एका किरकोळ कंपनीमुळे जॅक डोर्सीला ट्वीटरचा राजीनामा द्यायला लागलाय..

डोर्सी यांनी आपला राजीनामा सोशल ट्वीटर वर शेअर केला ज्या ट्वीटरचे सीइओ आहेत…  त्यानंतर आलेले इलॉन मस्कच्या इंटरेस्टिंग ट्विट या सगळ्या गोष्टींची आता सर्वांनी मजा घेऊन झालीये….

जॅक डोर्सीने जसं ट्विटरचा राजीनामा दिला, तशी एकच चर्चा चालूये ती म्हणजे त्यांनी एवढ्या टॉपच्या कंपनीचा राजीनामा का दिला असेल ? त्यामागे काय कारण असेल? आता जॅक डोर्सीची पुढील योजना काय आहे ?

आता अशी चर्चा तर आहेच कि, तो काळ गेलाय कि तरुण डेव्हलपर Google, Facebook किंवा Twitter वर काम करण्यास उत्सुक असतात…पण ते जाऊ द्या महत्वाचा मुद्दा हा आहे कि,  जॅक डोर्सी यांनी दिलेला ट्विटरच्या सीईओ पदाचा अचानक राजीनामा दिला, ते केवळ ट्विटरमध्येच घडू शकते. 

भिडू तर कायम म्हणत आलाय कि, ट्विटरच्या ऑफिसमध्ये जे राजकारण होतं ते साखर कारखान्याच्या निवडणुकांमध्ये देखील होत नाही. 

डोर्सी याचा हा ट्विटरवरील हा पहिला राजीनामा नाही, त्याला २००८ मध्ये सीईओ पदावरून जबरदस्तीने हटवण्यात आले होते, त्याच्या ३ वर्षानंतर ते कार्यकारी संचालक म्हणून पुन्हा ट्विटरवर परतला. अशा स्थितीत यावेळीही कोणीही खात्रीने सांगू शकत नाही की हा राजीनामा त्यांचा शेवटचा असेल की नाही? 

त्यामुळे बब्बर शेर वापस भी आ सकता है, ये बात पक्की !

पण यावेळेस दिलेला राजीनामा हा त्याला कुणीही जबरदस्ती मागितला नसून त्याने तो स्वइच्छेने दिलाय असं सांगितलं आहे.  मग एकच प्रश्न उरतो तो म्हणजे त्याच्या राजीनाम्याचा अर्थ काय ??? 

काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यानुसार,  डोर्सीचा राजीनाम्याचा निर्णय पूर्णपणे अनपेक्षित नव्हता…कारण गेल्या बराच काळापासून ट्वीटरमध्ये सक्रिय गुंतवणूकदार ट्विटरच्या विकासाला गती देण्यासाठी आणि आर्थिक कामगिरी सुधारण्यासाठी जॅकवर एक वर्षापेक्षा जास्त काळ दबाव आणत होते. वॉल स्ट्रीटच्या गुंतवणूकदारांनी डॉर्सीच्या बाहेरील हितसंबंधांवर टीका केली आहे. 

कंपनीच्या प्रमुखावरच पायउतार होण्याची वेळ काही मुठभर कंपनीने…

होय, ट्वीटरमध्ये ४ टक्के शेअर्स असलेल्या कंपनीमुळे डोर्सीला राजीनामा द्यावा लागला असा दावा देखील चर्चेत आहे.. या कंपन्या कोणत्या ?  

एक म्हणजे पहिल्या गुंतवणूकदारांचं नाव आहे एलियट मॅनेजमेंट कंपनी. या कंपनीकडे ट्विटर या कंपनीचे अवघे ४ टक्के इतके समभाग आहेत. गेली जवळपास दोन-तीन वर्ष हे ‘एलियट मॅनेजमेंट’ जॅक डोर्सी यांच्यामागे हात धुऊन लागली होती. 

