प्रियांकाताई, निक भाऊजी सरोगसीद्वारे पालक झाले पण सरोगसीचे भारतातले काय नियम आहेत?

अलीकडेच प्रियांकाताईने अन निक भाऊजींनी त्यांना मुलगी झाल्याची गुड न्यूज दिली…फक्त न्यूज च नाही तर खुद्द प्रियांकाने पोस्ट लिहीत याची माहिती देखील दिली आहे कि, प्रियांका आणि निक जोनस हे दोघे सरोगसीद्वारे पालक झाले आहेत…..

२०१८ मध्ये दोघांचे लग्न झाले होते. सरोगसी तंत्राच्या मदतीने आई बनणारी प्रियांका काय पहिलीच नाहीये, तिच्या आधी देखील बॉलिवूडमधले अनेक जोडपे सरोगसीद्वारे पालक झालेत.  प्रीती झिंटा, शिल्पा शेट्टी, शाहरुख खान, आमिर खान, करण जोहर, एकता कपूर आणि तुषार कपूर यांसारखे अनेक स्टार सरोगसीच्या मदतीने पालक बनलेत. त्यांच्याकडे पाहून अनेकांनी सरोगसी पालक होण्याचा निर्णय घेतला आहे…तुमच्या ओळखीत देखील कुणाला सरोगसी द्वारे मुल जन्माला घालायचं असेल तर हे मात्र माहिती असू द्या कि,

पण सरोगसी म्हणजे काय आणि भारतात त्याचे काय नियम आहेत ?

सोपंय…सरोगसी म्हणजे दुसऱ्या महिलेचं गर्भाशय भाड्यानं घेऊन तिच्या मदतीनं मूल जन्माला घालणे. ज्या दाम्पत्याला काही कारणांमुळे मूल होऊ शकत नाही त्यांना सरोगसीच्या माध्यमातून मूल जन्माला घालता येते. काही महिला किंवा काही पुरुष मूल जन्माला घालण्यासाठी सक्षम नसल्यामुळे किंवा याआधी अबॉर्शन झाल्यामुळे काही कपल्स मूल जन्माला घालू शकत नाहीत. पण तरीही त्यांच्यासमोर एक पर्याय असतोच असतो म्हणजे सरोगसीचा पर्याय.

सरोगसीद्वारे मूल होण्यामागे अनेक कारणे आहेत. जसे कि, जोडप्याला वैद्यकीय समस्या असल्यास, स्त्रीच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते किंवा गर्भधारणेमुळे कोणतीही समस्या उद्भवू शकते किंवा एखाद्या स्त्रीला स्वतःला मूल होऊ इच्छित नसल्यास ते या पद्धतीने मूल जन्माला घालू शकतात.

आता वळूया हे मूल कोण जन्माला घालतं ? दुस-याचे मूल आपल्या पोटात वाढवणाऱ्या स्त्रीला सरोगेट मदर म्हणतात….या सरोगेट मदर थोडक्यात आपलं गर्भाशय भाड्याने देतात….त्यामुळे बाळाला प्रत्यक्ष जन्म देणारी महिला वेगळी असते….पण त्या बाळावर कायदेशीर हक्क हे दाखवणारे पालक वेगळे असतात.

सरोगसीसाठी, मूल होऊ इच्छिणारे जोडपे आणि सरोगेट मदर यांच्यात एक करार केला जातो. या कराराअंतर्गत, त्या गर्भधारणेतून जन्मलेल्या मुलाचे कायदेशीर पालक मात्र सरोगसी करणारी जोडपं असतं….या कराराअंतर्गत एकदा का मूल जन्माला घातलं कि, जन्म देणाऱ्या मातेचे म्हणजेच सरोगेट आईचे त्या बाळावर कायदेशीर अधिकार नसतात….मात्र मूल होतपर्यंत संपूर्ण ९ महिने सरोगेट मदरची काळजी घेण्याची जबाबदारी त्या दाम्पत्याची असते. मात्र सरोगेट मदर होण्यासाठी त्या महिलेकडे फिट असल्याचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. तसंच दाम्पत्याकडेही ते मूल जन्माला घालण्यासाठी फिट नाहीत असं प्रमाणपत्र देणं गरजेचं आहे. या प्रक्रियेतून जातांना त्या सिरोगेट आईला  गर्भधारणेदरम्यान स्वतःची काळजी घेण्यासाठी आणि वैद्यकीय गरजांसाठी पैसे दिले जातात जेणेकरून ती गर्भधारणेदरम्यान स्वतःची काळजी घेऊ शकेल…

पण यातही दोन प्रकार असतात….

पारंपारिक सरोगसी ज्यामध्ये वडिलांचे स्पर्म आणि बायोलॉजिकल मदरचे म्हणजेच सरोगेट मदरचे   एग्स टेस्ट ट्यूबमध्ये मिसळून सरोगेट मदरच्या गर्भाशयात इन्सर्ट करण्यात येतात याला ‘जेस्टेशनल सरोगसी’ म्हणतात. त्यामुळे बाळाला प्रत्यक्ष जन्म देणारी महिला वेगळी असते. याच महिलेला ‘सरोगेट मदर’ असं म्हंटल जातं.

