१० मिनिटांची डिलिव्हरी कंसेप्ट गेम चेंजर ठरली अन आता मार्केटमध्ये झेप्टोची हवा आहे
टेक्नॉलॉजी आली आणि माणूस स्मार्ट होत गेला…म्हणजे कसं घरचा किराणा संपल्यावर आता पिशवी घेऊन आपण बाजूच्या किराणा दुकानात जात नाही…थेट मोबाईलवरून ऑर्डर करतो….१५ -२० मिनिटात डिलिव्हरी तुमच्या दारात..वरून प्रोडक्टवर डिस्काऊंट पण मिळतं…
यात डंझो, स्विगी, बिग बास्केट, फार्मइझी, ऍमेझॉन पॅन्ट्री अशा सगळ्या कंपन्या आहेत. पण या सगळ्यात फॉर्म मध्ये आहे ते म्हणजे झेप्टो.. फक्त १० मिनिटात घरपोच किराणा डिलिव्हर करणारं झेप्टो हे मुंबईच्या अवघ्या १९ वर्षांच्या २ मित्रांनी सुरु केलं.
झेप्टो बिझनेस मॉडेलची फक्त १० मिनिटांची डिलिव्हरीची कंसेप्ट गेम चेंजर ठरली आणि या झेप्टोने अशी काही झेप घेतलीये की सगळ्या इ कॉमर्स कंपन्यांना मागे टाकत झेप्टो आज मार्केट लीडर बनलंय..
पण त्यासाठी झेप्टोचं बिझनेस मॉडेल काय हे पाहून घेऊया…
आत्ता तुमचा मोबाईल चेक करा…तुम्हाला ऑनलाईन सामान ऑर्डर करण्याची सवय असेल तर तुमच्या मोबाईल मध्ये फक्त एकच शॉपिंग ॲप नसणार तर किमान २-३ ॲप असतील. जर तुम्ही डंझो वापरत असाल तर तुम्ही बिग बास्केट पण वापरता… एवढेच नाही तर तुमच्या मोबाईल मध्ये स्विगी पण असेल. तुम्हाला पटेल तसं तुम्हे त्या ॲपवरून वस्तू ऑर्डर करत असणार..मग प्रश्न हा पडतो कि, असं का असेल?
याच कारण असंय कि, डंझो, स्विगी, बिग बास्केट, ऍमेझॉन पॅन्ट्री या सगळ्यांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे ते म्हणजे कस्टमर्स यां कंपन्यांशी लॉयल का नाहीयेत ? त्याच उत्तर म्हणजे या कंपन्यांमध्ये ग्राहकांना डिस्काउंट देण्याची चढाओढ लागलेली असते. आपण म्हणलं ना ग्राहक दिवसेंदिवस स्मार्ट होत चाललाय. सिम्पल आहे, जिथे जास्त डिस्काउंट तिथूनच तुम्ही ऑर्डर करणार ना….पण या सगळ्यात झेप्टोची एंट्री होते.
मुंबईचा आदित पाली आणि त्याचा बालपणीचा मित्र कैवल्य वोहरा यां दोघा मित्रांनी मिळून वयाच्या १९ व्या हे स्टार्टअप सुरु केलं.
स्टॅन्डफोर्ड युनिव्हर्सिटीमधल शिक्षण सोडलं आणि भारतात परतले आणि सप्टेंबर २०२० मध्ये किराणा मार्ट नावाचं ग्रोसरी डिलिव्हरी स्टार्टअप सुरु केलं. २०२१ मध्ये किराणा कार्ट झेप्टो बनून समोर आलं. तसा झेप्टोच्या ग्रोथ मध्ये लॉकडाऊन चा मोठा रोल आहे.
लॉकडाऊनमध्ये लोकांना जीवनावश्यक वस्तू मिळत नव्हत्या, ऑर्डर केलं तरी २-२ दिवस डिलिव्हरी येत नव्हती. मग या दोघांना एक आयडिया सुचली ती म्हणजे किराणा मार्टची. किराणा कार्टचे मॉडेल बेसिक होतं. किराणा कार्टने लॉकडाऊन मध्ये लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करायला सुरुवात केली. आणि बघता बघता त्यांची एक गोष्ट लक्षात यायला लागली कि ऑर्डरची डिलिव्हरी व्हायला ४५ मिनिट ते १ तास लागतो. जी डिलिव्हरी एका तासात व्हायची त्या कस्टमर्स ची ऑर्डर पुन्हा यायची नाही आणि ज्या डिलिव्हरीज २०-२५ मिनिटात पोहचत होती त्या कस्टमर्सची रिपीट ऑर्डर येत होती. रिपीट ऑर्डर येण्याचे प्रमाण हे ४० ते ५० टक्के होतं. आणि याच पॉईंट नंतर ग्रोसरी डिलिव्हरी ॲपच्या क्षेत्रात सगळे गणितच बदलली.
मार्केटची सटीक गरज लक्षात घेऊन या दोघांनी किराणा कार्टला बाजूला ठेवलं अन झेप्टो समोर आणलं.