आता ‘एलियट कंपनीचं म्हणण आहे कि, डोर्सी भले ट्वीटरचा संस्थापक असेल पण तरीही तो ट्विटर कंपनीच्या डेव्हलपिंग मध्ये आवश्यक तितकं लक्ष घालत नाही. 

या म्हणण्याला आधार म्हणजे, पेमेंट प्लॅटफॉर्म ‘स्क्वेअर’, ज्याची स्थापना डोर्सीने जेंव्हा त्या वेळी केली होती जेंव्हा त्याला Twitter मधून बाहेर काढलं होतं.

ही कंपनी वित्तक्षेत्रात काम करते आणि बिटकॉइनसारख्या क्रिप्टोकरन्सी उलाढाल करते. आता  क्रिप्टोकरन्सी सिस्टीम हेच जगाचं भवितव्य आहे’ असं खुद्द डोर्सी नेहेमीच म्हणतो. यावर एलियट मॅनेजमेंट कंपनीचा कसलाही आक्षेप नाही. पण त्यांचं म्हणणं इतकंच आहे की, ट्विटर कंपनीत लक्ष घालायचं सोडल्यामुळे आम्हा गुंतवणूदाराचं नुकसान होतंय”. 

आता लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे डोर्सीने राजीनामा जाहीर करताच ट्विटरच्या शेअरमध्ये वाढ झाली आहे. 

बाकी जी घसरण झाली ती फक्त बाकीच्या बाजारासोबतच झाली कारण गुंतवणूकदार कोविड ओमिक्रॉन प्रकाराबद्दल चिंतेत आहेत.

डिजिटल दिग्गजांमध्ये जेफ बेझोस आणि इलॉन मस्क आणि डॉर्सीमध्ये एक समानता दिसून येते ती म्हणजे, डोर्सीप्रमाणेच बेझोस आणि मस्क दोघेही Amazon/Blue Origin आणि Tesla/SpaceX अशा दोन-दोन कंपन्या चालवतात. यासोबतच हे तिन्ही डिजिटल लोकं वेगवेगळ्या प्रकारचे साहसं आणि काहीतरी नवीन शोधायचा सतत प्रयत्न करत असतात.

बेझोस अंतराळात  प्रवेश करण्याचा प्रयत्न करतायेत, तर इलॉन मस्क अंतराळात टेस्ला रोडस्टर स्पोर्ट्स कार पाठवण्याचा विचार करतायेत….म्हणजे आपण ज्याची फक्त कल्पना करतोय ते दोघ या गोष्टी घडवून आणण्याचा प्रयत्न करतायेत…  

हे सर्व सूचित करते की हे दोन्ही मेगा-टेक फॉउंडर्स त्यांच्या समान पातळीवर काम करायचा प्रयत्न करत असतात. मात्र ट्विटरच्या बाबतीत बोलायचं झालं तर इथे सोशल मीडिया हि मर्यादा आहे. Twitter, Facebook आणि YouTube सारख्या प्लॅटफॉर्मसह राजकीय संबंध आणि प्रचार, प्रसार, स्पर्धा, गोपनीयतेचे उल्लंघन आणि हेट स्पीच यासारख्या कठीण समस्यांवरील वाद-विवाद वाढतच आहे.

याचे उदाहरणं बघायचे तर, मागे डोनाल्ड ट्रम्पवर बंदी घालण्याआधी, ट्विटर हे त्यांचे आवडते व्यासपीठ बनले होते, परंतु नंतर ट्विटरवरच ट्रम्प यांच्या  हेट स्पीचमुळे त्यांची जगभरात बदनामी झाली.  कधीकधी असे म्हटले जाते की या कंपन्या सोशल मीडिया मिडलाइफ क्राइसेस मधून जातयेत.

हे हि वाच भिडू :

English Summary : Jack Dorsey’s resignation as twitter CEO was a quite shocking for whole world. let’s hear the real story behind jack Dorsey’s resignation.

Web title: A company behind Jack Dorsey’s resignation as twitter’s CEO.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.