मुंबई-पुणे एअर क्वालिटी इंडेक्समध्ये दिल्लीला मागे टाकतयं ? सावध ऐका पुढल्या हाका!

आत्तापर्यंत हवा प्रदुषण म्हणलं की, आपल्या डोळ्यासमोर देशाची राजधानी दिल्ली यायची. पण, आता तर आपली मुंबई सुध्दा या पंगतीत येऊन बसलीय. मुंबईच्या हवेचा दर्जा मागच्या काही वर्षापासुन सतत खालावत आहे. मुंबईतच नाही तर महाराष्ट्रातील अनेक मेट्रो सिटीत हेच अनुभवयाला मिळत आहे. एअर क्वालिटी इंडेक्सनुसार, मुंबईचा सध्याच्या प्रदुषणाचा आकडा १२७ एवढा आहे. त्यामुळे आता दिल्ली सारखं प्रदुषण महाराष्ट्रातही होतंय का? ही चिंता सर्वांनाच वाटतीये.

 

यामुळे अनेक आजारही वाढत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. दिल्लीपेक्षा मुंबई पुण्यात हवेचं प्रदुषण कसं वाढलं?  प्रदुषणामुळे कोणकोणत्या आजारांना सामोरं जावं लागत आहे? प्रदुषणाचे प्रमाण कसं मोजलं जातं?  प्रदुषण कमी कसं केलं जाऊ शकतं? याची माहिती घेऊयात.

 

दिवसेंदिवस मुंबई आणि पुण्याचा प्रदुषणात सतत वाढ होतेय, त्यामुळे AQI पण दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईच्या प्रदुषणचा आकडा १२७ AIQ एवढा आहे तर, पुण्याचा १७८ आणि दिल्लीचा ११० AIQ एवढा. एक्यूआय सतत वाढतोय, त्यामुळे लोकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल AQI म्हणजे काय.. तर सुरूवातीला हे AQI काय असतं समजुन घेऊयात..

 

AQI म्हणजे ज्या माध्यमातून हवेची गुणवत्ता तपासली जाते ते यंत्र. मुळात प्रदुषण मोजण्यासाठी एक्यूआय नावाचं एक विशिष्ट एकक असतं. एक्यूआय म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स. हा एक्यूआय जितका कमी असतो तितकं त्या शहरातील वातावरण चांगलं असतं. आकडेवारीत सांगायचं झालं तर,

 

WhatsApp Image 2023 10 26 at 12.39.07 PM

 

पावसाळा संपून हिवाळा सुरु झाला की, या दिवसांमध्ये मुंबई आणि पुणे शहरातील दूषित हवेचं प्रमाण दिल्लीपेक्षाही वाढतं. पाठीमागच्या चार वर्षांचा विचार केला तर मुंबई आणि पुणे शहर हे भारतातील सर्वाधिक प्रदुषणाच्या यादीत आलेले शहरं आहेत. या वाढत्या प्रदुषणामुळे दिवसेंदिवस आजारी पडण्याचही प्रमाण वाढलं आहे. पुणे आणि मुंबईमधील नागरीकांना या प्रदुषणामुळे दमा, कर्करोग, बेशुध्द पडणं, घसा खवखवणे, डोळ्यातून पाणी येणं या आजरांना सामोरं जावं लागत आहे.

 

मुंबई आणि पुण्याची वर्षानुवर्ष विषारी बनत असलेल्या हवेनं, अनेक जण अजारी तर पडत आहेत. मागच्या दोन वर्षात मुंबईत हवा प्रदुषणामुळे जवळपास १४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच हवा प्रदुषणामुळे लोकांचा जीवच नाही तर, ग्रीनपीस या आंतरराष्ट्रीय पर्यावरणविषयक संस्थेच्या अहवालातून, समोर आलेल्या माहितीनुसार हवा प्रदुषणामुळे आर्थिक फटकाही बसतोय.

 

आता मुद्दा येतो तो म्हणजे महाराष्ट्रातील या प्रमुख शहरांची हवा प्रदुषित होण्याची कारण नेमकी काय आहेत? त्यातलं पहिलं कारण म्हणजे नैसर्गिक वातावरणात होणारा बदल.

