13 वर्ल्ड लिडर्स मध्ये टॉपला जाण्यासाठी पण बहुत बडा जिगरा लगता है बॉस!

१३ वर्ल्ड लिडर्स मध्ये पण टॉपला जाण्यासाठी पण बहुत बडा जिगरा लगता है बॉस!

हा जिगरा म्हणजे थोडक्यात साहस आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात. कारण आहे पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक लोकप्रियतेत टॉपला आहेत. एका सर्वेक्षणादरम्यान ग्लोबल वर्ल्ड लीडर्स लिस्टमध्ये पंतप्रधान मोदींची पहिल्या क्रमांकावर निवड झाली आहे. या यादीत मोदींना ७१% अप्रूव्हल रेटिंग मिळाली आहे. तर त्यांच्या तुलनेत बाकीच्या देशाचे पंतप्रधान या रेटिंगमध्ये खूपच मागे आहेत.

हे रेटिंग मॉर्निंग कन्सल्ट पॉलिटिकल इंटेलिजन्सने दिले आहेत. ही मॉर्निंग कन्सल्ट पॉलिटिकल इंटेलिजन्स, ग्लोबल लेव्हलवर असणाऱ्या गव्हर्नमेंट लीडर्सची अप्रूव्हल रेटिंग्स आणि कंट्री ट्रेजेक्ट्रीजला ट्रॅक करण्याचं काम करते. १३ देशांच्या लिडर्सला ट्रॅक करणारी ही एजन्सी रेटींग्ज सुद्धा देते.

ही एजन्सी ऑस्ट्रेलिया, भारत, अमेरिका, ब्राझील, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जापान, मॅक्सिको, साउथ कोरिया, स्पेन आणि ब्रिटेन आदि देशांना सध्यातरी ट्रॅक करते आहे. ही रेटिंग एजन्सी प्रत्येक देशातील प्रौढ नागरिकांच्या ७ दिवसांच्या मूव्हिंग एव्हरेजवर आधारित रेटींग्ज देते. त्यासाठी लागणाऱ्या सर्व्हेसाठी घेतलेल्या नमुन्याच ऍव्हरेज प्रत्येक देशाच्या लोकसंख्येनुसार वेगवेगळ असतं.

या आधी या एजन्सीने सर्व्हे केलेत आणि रेटिंग्ज पण दिलेत. पण भारताचे पंतप्रधान म्हणून दोनदा या यादीत अव्वल येणारे पंतप्रधान नरेंद्र मोदीच आहेत.

मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्येही मोदींची सर्वाधिक लोकप्रिय जागतिक नेत्यांच्या सर्वेक्षणात प्रथम क्रमांकावर निवड झाली होती. मे २०२० मध्ये मॉर्निंग कन्सल्टने पंतप्रधान मोदींना ८४% ची मान्यता दिली होती. मे २०२१ मध्ये मोदींच हेच रेटिंग ६३% पर्यंत खाली आलं होतं.

२०२२ च्या रेटिंग्ज मध्ये, १३ ते १९ जानेवारी दरम्यान सर्व्हे घेण्यात आला. यात अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रप्रमुख खूप मागे आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत.

त्यांनी अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियासारख्या शक्तिशाली आणि विकसित देशांच्या प्रमुखांनाही मागे टाकलय. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर मॅक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्रादार आहेत. त्यांना ६६% अप्रूव्हल रेटिंग मिळाल आहे. त्यांच्यानंतर तिसरा क्रमांक इटलीचे पंतप्रधान मारियो द्राघी यांचा आहे. त्यांना ६०% रेटिंग मिळाल आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना ४३% रेटिंग मिळाले असून ते ६ व्या क्रमांकावर आहेत. कॅनडाचे राष्ट्राध्यक्ष जस्टिन ट्रूडो यांनाही ४३% रेटिंग पॉइंट मिळाले आहेत, पण त्यांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनंतर स्थान मिळालं आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांना ४१% अप्रूव्हल रेटिंग मिळाल आहे.

सध्या मोदी पहिल्या क्रमांकावर असले तरी मोदींच रेटिंग २०२० च्या तुलनेत अजूनही कमी आहे.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.