नरेंद्र जाधवांना अमेरिकेत पुरस्कार मिळत होता अन भारतीय प्राध्यापकानेच त्यांची जात काढली

सद्या नरेंद्र जाधव यांच्या मुलाखतीचा व्हिडीओ फार व्हायरल होतोय….त्यात त्यांनी सांगितलं कि, अमेरिकेत जाऊन मी माझी जात विसरलो होतो पण एका भारतीयानेच मला माझ्या जातीची आठवण करून दिली होती….संपूर्ण घटना काय होती ते नक्कीच जाणून घ्या..

जेंव्हा नरेंद्र जाधव तीन वर्षांचे होते, तेंव्हा त्यांच्या पालकांनी १९५६ मध्ये बौद्ध धर्म स्वीकारला. आणि त्यामुळेच जाधव यांच्या जीवनावर डॉ.आंबेडकरांच्या विचारांचा खोलवर परिणाम झाला आहे.

नरेंद्र जाधव यांचा जन्म १९५३ मध्ये ओझर गावात एका दलित कुटुंबात झाला. वडील दामोदर जाधव आणि आई सोनाबाई. या दोघांना देखील सगळीकडेच अपमान, अस्पृश्यता, उपेक्षा आणि द्वेषाने वागवले जायचे…….त्यात त्यांचा काहीही दोष नव्हता पण कारण एवढंच होतं कि, ते दलित वर्गात यायचे… त्या काळात उच्च आणि नीच असा बराच फरक होता. जणू दलितांमध्ये येणाऱ्या लोकांचे जन्मच तिरस्कारासाठी झाले असावेत. आता अशा कुटुंबात जन्मलेलय लोकांचा समाजातील उच्च वर्गातील प्रत्येक व्यक्तीला दलितांचे शोषण करायचे होते. काबाडकष्ट करून आई-वडिलांना दोन वेळच्या भाकरीचीही व्यवस्था करता येत नव्हती. 

ते सांगतात कि, “आमच्यासारख्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, कारण भेदभाव व्हायचा अन शाळेत कुणी घेत नसायचं, पण माझ्या आई बाबांना माझ्या बुद्धीचा खूप अभिमान होता. आम्ही अशिक्षित आहोत, पण नरेंद्रला संधी मिळाली तर तो खूप अभ्यास करू शकतो, असे ते बोलायचे. प्रतिकूल परिस्थितीतही मी माझा अभ्यास सुरू ठेवला. मला प्रत्येक परीक्षेत इतर मुलांपेक्षा जास्त मार्क्स मिळायचे, त्यामुळे मला स्टायपेंड मिळू लागला”.

त्यावेळेस त्यांचा मोठा भाऊ आधीच मुंबईत होता, त्यामुळे नरेंद्र यांना पाचवीनंतर दादरच्या छबिलदास शाळेत ऍडमिशन मिळालं. त्यांना मुंबईतील वातावरण जरासं वेगळं वाटलं आणि काळही बदलत होता. तसेच त्यांना सतत मिळत असलेल्या स्कॉलरशिपमुळे नरेंद्र जाधव यांचा मार्ग सुकर होऊ लागला. दरम्यान नरेंद्र जाधव यांना लेखनाबरोबरच वाचनाबाबतही आवड निर्मण झाली. तसेच देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा होती, अनेक पुस्तके लिहिण्याचा विचार त्यांच्या मनात येत असायचा. त्यांनी बॉम्बे युनिव्हर्सिटीच्या कॉलेजमधून १९७५ मध्ये अर्थशास्त्रात प्रथम श्रेणीची पदव्युत्तर पदवी मिळवली. तेव्हा हे यश मिळवणारे ते पहिले दलित विद्यार्थी ठरले होते.

त्यांच्यात असणाऱ्या अभ्यासाच्या आवडीने त्यांना यूएसएच्या इंडियाना विद्यापीठात नेले. साहजिकच आहे इतक्या मोठ्या यशानंतर आता जात-पात राहणार नाही, समाजात त्यांना सन्मानाने वागणूक मिळेल, जातीच्या चौकटीत त्यांना बसवलं जाणार नाही असं त्यांना वाटलं. 

सगळं सुरळीत चाललं होतं, त्यांनी इंडियाना विद्यापीठात अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवली. ज्यांना लहानपणी शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता पण त्यांनी समाजाच्या जातिरूढींच्या बंधनाना पायदळी तुडवून यशाच्या शिखरावर पोहचले. तसेच त्यांनी यूएसएमध्ये बेस्ट इंटरनॅशनल स्टुडंट’चा पुरस्कार पटकावला होता. 

पण हा पुरस्कार मिळण्याच्या आधी त्यांना अमेरिकेत एक अतिशय वाईट अनुभव आला….हा अनुभव त्यांनी स्वतः एका टीव्ही चॅनलच्या मुलाखतीमध्ये सांगितला होता.

