बिझनेस चालवून निवांत आयुष्य जगता आलं असतं मात्र त्यांना नाद होता तो फक्त देशसेवेचाच.

तामिळनाडू मधील कोण्णूर जवळ झालेल्या हेलिकॉप्टर क्रॅश मध्ये बिपीन रावत यांच्याबरोबर अन्य ११ जवानही शहिद झालेत . अशी बातमी माध्यमांत झळकतेय. मात्र देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शहिदांचा नुसता ‘अन्य’ म्ह्णून उल्लेख करने न्यायं ठरणार नाही. ब्रिगेडियर एलएस लिडर,
लेफ्टनंट कर्नल एच सिंग, विंग कमांडर पृथ्वी सिंह चौहान, स्क्वाड्रन लीडर  के सिंग,जेडब्ल्यूओ दास
जेडब्ल्यूओ प्रदीप ए,हवलदार सतपाल,एनके गुरसेवक सिंग,एनके जितेंद्र, लान्स नायक विवेक,एस तेजा हे हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये शहीद झालेत.

या सर्वांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचे पायलट होते विंग कमांडर पृथ्वी सिंह. पट्टीचे पायलट असल्यामुळचं आर्मीच्या  सर्वोच्च अधिकाऱ्यांचं सारथ्य करण्याची जबाबदारी पृथ्वी सिंहांकडे देण्यात आला होतं.

मात्र कालचे कोईम्बतूर ते वेलिंग्टन हे त्यांचे अखेरचे उड्डाण ठरले. पृथ्वी सिंह चालवत असलेले Mi-17 V5 हेलिकॉप्टर पुढच्या १० मिनिटातच ठरलेल्या ठिकाणी पोहचणार होते मात्र त्याआधीच त्यांच्यावर काळाने झडप घातली.

अगदी लहानपणापासूनच पृथ्वी सिंहाना लष्करात जाण्याचं वेड होतं. आठवीत असतानाच मध्यप्रदेशातील रेवा येथील सैनिक शाळेत प्रवेश घेतला होता.

पृथ्वी सिंहांच्या वडिलांचा यशस्वी बेकरीऊद्योग आहे. त्यांचा बीटा ब्रेड हा आजूबाजूंच्या जिल्ह्यात  ब्रँड आहे.

एकुलता एक मुलगा असणाऱ्या पृथ्वी सिंहांना घरचा व्यवसायचं चालवून निवांत आयुष्य जगणं सहज शक्य होतं.  मात्र पृथ्वी सिंहांना नाद होता तो फक्त देशसेवेचाच.

लष्करातील करियर 

विंग कमांडर पृथ्वी सिंह चौहान यांच्या लष्करी कारकिर्दीची सुरुवात पुण्याच्या  नॅशनल डिफेन्स अकादमी (NDA) मध्ये निवड झाल्यापासून झाली.

एनडीए मध्ये टॉप मारल्यानंतर  पृथ्वी सिंह  2000 मध्ये भारतीय हवाई दलात दाखल झाले.

त्यांची पहिली पोस्टिंग हैदराबादमध्ये झाली. यानंतर त्यांना गोरखपूर, गुवाहाटी, उधम सिंग नगर, जामनगर, अंदमान आणि निकोबारसह अन्य हवाई दलाच्या स्थानकांवर तैनात करण्यात आले. त्याला एका वर्षाच्या विशेष प्रशिक्षणासाठी सुदानलाही पाठवण्यात आलं होतं.

टीव्हीवर आज पृथ्वी सिंहांच्या परिवाराचा आक्रोश पाहून अख्खा देश सुन्न झालाय. चौहान घराण्याने आज त्यांचा एकुलता एक मुलगा गमावलाय . चार बहिणींनंतर पृथ्वी सिंह हे घरातील सगळ्यात लहान सदस्य होते. बहिणांना त्याचा भाऊ आपल्यात नाहीए या गोष्टीवर अजूनही विश्वास बसत नाहीए.

मागच्याच रक्षाबंधनाला तब्बल ३२ वर्षातून ५ बहीणभावंड एकत्र आले होते अशी आठवण त्यांची बहीण शकुंतला सांगतात.

बहिणींचा एकही शब्द ते मोडत नव्हते. बहिणींनी बोट दाखवयचं आणि पृथ्वी सिंहांनी ते त्यांच्यापुढे आणून ठेवायचं. हे असा सगळं द्रुष्ट लागण्यासारखं.

२००७ मध्ये पृथ्वीसिहांचा लग्न झालं होतं. पृथ्वी सिहांच्या जाण्याने त्यांचा ९ वर्षाचा मुलगा आणि १२ वर्षाची मुलगी अनाथ झालेत. आता या चिमुकल्याना सांभाळण्याची जबाबदारी पृथ्वीसिंहांच्या पत्नीला एकट्यानेच पार पाडावी लागणार आहे. 

जवळपास अशीच अवस्था हेलिकॉप्टर अफघातात धारातीर्थी पडलेल्या इतर सैनिकांच्या घरी असणार आहे. जेव्हा देश एक सैनिक गमावतो तेव्हा एक कुटुंब एक मुलगा, एक भाऊ आणि एक बाप हि गमावत असतो. जेव्हा घरदार मागे सोडून एक सैनिक सैन्यात दाखल होत असतो तेव्हा अश्या अपघातांनंतर सैनिकांच्या कुटुंबियांच्या मागे खंबीरपणे उभं राहणे शहीद सैनिकांना खरी मानवंदना ठरेल.

 

English Summary: His first posting was in Hyderabad. He was later deployed to other Air Force bases including Gorakhpur, Guwahati, Udham Singh Nagar, Jamnagar, Andaman, and Nicobar. He was also sent to Sudan for one year of special training.

 

Web title: tragic story of wing commander PS Chauhan who died in a helicopter crash

Leave A Reply

Your email address will not be published.