चालून आलेलं उपराष्ट्रपतीपद पटवर्धनांनी फक्त तत्वांसाठी सोडून दिलं

आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावं यासाठी झालेल्या लढ्यात अनेक स्वतंत्रसेनानींनी भाग घेतला. पण त्यातल्या काही जणांची ओळख आजच्या पिढीला माहितचं नाहीये. त्यातलीच एकम्हणजे रावसाहेब पटवर्धन.

रावसाहेब यांचा जन्म अहमदनगरचा. नगरमध्येच ते वाढले, शिकले आणि पुढच्या शिक्षणासाठी बनारस विश्वविद्यालयात दाखल घेतला.  त्यांच्यासोबत त्यांचे बंधू अच्युतराव पटवर्धन सुद्धा होते. दोघांनी मिळून स्वातंत्र आंदोलनाला बळ दिले. पण स्वातंत्र्या मिळाल्यानंतर दोघांनी स्वतःला राजकारणापासून दूर ठेवले. म्हणजे सत्तेत राहण्यासाठी एकीकडे जेव्हा नेतेमंडळींचा आटापिटा पाहतो, तेव्हा या दोघां भावांना बघून प्रश्न हा पडतोच. पण याचं उत्तर त्यांच्यावर बालपणी  झालेल्या संस्कारात आणि मिळवलेल्या ज्ञानात सापडत.  

रावसाहेबांचे व्यक्तिमत्त्व संपन्न बनण्यात अंबिकाश्रमात झालेल्या संस्काराचा खूप मोठा वाटा आहे.  त्याचबरोबर बोलण्या एक बनारसी छाप पाहायला मिळायची. देशभक्तीचे संस्कार बालपणापासूनच झालेल्या रावसाहेबांवर विद्यार्थी असतानाच गांधीवादाचा संस्कार झाला. १९२२ सालच्या महात्मा गांधींच्या सत्याग्रह आंदोलनात त्यांचा सहभाग होता. १९३०, १९३२, १९३९ आणि १९४२ च्या आंदोलनात त्यांना तुरुंगात सुद्धा जायला लागलं होत. रावसाहेबांनी ब्रिटिशांच्या नाकात दम केलेला, त्यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांना पकडून देणाऱ्याला एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. 

१९४६ साली कोपरगावच्या शंकरबागेत रावसाहेबांनी एक हजार तरुणांचे एक मोठे शिबिर घेतले. १९४८ पर्यंत निरनिराळी एकूण सहा मोठी शिबिरे घेतली. साखर कामगारांच्या संघटना स्थापून त्यांना हक्कांची जाणीव करून दिली. कामगारांना पगारी रजा, बोनस, ग्रॅच्युईटी, प्रॉव्हीडंट फंड, पगारवाढ, राहण्यास घरे या मागण्या मिळवत असताना मुलांच्या शिक्षणाची सोय केली.

काँग्रेसच्या कार्यकारिणीतही त्यांनी काम केले. नगर जिल्हा काँग्रेस समितीचे ते अनेक वर्ष अध्यक्ष होते. काँग्रेस पार्लमेंटरी बोर्डाचे ते सभासद होते. गांधींच्या मृत्यूनंतर देशात पंडित नेहरू यांचं पर्व सुरू झालं. नेहरू आणि रावसाहेबांची मैत्री एका वेगळ्याच लेव्हलची होती. म्हणजे एक पूर्णपणे राजकारण  सांभाळणारा आणि दुसरा त्याच राजकारणापासून चार हात लांब. तशी दोघांची मैत्री ही स्वातंत्र्या आधीची. 

 स्वातंत्र्यानंतर जेव्हा देशासमोर काश्मीरचा प्रश्न उभा होता तेव्हा पंडित नेहरूंनी तो प्रश्न सोडविण्यासाठी आपले वैयक्तिक दूत म्हणून रावसाहेबांना पाठविले होते. रावसाहेबांच्या सडेतोड आणो अचूक बोलण्याचे नेहरू सुद्धा फॅन होते. त्यात त्यांना चार गोष्टींची चांगली समज होती, त्यामुळे रावसाहेबांनी देशाचे उपराष्ट्रपतीपद स्वीकारावं अशी नेहरूंची इच्छा होती. 

बरं ना उपराष्ट्रपतीपद पण ब्रिटनमधील हायकमिशनरपद  तरी रावसाहेबांनी स्वीकारावं अशी गळ नेहरूंनी त्यांच्यापुढं घातलीपण रावसाहेबांनी सत्तेच्या जागा घेण्यास स्पष्टपणे नकार दिला. नेहरूंना हा नकार पटला नव्हता अर्थातच ते नाराज होते. पण त्यांना रावसाहेबांचा स्वभाव चांगलाच माहित होता. त्यामुळे त्यांनी पुन्हा ती प्रस्ताव मांडला नाही. 

पण एकदा पंडित नेहरूंनी रावसाहेबांना न राहवून विचारलं, ‘राऊ मी तुझ्यासाठी काय करायला हवं म्हणजे तुमचं समाधान होईल.’ यावर रावसाहेब मिश्कीलपणे हसले आणि पंडितजींना म्हणाले, ‘मला तुमचा असा एकुलता एक मित्र समजा की, त्याने तुमच्याजवळ काही मागितले नाही आणि ज्याच्यासाठी तुम्ही काही केले नाही़’ 

रावसाहेबांच्या या उत्तरावर नेहरूंना आणि रावसाहेब दोघेही खळखळून हसले. यातूनचं त्या दोघांची घट्ट मैत्री दिसून येते. 

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.