लता दीदींच्या कठोर परिश्रम आणि रियाझामागे त्यांच्या लहानपणीची एक आठवण होती…

लता मंगेशकर म्हणजे भारतीय फिल्म इंडस्ट्रीला पडलेलं एक सुरेल स्वप्न. गाणं आवडणाऱ्या प्रत्येकाला सुन्न होणं काय असतं ते आज कळलं. शांततेला आवाज नसतो असं कितीही म्हणलं, तरी आजच्या शांततेला लतादीदींचा आवाज आहे, हे आपल्यातलं कुणीच नाकारू शकत नाही. आपलं वय किती आहे, आपण किती लोकांची गाणी ऐकली, आपल्याला हिप-हॉप, शास्त्रीय संगीत यातलं काय आवडतं यानी फरक पडत नाही. आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर लतादीदींचं गाणं आपल्याला साथ देतं आणि देत राहील, कारण आवाज ही सगळ्यात भारी आठवण असते…

लता दीदींना दैवी आवाजाची देणगी लाभली होतीच. पण त्यांच्या ज्या सुराने संपूर्ण जगभराला वेड लावलं त्या मागे त्यांची प्रचंड मेहनत देखील होती. त्यांच्या वडिलांनी शिकवलेली मेहनत.

लता दीदी या  सर्व भावंडात थोरल्या असल्यानें त्यांना वडिलांचा सहवास साहजिकच अधिक मिळाला.

वडिलांनी त्यांच्या कुठल्याच भावंडाना राग आला म्हणून मारहाण केली नाही. कुठलीही गोष्ट अडली नाही तर केवळ ते रागाने त्यांच्याकडे पाहत. त्यामुळे या सगळ्यांना आपली चूक लगेच लक्षात येई.

तर ते लाडाने आशाला ‘आशू’ आणि  उषाला ‘उखा’ अशा नावाने नेहमी हाक द्यायचे.

लता दीदींचे पहिले शिक्षक हे  दीनानाथ मंगेशकरच होते. लहानपणापासून त्यांनी आपल्या मुलाला गायनाचे शिक्षण दिले. हातात तंबोरा धरून पुनिया-धनश्री रागातील ‘हे सदारंग’ गायला लावून लतादीदींच्या गायनकलेचा श्रीगणेशा त्यांनी केला. 

तसेच मुलांची भाषा शुद्ध असावी असा आग्रह सुद्धा आग्रह होता. त्यासाठी त्यांनी संस्कृत शिक्षकांची मुद्दामहून नेमणूक केली होती. 

त्यांनी आपल्या वडिलांना वत्सल पिता, जबाबदार कुटुंबप्रमुख, नाटककंपनीचे मालक, ज्येष्ठ नायक नट, कलंदर कलावंत आणि लहान मुलासासारखा निरागस, निर्मल मनाचा अशी व्यक्तिमत्वे त्यांच्यात एकवटलेली असल्याचे लतादीदी सांगतात. तसेच अशा थोर पित्याच्या पोटी जन्म घेण्यासाठी भाग्य लागत ते मला लाभले असे सुद्धा त्या लिहून ठेवतात.

दीनानाथ मंगेशकर हे लता दीदी आणि त्यांच्या बहीण मीनाला गाणे शिकविले. त्यांचे गायनाचे पहिले गुरु हे त्यांचे वडील होते. ते दोघीनांही रोज जवळ बसवून गायनाचे रियाज घेत. मात्र लतादीदी काहीशा आळशी होत्या. त्यांना वडील घेत असलेला गाण्याचा रियाज टाळायचा असायचा. त्यासाठी ते वेगवेगळी कारणे देत. मात्र एकदा रियाज टाळण्यासाठी दिलेले कारण हे त्यांच्या चांगेलच अंगलट आले होते. त्याचा हा किस्सा.

ते रोज सकाळी दोन्ही बहिणींना जवळ घेऊन बसत आणि गायला लावत. नेहमी प्रमाणे दीनानाथ मंगेशकरांनी यांनी लतादीदींना रियाज करण्याची आठवण करून दिली. लतादीदींना एका जागी स्थिर बसून गाण्याचा कंटाळा यायचा. एकदा आपल्या स्वभावाप्रमाणे लतादीदींनी रियाज टाळण्यासाठी शक्कल लढविली मात्र ती उलट त्यांच्या अंगलटच आली. 

त्या दीनानाथांना बाबा म्हणायच्या. रियाज टाळण्यासाठी लता दीदी बाबांना म्हणाल्या “बाबा मी आज गाणार नाही, मला बरे नाही” बाबा म्हणाले ” काय होतय तुला, लता” लता दीदींनी तोंडाला येईल ती थाप ठोकून दिली. आणि म्हटल्या,

 ” माझ्या छातीत दुखतंय” 

दीनानाथ मंगेशकर यांना लतादीदी गाण्याचा रिअयज टाळण्यासाठी थाप मारत असल्याचे लक्षात आले होते. त्यामुळे त्यांनी लता दीदींच्या आईला बोलावून घेतले आणि सांगितलं. 

लताची छाती दुखते आहे. तेव्हा दुखऱ्या भागावर गूळ-चुन्याचा लेप लाव आणि त्यावर कागद चिकटून टाक. 

लतादीदींच्या माईनी तसा लेप लावला. तो जसा जसा सुकत चालला होता तसे अंग तडतडू लागले होते. त्याने त्यांच्या जीव गुदमरून जात होता. छातीला लावलेल्या कागद प्लास्टर तयार झाले होते. त्यांच्या खोटं बोलण्याची  चांगलीच अद्दल घडली होती.   

 त्या नेहमी सांगत की त्या दिवशी रियाज टाळण्यासाठी लढविली शक्कल आठविली की, अंगावर शहारे येतात असे सांगितले. 

 बाबांच्या शिकविण्याला ठराविक वेळ, शिस्त आणि पगारी गुरूचा हिशोबीपणा यातलं काही नव्हते. मनात येईल तेव्हा व मनात येईल तसे ते शिकवत. हातात तंबोरा घेऊन स्वतः रियाजाला बसले की आम्ही लक्ष देऊन ऐकत बसू अशी आठवण लतादीदींनी आल्या वडिलांबद्दल लिहलेल्या लेखात करून ठेवली आहे. 

भारतरत्न लता दीदींचा आवाज त्या मागची मेहनत ही पुढच्या अनेक पिढयांना प्रेरणा देत राहील यात काही शंका नाही.

हे ही वाच भिडू:

 

 

     

Leave A Reply

Your email address will not be published.