जेंव्हा ‘बेस्ट इंटरनॅशनल स्टुडंट’च्या पुरस्कारासाठी शॉर्ट लिस्टिंग चालू होतं. त्यात नरेंद्र जाधव यांचं नाव देखील होतं. तेंव्हा त्यांना विद्यापीठातील प्रमुख व्यक्तींनी खाजगीत बोलावून सांगितलं कि, इंडियाना विद्यापीठात जी भारतीय वरिष्ठ प्राध्यापक आहेत त्यांना भेटून त्यांच्याकडून सर्टिफिकेट आणा”. त्याप्रमाणे जाधव यांनी शोधाशोध सुरु केली कि हे सर्टिफिकेट कुणाकडून घ्यायचे ? मग त्या विद्यापीठातलय काहींनी त्यांना सुचवले कि, एक ज्येष्ठ प्राध्यापक आहेत जे उत्तर भारतीय आहेत. त्यांचा तिथे मोठा दबदबा होता. ऍटोमिक फिजिक्स मध्ये त्यांचं काम होतं. अगदी नोबेल पुरस्काराचे दावेदार ठरता-ठरता राहिले. त्यांचं प्रमाणपत्र मिळालं तर बेस्ट राहील असं नरेंद्र याना सांगण्यात आलं. आणि त्यासाठी नरेंद्र यांच्या मदतीसाठी धावून आले त्यांचं नाव म्हणजे बॉबी सरदेसाई. जे प्रसिद्ध पत्रकार राजदीप सरदेसाई यांचे काका आहेत. 

नरेंद्र जाधव यांनी सरदेसाई यांना विनंती केली कि, मला त्या ज्येष्ठ प्राध्यपकाकडे घेऊन चला.  त्यानुसार हे दोघे त्या प्राध्यापकाच्या घरी गेले. अन तिथे त्यांना वेगळाच अनुभव आला जो ते आयुष्यभर विसरू शकत नाहीत. आता अमेरिकेत राहणारे भारतीय अमेरिकनपेक्षा आपण कसे खरे अमेरिकन आहोत हे दाखवतात. त्याप्रमाणे त्या प्राध्यापक सरांनी आलेल्या पाहुण्यांना चहा, कॉफी पाणी पण ऍपल पाय नावाचं काही तरी पेय दिलं. शिवाय बसण्याची विनंती देखील केली नाही आणि विचारलं कि कशासाठी आला आहेत?  

मग बॉबी यांनी सांगितलं कि, असं असं काम आहे. कधी नव्हे तर आपला भारतीय विद्यार्थी सर्वोत्कृष्ट विध्यार्थी या पुरस्काराचा मानकरी ठरणार आहे, त्यासाठी तुमच्या प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. यावर त्यांनी हो, बघू असं मोघम उत्तर दिलं, काही ठोस रिस्पॉन्स न दिल्यामुळे आलेल्या दोघांनी त्यांचा निरोप घेतला आणि दारातच पोहचले कि, त्या प्राध्यापक सरांनी बॉबी यांना माघारी बोलावलं. आणि नरेन्द्र जाधव यांना ऐकू येईल अशा आवाजाच्या पिचमध्ये बोलले कि, “बॉबी तुम्हारी अकल मारी गई हैं ?किस आदमी को लेके आयो हो तुम ? ये तो धेड का बच्चा हैं”….हे उदगार होते ५० वर्षे अमेरिकेत राहिलेल्या एका नावाजलेल्या प्राध्यापकाचे ! त्यांची मानसिकता पाहून अक्षरश: डोक्याला हात मारून घ्यावा वाटतो…..

नरेंद्र जाधव सांगतात कि, मी अमेरिकेत येऊन माझी जात विसरलो होतो पण एका भारतीयानेच मला माझ्या जातीची आठवण करून दिली.    

असो पण या काळात नरेंद्र जाधव याना इंडियाना आणि डेपो या दोन्ही विद्यापीठांमध्ये विद्यार्थी-अनुकूल प्राध्यापक होण्याचा मानही मिळाला, मी अजूनही डॉक्टरेट करत होतो. १९८६ मध्ये डॉक्टरेट केल्यानंतर अमेरिकेत नोकरीच्या अनेक संधी होत्या, पण त्यांना मातृभूमी बोलावते आहे असे वाटले आणि ते भारतात परतले. 

मायदेशी परतल्यावर त्यांनी रिझर्व्ह बँकेत अर्थतज्ज्ञ म्हणून काम केले. यानंतर ते दीर्घकाळ आर्थिक सल्लागार होते. तसेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे आर्थिक सल्लागार म्हणून देशाचे प्रतिनिधित्व केले. या काळात इथिओपिया आणि अफगाणिस्तानमधील अर्थव्यवस्थेच्या पुनर्बांधणीत भूमिका बजावली. 

त्यांनी नेहमीच शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे ‘तीर्थक्षेत्र’ मानले आहे, त्यामुळे २००६ मध्ये सेवानिवृत्तीनंतर मी पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची जबाबदारी स्वीकारली.

पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी देखील नरेंद्र जाधव यांच्या कामगिरीवर अनेकदा भाष्य केले. ते  सुमारे ३१ वर्षे रिझर्व्ह बँकेत होते. त्यानंतर ते पुणे विद्यापीठाचे कुलगुरू झाले. राष्ट्रीय सल्लागार समितीचे सदस्य होते, अनेक पुस्तके लिहिली, अनेक पुस्तकांना परदेशात प्रसिद्धी मिळाली. तसेच २०१६ मध्ये राज्यसभेचे सदस्य होते. त्यांना अनेक देशांनी डी-लिट ही पदवी बहाल केली.

ते या अत्युच्च पदावर पोहचले ते केवळ डॉ. आंबेडकरांच्या विचारधारेमुळे…’

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

1 Comment
  1. Satej says

    Brahmin & so-called Hi-Fi Sophisticated Hindus are still behave like inhuman way…they follow ChaturVarna चातुर्वर्ण्य.

Leave A Reply

Your email address will not be published.