aim and objective of life . Congts .

 9. Pravin says

  1 No.. Bhav

 10. सलाम तुमच्या कामाला सर जय हिंद

Leave A Reply

Your email address will not be published.