एक दिन भारत में हमारी सरकार होंगी और पुरा देश काँग्रेस पर हंस रहा होगा : वाजपेयी
“मैंने जीवन में कभी सत्ता के लालच में सिद्धांतो के साथ समझोता नहीं किया हैं, और न भविष्य में करुंगा। सत्ता का सहवास और विपक्ष का वनवास मेरे लिए एक जैसा हैं । हार नहीं मानूंगा रार नहीं ठानूंगा “
अटलबिहारी वाजपेयी .
अटल बिहारी वाजपेयी यांच्या या ओळी सांगण्याचं निमित्त म्हणजे,
५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल. पंजाब सोडता बाकी चारही राज्यांत भाजप बहुमताने विजयी ठरली. काँग्रेस कुठेच नाही.
देशात दीर्घकाळ सत्तेवर असलेल्या काँग्रेस पक्षाचं आता अस्तित्व जाणवत नसतांना तेच दुसरीकडे काँग्रेसचा सर्वात मोठा विरोधी पक्ष राहिलेला भाजप मात्र सलग दुसऱ्यांदा सत्तेवर आला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या जवळपास १३ राज्यात झालेल्या विधानसभेत काँग्रेस कुठेच स्वबळावर सत्तेत नाहीये.
एकेकाळी देशावर राज्य करणाऱ्या काँग्रेसला आज यूपीमध्ये ५ जागाही जिंकता आलेल्या नाहीत. म्हणूनच अटलजी यांनी तेंव्हा केलेलं काँग्रेस बद्दलचं भाकीत काँग्रेसच्या सद्यस्थितीला तंतोतंत लागू होतं. काँग्रेसला आठवत असो वा नसो, पण लोकांना मात्र अटल बिहारी यांच्या त्या ओळी आठवत आहेत. #atalbiharivajpayee ट्रेंड करत आहेत, आणि सोबतच एक कात्रण व्हायरल होत आहे. त्यात अशा ओळी आहेत की,
“आज हमारी सरकार मात्र १ वोट से गीर गई हैं । हमारे कम सदस्य होणे पर काँग्रेस हंस रही हैं। लेकिन मेरी बात काँग्रेस कतई न भूले, एक दिन ऐसा आयेगा जब पुरे भारत में हमारी सरकार होंगी और पुरा देश काँग्रेस पण हंस रहा होगा। “
आम्ही स्पष्ट बहुमत मिळेल त्या क्षणाची वाट पाहू.. एक दिवस संपूर्ण देशात कमळ फुलणार. आम्ही कष्ट केले, संघर्ष केला. ही ३६५ दिवसांची पार्टी आहे. भाजप हा निवडणुकीत मशरूमसारखा वाढणारा पक्ष नाही… आम्ही बहुमताची वाट पाहू”, असा निर्धार समोर ठेऊन ते संसदेत बोलले होते आणि त्यांचा प्रत्येक शब्द खरा झाल्याचं सिद्ध झाल्याचं दिसून येतंय.
हि परिस्थिती कधीची आहे ?
भाजप पक्ष १९९८ मध्ये सत्तेवर आला. परंतु भाजपचं सरकार केवळ १३ महिने टिकलं. भाजपसोबत युतीत भागीदार असलेला AIADMK पक्षाच्या सुप्रीमो जयललिता यांनी आपले १८ खासदार घेऊन बाहेर पडल्या आणि १३ महिन्यानंतर म्हणजेच १९९९ च्या एप्रिल महिन्यात भाजप सरकारला अविश्वास प्रस्तावाला सामोरे जावे लागले.
भाजप सत्ताधारी आघाडी, राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) २६९ तर विरोधकांना २७० मते मिळाली होती. आणि भाजपाला एका मताने पराभव पत्करावा लागला.
पण हे मत कोणाचे होते याबद्दल कुणाला माहिती मिळत नव्हती. अनेक नावांचे अंदाज बांधला जात होते. अखेर एक नाव समोर आलं ज्यांच्या एका मताने भाजप सरकार पडलं होतं.
आणि ते नाव म्हणजे काँग्रेसचे तत्कालीन खासदार गिरीधर गमंग.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे पीएमओ आणि अनेक वर्षे खाजगी सचिव म्हणून जबाबदारी पार पाडलेले शक्ती सिन्हा यांनी लिहिलेल्या ‘वाजपेयी: द इयर्स दॅट चेंज्ड इंडिया’ या पुस्तकात या घटनेचा उल्लेख आहे.
ज्येष्ठ आदिवासी नेते गमांग १९९८ मध्ये ओडिशाचे मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्री पदावर असल्यावर त्यांना लोकसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागतो पण गमांग यांनी राजीनामा दिलाच नव्हता. जेंव्हा अविश्वास ठरावावर त्यांनी मत द्यावं कि नाही यावर बराच वाद -विवाद झाला आणि शेवटी लोकसभा अध्यक्षांनी गमांग यांना मतदान करण्याची परवानगी दिली. आणि गमांग यांच्या मतामुळे वाजपेयी सरकार पडले होते. असं म्हणतात की, सोनिया गांधींच्या सांगण्यावरून त्यांनी वाजपेयी सरकारच्या विरोधात मतदान केलं होतं.
त्यानंतर वाजपेयी सरकार पाडल्याचा टॅग गिरिधर गमांग यांना कायमस्वरूपी लागला.
गमंग सुमारे ४५ वर्षे काँग्रेसमध्ये होते. त्यांचं काँग्रेस पक्षातील स्थान बघायला गेलं सर्वात ज्येष्ठ नेत्यांमध्ये गणले जायचे. एकेकाळी सोनिया गांधींच्या अत्यंत जवळचे मानल्या जाणाऱ्या गमांग यांनी २०१५ मध्ये काँग्रेसला धक्काच दिला. ज्यांनी भाजपचं सरकार पाडलं होतं ते गिरिधर गमांग २०१५ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. आत्ता ते भाजपमध्ये आहेत.
आता गिरिधर गमांग यांच्याच भाजप प्रवेशावरून आपण बघू शकतोय की, काँग्रेसचे मेन मेन नेते ज्यांनी भाजपला मात देण्यासाठी महत्वाची भूमिका निभावली ते नेते काँग्रेसला डच्चू देऊन भाजपमध्ये मध्ये जातायेत.
असो तर आता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले वाजपेयींचे काँग्रेसच्या भवितव्याविषयीचे विधान आणि सद्या काँग्रेसची झालेली अवस्था. आणि प्रत्येक निवडणुकांमध्ये होणार दारुण पराभव हे सगळं पाहता वाजपेयी म्हणाले तसं खरंच संपूर्ण देश काँग्रेसच्या वर्तमानावर हसत असेल का ?
हे हि वाच भिडू :
- म्हणून योगींच्या विजयात ‘बुलडोझर’ चा रोल जास्त महत्वाचा आहे
- स्पर्धा संपल्यावर भाषणाला गेलेल्या अटल बिहारी वाजपेयींनी पहिलं बक्षीस मारलं होतं…
- ग्वालियरमधल्या या दुकानातील बुंदीचे लाडू खायला स्वतः पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यायचे…