अण्वस्त्रांच्या फ्यूजा खिश्यात घेवून फिरायचं ॲटिट्यूट फक्त एकाच माणसाकडे होतं…

ब्रिगेडियर सुर्यदेव सिंहपाकिस्तानच्या अण्वस्त्रांच्या फ्यूजा खिश्यात घेवून फिरणारा माणूस. अमरिश पुरीला परवानगी घेवून आत येत ये म्हणून आत आल्यावर परत बाहेर हाकलून लावणारा माणूस. हा जेव्हा कलेक्टर असायचा तेव्हा ठाकूर इज्जतीत रहायचा. हा ठाकूर झाला की कलेक्टर लायकीवर यायचा.  

कलाकार, पात्र रंगवणं, भूमिकेत शिरणं वगैरे फालतू लाड तो करायचा नाही. तो ताठ होता आणि ताठपणेच जगला. इंग्रजांनी अडीचशे वर्ष राज्य केल्यामुळ आपला मज्जारज्जू जरा वाकलेलाच. त्याच्यावर बुक्या घालून या माणसानं तो ताठ केला. त्याची आठवण आल्यावर इतकच वाटतं साला, कुठला सनी देओल आणि कुठला सुनील शेट्टी.

या पठ्याला हिमालयाच्या टोकावर उभा केला असता ना तर पाकिस्तान मागं इराण इराकपर्यन्त सरकला असता. 

राजकुमारचा जन्म पाकिस्तानातला. तो पदवीधर वगैरे झाला आणि पोलिस खात्यात सब इन्स्पेक्टर म्हणून नोकरीला लागला. 

माहिम पोलिस स्टेशनचे सब इन्स्पेक्टर अशी त्याची ओळख होती. त्याच बरोबर किमान शब्दात कमाल अपमान करायची त्याच्यात अद्भूत शक्ती होती. एकंदरीत महाशयाची जिवनशैली पाहता त्याला सगळे म्हणायचे, “राजा तू टाकीत जा”.  माहिमच्या पोलिस स्टेशनमध्ये त्या काळात बऱ्याचशा फिल्मच शुटिंग व्हायचं. त्यामुळे दिग्दर्शक, प्रोड्युसर अशी सिनेमा संबधीत असणाऱ्या माणसांचा काही विषय झाला की त्यांचा संबध पोलिस स्टेशनशी यायचां. 

एक दिवस पोलिस स्टेशनवरती तक्रार घेवून बलदेव दुबे आले. सब इन्स्पेक्टरचा ताल आणि दिसणं पाहून त्यांनी तात्काळ त्यांना ऑफर दिली. राजकुमारच्या डोक्यात सिनेमाची हवा होतीच. तात्काळ राजीनामा देत या माणसानं पहिलाच सिनेमा लिड रोल म्हणून साईन केला. 

शाहीं बजार अस त्या सिनेमाचं नाव. तो कधी येणार, कधी शूट सुरू होणार याचा विचार करण्यातच त्यांचे दिवस जावू लागले. हिकडं तर नोकरी सोडून आपले “राजा” बसलेले. मग त्यांनी १९५२ साली आलेल्या रंगीली सिनेमात छोटा रोल केला. तो छोटा रोल असून आपटला. नंतर शाहीं बजार रिलीज झाला. तो देखील तोंडावर आपटला.

आत्ता काय करायचं. अहं राजा माणूस राजाचं असतो. कष्टात सुद्धा साहेब तसेच असायचे.

ताठ कणा ठाकूर बाणा. अशातच मदर इंडिया सिनेमा रिलीज झाला. यात त्याने श्यामची भूमिका केली होती. वाट्याला जास्त सिन पण आलं नव्हतं आणि अॅटिट्यूट दाखवण्यासारखं काही नव्हतच. पण या सिनेमामुळे राजकुमार सगळ्यांच्या नजरेत आला. हिच काय ती एकमेव चांगली गोष्ट.

त्यानंतर आला तो पैंगाम. आत्ता सिनेमा पाहणारे वाह वाह म्हणू लागले. त्यानंतर साठ ते सत्तर हा माणूस एका मागून एक रोल करत गेला आणि मी वेगळाय. यांच्यातला नाही हे ठसठसून सांगत गेला. 

हम तुम्हें मारेंगे और जरूर मारेंगे, लेकिन वह वक्त भी हमारा होगा, बंदूक भी हमारी होगी और गोली भी हमारी होगी.

१९९१ साली सौंदागर रिलीज झाला होता. पैंगाम नंतर या माणसानं १९९१ साली दिलीप कुमारला टक्कर देवून मीच रे मीच सिद्ध केलेलं. तस त्यानं अगोदरच्या खूप सिनेमात काम केलेले. ठाकूर पासून चौधरी पर्यन्त तो वेल इस्टॅब्लीश टाईप झालेला. 

या दरम्यान सिनेमाला राजकुमारचा एॅट्यिट्यूची झलक देखील मिळू लागली होती.

तो जसा सिनेमात असायचा तसाच पडद्यावर वावरायचा.

दम मारों दम करुन झिनत अमान हिट झालेली. तिची एक झलक पहायला सगळे असुलेले असायचे. तेव्हा एका पार्टीत झिनत अमान त्याला भेटली. झिनतला इच्छा होती की, आत्ता गावभर कौतुक होतय तर गावच्या ठाकूर कडून पण आपलं कौतुक व्हावं. पण ठाकूर काय म्हणाले माहिताय का ? 

ठाकूर साब म्हणाले, तू सुंदर आहेस की, सिनेमात ट्राय का करत नाहीस !!

बोंबाललं. तेव्हा झिनतला काय वाटलं असेल ते आम्हालापण माहित नाही. अशाच एका पार्टीत त्याला बप्पी लहरी भेटलेला. बप्पी लहरीकडे त्यानं वरुन खाली पाहिलं. बप्पीच्या अंगाखाद्यावर सोनं लोळत होतं. ते बप्पीला म्हणाले,

फक्त मंगळसुत्र राहिलय. ते पण घाल.

च्या गावात इतका अपमान. नंतर एका सेटवर त्याच्यासोबत गोविंदा होता. तो गोविंदाला म्हणाला चांगला शर्ट घातलायचं. राजकुमारनं कौतुक केलं ते देखील शर्टचं. गोविंदानं लागलीच शर्ट काढून दिला.

पुढं काय झालं तर राजकुमार त्या शर्टाचा रुमाल करुन सेटवर आला. राजकुमारला त्याचं कापडं आवडलेलं ते पण रुमालासाठी. एकदा बच्चन भारीतला सुट घालून आलेला. यांनी विचारलं सुट कुठून घेतला. बच्चनने खूष होवून पत्ता सांगितला तर हे म्हणाले, 

मला घराचे पडदे शिवायचे आहेत. चांगले शिवेल तो.

त्याच्यावर लिहताना देखील आम्हाला आमचा कणा ताठ ठेवावा लागला !! 

त्यानंतर त्यानं तिरंगा केला. ब्रिगेडर साहेबांच्या पुढं वागळे सुद्धा फिका पडला होता. तो बापच आहे हे त्यानं सिद्ध केलं. आज त्यांची जयंती. आज ते असते तर नक्कीच त्यांनी शरद पवारांची जागा विकत घेतली असती आणि मोदींना खडे बोल सुनावले असते. त्यांना कडकडीत सलाम.

हे ही वाचा. 

2 Comments
  1. कबीर says

    लेखाची भट्टी झक्कास जमलीये, पण वागळे फिका पडला हे अति झालं. शिवाजीराव वागळे मराठा मरता है या मारता है

Leave A Reply

Your email address will not be published.