सरदार पटेलांनी गोडसेचा उल्लेख “पागल” आणि “शैतान” असा केला होता. 

नथुराम गोडसेच भूत पुन्हा एकदा वर काढण्याचे प्रयत्न सुरू आहे. साध्वी प्रज्ञासिंग यांना भाजपने उमेदवारी दिल्यानंतर आत्ता कट्टर हिंदूत्वाचे राजकारण होणार यात कोणतीच शंका नव्हती. कट्टर हिंदूत्त्वाच्या लाईनमध्ये ज्याप्रमाणे राम मंदिरचा समावेश होतो त्याचप्रमाणे किंवा त्याहून अधिक नथुराम गोडसेचा उल्लेख होतो. भाजप आणि संघ नथुराम गोडसेच जाहिर उद्दातिकरण करण्यासाठी तसा पाठिमागेच असतो. देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी गांधीचा जप करतात, गांधीवादाचा नाही. थोडक्यात भाजप आणि संघ यांना कळून चुकलं आहे की नावापुरते का होईना गांधींना शरण जावेच लागते. 

पण मुद्दा राहतो कडव्या हिंदूत्त्ववादी शक्तींचा. त्यांच्या मते गांधी फाळणीला जबाबदार होते. गांधीमुळे पाकिस्तानचा जन्म झाला. गांधीमुळे पाकिस्तानला ५५ कोटी रुपये द्यावे लागले. त्यातून गांधी हत्या झाली. नथुराम गोडसे याने एका अहिंसावादी महात्म्यास घातलेल्या गोळ्यांच स्पष्टीकरण गेली ६०-७० वर्ष ऐकण्यात येत आहे. 

त्याच पातळीवरच दूसरं गृहितक म्हणजे गांधीमुळे नेहरू पंतप्रधान झाले. वास्तविक सर्वांचा पाठिंबा सरदार पटेलांना होता. सरदार पटेलांवर कॉंग्रेसने अन्याय केला. हे गृहितक भाजपकडून सरदार पटेलांचा भव्यदिव्य पुतळा उभारून पुढे नेलं जात. 

नथुराम गोडसे यांने महात्मा गांधींचा हत्या केली तेव्हा सरदार वल्लभभाई पटेल देशाचे गृहमंत्री होते. सरदार वल्लभभाई पटेल महात्मा गांधींच्या हत्येनंतर काय म्हणाले होते ते पाहण महत्वाच आहे, 

गांधी हत्येनंतर २ फेब्रुवारी १९४८ ला शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या शोकसभेत पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल यांच्यासह इतर नेत्यांनी संबोधित केलं होते. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नंतरचे दोन नंबरचे नेते म्हणून सरदार पटेल बोलणार होते. ते जेव्हा शोकसभेत बोलण्यासाठी उभा राहिले तेव्हा त्यांचे डोळे पाण्याने भरून आल्याची नोंद करण्यात आली आहे. 

 याच सभेत सरदार वल्लभभाई पटेल म्हणाले होते की, 

‘जब दिल दर्द से भरा होता है, तब जबान खुलती नहीं है और कुछ कहने का दिल नहीं होता है. इस मौके पर जो कुछ कहने को था, भाई जवाहरलाल नेहरू ने कह दिया, 

मैं क्या कहूं?’

पुढे सरदार वल्लभभाई पटेल म्हणतात, 

हां हम यह कह सकते हैं कि यह काम एक पागल आदमी ने किया. लेकिन मैं यह काम किसी अकेले पागल आदमी का नहीं मानता. इसके पीढे कितने पागल हैं ? ओर इनको पागल कहा जाए कि शैतान कहा जाए, यह कहना भी मुश्किल हैं. 

सरदार पटेलांनी फक्त नथुराम गोडसे यालाच मुर्ख आणि राक्षसी म्हणलं नव्हत तर त्या वृत्तीवर बोट ठेवून भाष्य केलं होतं पुढे ते म्हणतात, 

जब तक आप लोग अपने दिल साफ कर हिम्मत से इसका मुकाबला नहीं करेंगे, तब तक काम नहीं चलेगा. अगर हमारे घर में ऐसे छोटे बच्चे हों, घर में ऐसे नौजवान हों, जो उस रास्ते पर जाना पसंद करते हों तो उनको कहना चाहिए कि यह बुरा रास्ता है और तुम हमारे साथ नहीं रह सकते.’ 

यापुढे सरदार पटेल म्हणतात की, 

‘उसने एक बूढ़े बदन पर गोली नहीं चलाई, यह गोली तो हिंदुस्तान के मर्म स्थान पर चलाई गई है. और इससे हिंदुस्तान को जो भारी जख्म लगा है, उसके भरने में बहुत समय लगेगा. बहुत बुरा काम किया. लेकिन इतनी शरम की बात होते हुए भी हमारे बदकिस्मत मुल्क में कई लोग ऐसे हैं तो उसमें भी कोई बहादुरी समझते हैं.’

 संदर्भ : भारत की एकता का निर्माण, पृष्ठ 158. 

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.