राहतं घर गहाण ठेवून खेळाडू घडवणारे गोपीचंद !

सायना नेहवालने लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य मिळवलं, पी.व्ही सिंधूने रिओमध्ये रौप्य मिळवलं पुरूषांच्या जागतिक क्रमवारीत किदंबी श्रीकांत पहिल्या स्थानावर विराजमान झाला. निश्चितच या खेळाडूंच कष्ट होतं. त्यांच्यामुळे भारताच देखील नाव झालं, पण

या सर्वांच्या पाठीमागे एकच व्यक्ती होती. पुलेला गोपीचंद.

१९९६ चं सालं.

नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धा गोपीचंद यांनी जिंकली होती. या विजयानंतरचे पुढची सलग पाच वर्ष गोपीचंद यांनी हि स्पर्धा आपल्याच नावाने लक्षात ठेवण्यास भाग पाडलं होतं. २००१ साली प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ऑल इंग्लड स्पर्धेंचं विजेतेपद ही व्यावसायिक बॅडमिंटनपटू म्हणून त्यांची सर्वोत्तम कामगिरी ठरली होती.

या स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारे ते प्रकाश पदुकोन यांच्यानंतर केवळ दुसरेच भारतीय ठरले होते.

‘ऑल इंग्लंड बॅडमिंटन’ स्पर्धा बॅडमिंटनच्या क्षेत्रात तितकीच प्रतिष्ठेची समजली जाते जितकी टेनिसमध्ये विम्बल्डन. गोपीचंद यांच्या ‘ऑल इंग्लंड’ विजेतेपदानंतरच पी.व्ही. सिंधू हिला बॅडमिंटनमध्ये करिअर करण्याची प्रेरणा मिळाली होती. खेळात गोपीचंद याचं नाणं खणखणलेलच पण पुढे काय हा प्रश्न होता. तेव्हा या माणसानं आपल्यापेक्षा देखील काकणभर अधिक तोडीचे खेळाडू तयार करायचं स्वप्न पाहिलं.

गोपीचंद यांनी हैद्राबादमध्ये अॅकडमी सुरू करण्याचा निर्णय घेतला.

खेळाडूच्या गणवेशातून प्रशिक्षणाच्या गणवेशात आल्यानंतरचा सर्वात मोठ्ठा प्रश्न होता तो अस संकुल उभा कस करणार. जागतिक पातळ्यांवर ओळख निर्माण केलेल्या, भारतातील सर्वातउत्कृष्ठ खेळाडू म्हणून गणल्या गेलेल्या खेळाडूला देखील हा प्रश्न पडावा हे निश्चितच वाईट होतं.

पैशाची जुळणी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली होती. पण करायचंच म्हणून त्यांनी आपलं राहतं घर गहाण ठेवलं आणि सर्व स्वप्न या एका अॅकडमीच्या उभारणीसाठी लावली.

आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीला आपल्याला ज्या काही अडचणींचा सामना करावा लागला त्या अडचणी भविष्यात या क्षेत्रात येणाऱ्या खेळाडूंना भेडसावू नयेत आणि अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त वातावरणात भारतीय खेळाडूंना सराव करता यावा, हेच गोपीचंद अकॅडमी सुरु करण्यामागे त्यांचं धोरण होतं.

त्यातूनच पी.व्ही.सिंधू, सायना नेहवाल असे कित्येक खेळाडू भारताला मिळाले.

त्यांच्या खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून केलेल्या याच कामगिरीचा गौरव भारत सरकारने २००९ साली द्रोणाचार्य आणि २०१४ साली पद्मभूषण पुरस्कार देऊन केला.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.