 

मागच्या चार वर्षापासुन वातावरणातला बदल हे प्रदुषण वाढण्यास मुख्य कारण असल्याच तज्ञांच म्हणणं आहे. वातावरणातील वाऱ्यामध्ये होणार नेहमीचा बदल, हाच या वायू प्रदुषणाला कारणीभूत ठरतोय. नेहमीप्रमाणे हिवाळ्यात थंड वारे वाहायला सुरूवात होते. पण, मागच्या काही वर्षात लि-निनोमुळे हे वारे वाहण्यास अडथळे येत आहेत. म्हणजे ते वारे मंद गतीने वाहत आहेत. मुंबईतील वारे हे जमिनीकडून समुद्राकडे आणि समुद्राकडून जमिनीकडे असा फेरा आधी ३-४ दिवसात पूर्ण करायचे, पण आता तो वेळ कधी आठवडाभर तर कधी कधी तब्बल १० दिवसांचा लागतोय.

 

त्यामुळं होतंय असं की, शहरातील दूषित हवा ही शहराच्यावरच बराच काळ फिरत राहतेय. त्यामुळं या ए.क्यू.आयमध्ये वाढ होतेय. त्यामुळे धुळीचे कण मुंबई आणि परिसरातच अधिक प्रमाणात राहत आहेत. जे की सर्वदूर जायला हवे होते. शिवाय समुद्रात गेल्या काही वर्षापासुन थंडीच्या दिवसात, हवेचं प्रमाण कमी आणि तापमान अधिक वाढत आहे. त्यामुळे प्रदुषित घटक सहजपणे मिसळून जात नाही. त्याचा परिणाम हवा प्रदूषणावर होत आहे.

 

मुंबई आणि पुण्याच्या हवेत बदल होण्याचं दूसरं कारण म्हणजे वाढणारी बांधकाम आणि उद्योगधंदे..

 

पुणे आणि मुंबई या शहरात महाराष्ट्रातीलच नाही तर, देशातील वेगवेगळ्या राज्यातील लोक याठिकाणी कामासाठी येत असतात. नोकरीसाठी येणाऱ्या लोकांच्या संख्येबरोबर वाहनांची संख्याही वाढत आहे. या दोन मोठ्या शहरातील वाहनांव्यतिरिक्त इतर शहरातील ट्रान्सपोर्ट वाहनंही शहरात येतात. त्या वाहनांतून निघणारा धूर हे हेवेत पसरल्यानेही प्रदुषणाची टक्केवारी वाढत आहे. मागच्या काही वर्षात जर आपण बघितलं तर या दोन शहरात अनेक मोठ मोठे प्रोजेक्ट सुरू आहेत. त्यामुळेही प्रदुषणाच्या आकडेवारीत वाढ झाल्याचं बोललं जात आहे.

 

त्यात पहिल्यांदा मुंबईचा विचार केला तर, मुंबई महापालिकेच्या प्रदुषण अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार नवी मुंबईत प्रदुषणाचं प्रमाण अधिक आहे कारण, त्याठिकाणी सध्या नवीन अंतरराष्ट्रीय विमानतळ बांधण्याचं काम सुरू आहे. मुंबईसारख्या वाढणाऱ्या मेट्रोसिटीमध्ये बांधकाम व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढणं हे स्वाभाविकच आहे.

 

नवीन इमारतीसाठी डोंगरावरील माती खोदण्याचं काम सुरू आहे. या कामामुळे बारीक धुळीचे कण हवेत पसरत असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. एकूण वायू प्रदूषणातील ७२ टक्के प्रदुषण हे मुंबईतील धुळीमूळे होतंय असं २०२१ साली प्रदूषण विभागाने जाहिर केलेल्या अहवालात म्हटलं आहे. २०१० मध्ये हे प्रमाण फक्त २८% इतकंच होतं. शहरातील हवेतील धुळीचं प्रमाण हे वाढत्या बांधकामांमुळंच अधिक वाढतं. या बांधकामांमध्ये फक्त इमारतींचाच समावेश होतो असं नाहीये.

