पानिपतातील युद्धात जीव वाचवून आलेल्या पुणेकर सरदारांसाठी लकडी पूल बनवला गेला.

मराठी साम्राज्याच्या इतिहासात पानीपत युद्धात झालेला पराभव हि न विसरता येण्यासारखी गोष्ट. १७६१ साली तिसऱ्या पानीपत युद्धात मराठ्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवाच वर्णन करताना, दोन मोती गळाले, सत्तावीस मोहोर हरवली आणि रुपये खुर्दा किती गेला, सव्वा लाख बांगडी फुटली असे केले जाते. दोन मोता म्हणजे सदाशिवराव भाऊ आणि विश्वासराव पेशवे, सत्तावीस मोहोर म्हणजे सरदार.

याच पराभवातून माघारी फिरलेले सैन्य जेव्हा पुण्यात येणार होते तेव्हा पराभूत सैन्याला दगडी पूलावरुन कसा प्रवेश द्यावा याचा असा विचार नानासाहेब पेशवे यांच्या मनात आला व त्यातूनच लकडी पुलाच बांधकाम करण्यात आल्याचा तर्क बांधण्यात येतो. 

पानीपतच्या युद्धावर जात असताना वाटेतच नानासाहेब पेशव्यांना पानीपताच्या युद्धात पराभव झाल्याची बातमी समजली.

उद्विग्न मनाने ते पुण्यात परत आले. त्या काळी पुण्यात प्रवेश करण्यासाठी एकमेव पुल होता तो दगडी पूल. कोणत्याही युद्धात झालेल्या विजयानंतर मराठा सैन्य याच पूलावरुन पुण्यात प्रवेश करायचे. सध्या कसबा पेठेतून कोर्टाकडे जाणारा जो डेंगळे पूल आहे त्या पुलाच्या खालीच दगडी पूलाचे अवशेष सापडतात.

दिनांक ४ जून १७६१ रोजी नानासाहेब पेशवे पुण्यात आल्याची नोंद आढळते. त्यांची प्रकृती या दरम्यान ढासळत गेली. त्यांना निट चालता देखील येत नव्हते. पानीपत युद्धात झालेला पराभव नानासाहेब पेशव्यांच्या जिव्हारी लागला होता. त्यात आत्ता पराभूत सैन्याला पुणे शहरात प्रवेश कसा द्यावा याची चिंता देखील नानासाहेबांना होती असा तर्क लावला जातो.

पानिपतातून जीव वाचवून आलेले पुणेकर सरदार जुन्या पुलावरून शहरात येण्यास तयार नव्हते.

त्यातूनच नानासाहेब पेशव्यांनी पुण्याच्या पश्चिमेला ताबडतोब पूल बांधण्याची आज्ञा दिली. दगड व विटांचा वापर करुन पूल बांधायचा झाला तर त्यास उशीर लागला असता म्हणून नानासाहेबांनी तात्काळ लकडी पूल बांधण्याची आज्ञा केली.

अवघ्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये लकडी पूल उभा करण्यात आला होता.

समोरील पुलावरून पराभूत सैन्याला प्रवेश देण्याऐवजी तो पश्चिमेकडून द्यावा म्हणूनच लकडी पूल बांधण्यात आला व त्या पुलावरुनच पराभूत सैन्याला पुणे शहरात प्रवेश देण्यात आल्याच सांगण्यात येतं. मात्र इतिहासकरांच्या मते हे फक्त तर्क होते. इतक्या गडबडीत नानासाहेब पेशव्यांनी लकडी पूल का बांधण्यास घेतला याबाबत लावण्यात आलेला हा फक्त अंदाज असून,

दूसरा अंदाज असाही लावला जातो की नानासाहेब पेशवे हे पुण्याच्या नियोजनात आघाडीवर होते. शेवटच्या घटकेत पुण्याच्या पश्चिम बाजूस पूल बांधण्यात येवून शहराची हद्द वाढेल असा त्यांनी अंदाज लावला होता व त्यातूनच त्यांनी या पूलाचे बांधकाम मनावर घेतले. इतक्या जलद लकडी पूल बांधला तर येणाऱ्या काळात तो पूल कोणी पाडणार नाही तर त्याहूनही अधिक भक्कम पूल उभा करेल असा अंदाज त्यांना होता. पुढे ८० वर्षांनंतर लकडी पुलाच्या ठिकाणी इंग्रजांनी दगडी पूल बांधला.

संदर्भ : हरवलेले पुणे, डॉ. अविनाश सोवनी. 

हे ही वाचा.  

2 Comments
  1. Navneet Bhairi says

    Vishwas gela panipat chya yuddhat hi mhan kuthun & ka Suruwat zali kalel kay

Leave A Reply

Your email address will not be published.