आधीच मार्केटमध्ये बिगबास्केट, डन्झो, स्विगी इन्स्टा मार्ट, अँमझोन सारख्या कंपन्या ठाण मांडून होत्या. पण त्या क्विक डिलिव्हरी देत नव्हत्या. आणि म्हणूनच झेप्टोच्या १० मिनिटाच्या डिलिव्हरीमुळे सगळं मार्केटचा सगळा गेमच बदलला. आता प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे इतर मोठ्या कंपन्या डिलिव्हरी साठी एक ते तीन तास लावत असतात, पण तेच झेप्टोला १० मिनिटात कसे शक्य होते ? तर झेप्टोची स्ट्रॅटेजी लक्षात घेणं महत्वाचं आहे…
तर यामागे ‘The DARK STORE’ या मॉडेल चा हात आहे. पण हे मॉडेल नेमके काम कसे करते. त्यासाठी ३ गोष्टी पाहणं महत्वाचं आहे. पहिलं म्हणजे BUYING PATTERN- ज्या ठिकाणी झेप्टो आपली सर्व्हिस देतं तिथल्या लोकेशनवर ग्राहकांच्या मागणीचा अभ्यास केला जातो…म्हणजेच लोकांना नेमकं काय खरेदी करायचं आहे याबाबत विचार केला जातो.
दुसरं म्हणजे याचाही विचार केला जातो की, त्या लोकेशनवर कस्टमर्सची PURCHASE FREQUENCY कशीये ? थोडक्यात कितीवेळा तिथे ऑर्डर केल्या जातात.
आणि तिसऱ्या गोष्टीचा अभ्यास केला जातो तो म्हणजे तेथील लोकांची SPENDING CAPACITY कशी आहे. म्हणजेच त्या लोकेशनवरची लोकं किती पैसा खर्च करून शकतात. तर या तिन्ही गोष्टींचं ऍनालिसिस केल्यानंतर अजून एका बाबीचा विचार केला जातो तो म्हणजे ‘location engineering’.
झेप्टो जेंव्हा नवीन लोकेशनवर सर्व्हिस द्यायला सुरुवात करतं तेंव्हा त्या एरियातला ट्राफिक रूट्स लक्षात घेते. कारण त्या ठिकाणी डिलिव्हरी द्यायला किती वेळ लागू शकतो. त्यासोबतच तेथील रियल इस्टेट रेट्स कसे आहेत याचाही विचार केला जातो आणि त्याच आधारे कंपनीचा ऍव्हरेज डिलिव्हरी टाईम आणि प्राईझ तेथील लोकांना परवडतं का ? याचाही विचार केला जातो.
या सगळ्या बाबींचा अभ्यास केल्यानंतर मध्यवर्ती ठिकाणी DARK STORE नावाचे मिनी वेअरहाऊस म्हणजे गोडाऊन सुरु केले जातात. त्यानुसार ३ किलोमीटरच्या जवळपासच्या ग्राहकांना सर्व्हिस देण्याची कॅपिसिटी या गोडाऊनकडे असते. ज्या भागात स्विगी, इंस्टामार्ट, १५-२० मिनिटात डिलिव्हरी करतात त्याच भागात झेप्टो ६ ते १० मिनिटात डिलिव्हरी करते. इंटेररेस्टिंग म्हणजे तसं तर दोन्हीच्या डिलिव्हरी बॉय ला डिलिव्हरी करण्यासाठी लागणारा वेळ आहे तो फक्त ६-७ मिनिटाचाच असतो तर मग फरक नेमका कुठे निर्माण होतो ? याच उत्तर म्हणजे PPB फॉर्मुला.
याचे उत्तर दडले आहे PPB फॉर्मुला मध्ये. पहिला P – Picking. झेप्टो च्या सर्व स्टोरमधे picking खूप जास्त लवकर होते. झेप्टो स्टोर मधल्या सर्व कर्मचाऱ्यांना टॅबलेट पुरवले जातात ज्यावर ग्राहकांनी केलेली ऑर्डर कळते. त्यासोबतच आलेल्या ऑर्डरशी संबंधीत वस्तूचे स्टोरमधील लोकेशन त्या कर्मचाऱ्यांना त्वरित कळत असते. त्यामुळे होते असे कि picking साठी लागणारा वेळ हा कमी लागतो. Picking झाल्यावर लगेचच packing केले जाते. आणि नंतर bagging केले जाते. ही सगळी प्रोसेस फक्त ६० सेकंदात पार पडते. आणि हाच संपूर्ण पॅटर्न झेप्टोच्या यशाचं गमक आहे.
कोणत्याही बिसनेस मॉडेलला सक्सेसफुल करण्यामागे त्याच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीचा हात असतो. याच मार्केटिंग स्ट्रॅटेजीच्या जोरावर झेप्टोने आज जवळपास ४ हजार कोटींचा टप्पा पार केलाय.
जे आदित आणि कैवल्यने डोकं लावलं ते बघून आपणही बिझनेस करू शकतोय फक्त हिंमत पाहिजे…मग असंच काहीतरी हटके करा. जेणेकरून तुमचे बिझनेस मॉडेल पाहून आणखी चार लोकांना व्यवसायात उतरण्याची प्रेरणा मिळेल.
हे हि वाच भिडू :
- आघाडी सरकार अस्थिर करु शकण्यासाठी हे ५ मुद्दे कारणीभूत ठरू शकतात
- जगभरातल्या दहशतवाद्यांकडे TOYOTA चे हायलक्स पिकअप-ट्रक्स कसे पोहचायचे..
- बांबू लागवडीतून ४ ते ५ कोटींचे उत्पन्न शक्य आहे…? वाचा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे अनुभव