 

मुंबईमध्ये अनेक मोठे मोठे पायाभूत सुविधांच्या बांधकामाचंही काम सुरू आहे. त्यात प्रामुख्यानं मुंबई मेट्रो, गोरेगाव-मुलुंड लिंक रोड, अनेक उड्डाणपूलांच्या दुरूस्तीची कामं अशी अनेक कामंही यासाठी कारणीभूत आहेत. नैसर्गिक बदल, वाढते उद्योग आणि वाहनांची वाढती संख्या बघता या कारणांमुळे मुंबई आणि परिसरात हवा प्रदुषणाचं प्रमाण वाढलं आहे.

 

मुंबई प्रमाणेच पुण्यातील प्रदुषणाचे आकडे वाढण्याची कारणही सेम आहेत. कारण गेल्या अनेक दिवसांपासुन पुणे शहरात मेट्रोच काम सुरू आहे. त्यामुळे शहरातील अनेक ठीकाणी खोदकाम सुरू आहे. तसेच मातीची ढीगारे वाहून नेणाऱ्या ट्रकची संख्याही वाढली आहे. शिवाय पुण्यात आता खासगी केमीकल कंपन्याही वाढल्या, त्यामुळेही त्यातून निघणारा दूषित धूर प्रदुषण वाढण्याचं कारण सांगितलं जातं.

 

शहरात वाढणाऱ्या लोकसंख्यमुळेही प्रदुषण वाढण्याची कारणं सांगितली जातात. कारण लोकसंख्या वाढल्यामुळे खासगी वाहनांची संख्याही वाढली आहे. पुणे शहरातील केवळ १९ टक्के नागरिक प्रवासासाठी सार्वजनिक वाहतूकीचा उपयोग करतात, तर ८१ टक्के नागरिक हे खासगी वाहनांचा उपयोग करतात. त्यातही एका वाहनातून एकच प्रवासी प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळेही या ठिकाणच्या हवा प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे…

 

या वाढत्या प्रदूषणासंदर्भात जेव्हा बोलभिडूने पर्यावरण अभ्यासक डॉ. मनोज सुर्यवंशी यांच्याशी संपर्क केला तेव्हा ते म्हणाले,

प्रदूषण होण्याला वातावरणातील बदल तसेच वाढते उद्योग कारणीभूत आहेत. तसेच शहरात स्थापन झालेल्या या सायजिंग व डाईंग कंपन्यांमध्ये तयार होणारा कार्बन डायऑक्‍साईड हा विषारी वायू सोडण्यासाठी चिमण्या उभारण्यात आल्या आहेत.

 

सरकारी नियमानुसार या चिमण्यांची उंची सर्वसाधारण ९० ते १२० फूट असणे आवश्‍यक आहे. परंतु, येथील चिमण्यांची उंची फक्त ७० ते ८० फूट किंवा त्याहून कमी उंची असल्याचे आढळून आल आहे. त्याचबरोबर कंपन्यांमध्ये असलेल्या बॉयलरमध्ये कोळसा टाकणे आवश्‍यक असताना काही डाईंग कंपन्या आर्थिक बचतीसाठी कोळशाऐवजी प्लास्टिक, फायबर, कपड्याच्या चिंध्या, भंगार जाळतात. ज्यामुळे याच्या धुराने मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषण होऊ शकतं.

 

आता या प्रदूषणावर नियंत्रण करण्यासाठी किंवा यातून सुटका कशी मिळू शकते तर, या प्रदूषणावर नियंत्रण करण्यासाठी सफर सारखी संस्थाही वेगवेगळे प्रयोग राबवत आहे त्यामध्ये सहभागी होणे. तसेच शहरातील महानगरपालिका तसेच,

 

प्रशासनाने दिलेले सर्व सूचनाचं पालन करणे, पर्यावरण पुरक असणाऱ्या गोष्टी म्हणजे इलेक्ट्रीक बाईक किंवा इलेक्ट्रीक वाहनांचा वापर करणे.

 

या सर्व गोष्टी कराव्या लागणार आहेत. तेव्हा कुठे काही प्रमाणात हवा प्रदूषण कमी होईल.

 

हे ही वाच भिडू:

असा कोणता विकास होतोय की पर्यावरणाच्या रँकिंगमध्ये भारताचा 180 वा नंबर आलाय..

महाराष्ट्राचा मांझी : ज्यांनी एकट्याच्या जीवावर अभयारण्य निर्माण केलं !

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.