आणि दुसरी पद्धत म्हणजे, जेस्टेशनल सरोगेसी. हि गर्भधारणा सरोगसी ज्यामध्ये सरोगेट आईचा मुलाशी अनुवांशिक संबंध नसतो…म्हणजेच सरोगेट मदरचे एग्स गरोदरपणात वापरली जात नाही. यामध्ये सरोगेट मदर ही मुलाची बायोलॉजिकल आई नसते. ती फक्त मुलाला जन्म देते. यामध्ये पद्धतीमध्ये वडिलांचे स्पर्म आणि आईची एग्स एकत्र करून… किंवा मग डोनरचे एग्स आणि स्पर्म एकत्र करून ते सरोगेट आईच्या गर्भाशयात इन्सर्ट केले जाते.

पण भारतातील सरोगसी नियम काय आहेत तेही माहिती असू द्या…

१५ जुलै २०१९ रोजी तत्कालीन आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी सरोगसी बिल लोकसभेत सादर केले होते.  दरम्यान २०१९ मध्येच लोकसभेमध्ये सरोगसी रेग्यूलेशन बिल, २०१९ हा कायदा आवाजी मतदानाने पास झाला होता.

सरोगसीच्या प्रक्रियेचे नियमन करण्यासाठी नॅशनल सरोगसी बोर्ड आणि राज्य सरोगसी बोर्ड स्थापन करण्याचं उद्दीष्ट या विधेयकामागे होतं. 

या विधेयकाचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे त्याची नियमण करणारी यंत्रणा, भारतात सरोगसीचा गैरवापर रोखण्यासाठी हे नियम तयार करण्यात आले आहेत…..

भारतात सरोगसीचा गैरवापर रोखण्यासाठी अनेक नियम तयार करण्यात आले आहेत. आर्थिक अडचणींमुळे बहुतांश गरीब महिला सरोगेट माता झाल्या. व्यावसायिक सरोगसी या प्रकारावर आता सरकारने बंदी घातली आहे. २०१९ मध्येच व्यावसायिक सरोगसीवर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर सरोगसीचा पर्याय केवळ मदतीसाठी खुला राहिला आहे. व्यावसायिक सरोगसीवर बंदी घालण्याबरोबरच, नवीन विधेयकाने अल्नारिस्टिक सरोगसीशी संबंधित नियम आणि कायदेही कडक केले आहेत. या अंतर्गत, परदेशी, सिंगल पॅरेण्ट, घटस्फोटित जोडपे, लिव्ह-इन पार्टनर आणि एलजीबीटी समुदायातील लोकांसाठी सरोगसीचे मार्ग बंद करण्यात आले आहेत. सरोगसीसाठी, सरोगेट आईकडे वैद्यकीयदृष्ट्या फिट प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे, तरच ती सरोगेट माता बनू शकते. दुसरीकडे, सरोगसीचा अवलंब करणाऱ्या जोडप्यांकडे ते वंध्यत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र असावे.

भारतात २००२ पासून व्यावसायिक सरोगसीला परवानगी देण्यात आली होती. मात्र, या परवानगी बरोबरच त्यावर कसल्याही प्रकारच्या नियमांची बांधिलकी नसल्याने या परवानगीचा फायदा घेत मोठ्या संख्येने अनेक वंचित महिलांनी आंतरराष्ट्रीय सरोगसीच्या माध्यमातून कमाईचा प्रयत्न केला…थोडक्यात याचा गैरवापर होऊ लागला होता. अनेक महिलांनी याचं बाजारीकरण केलं होतं. कारण आर्थिक अडचणींमुळे बहुतांश गरीब महिला सरोगेट माता झाल्या. 

पण व्यावसायिक सरोगसी या प्रकारावर २०१९ सरकारने बंदी घातली आहे. त्यानंतर सरोगसीचा पर्याय केवळ मदत म्हणूनच आहे. व्यावसायिक सरोगसीवर बंदी घालण्याबरोबरच, नवीन विधेयकाने अल्नारिस्टिक सरोगसीशी संबंधित नियम आणि कायदेही कडक केले आहेत.

हा नवीन कायदा ‘कमर्शियल सरोगसीला’ला रोखतो. परंतु ‘कायदेशीर’ सरोगसीला परवानगी देतो. यानुसार, गर्भधारणेदरम्यान सर्व वैद्यकीय खर्च आणि विमा संरक्षणाव्यतिरिक्त सरोगेट आईला इतर कोणतीही आर्थिक भरपाई दिली जात नाही.

या अंतर्गत, परदेशी, एकल पालक, घटस्फोटित जोडपे, लिव्ह-इन पार्टनर आणि एलजीबीटी समुदायातील लोकांसाठी सरोगसीचे मार्ग बंद करण्यात आले आहेत. जसं कि आपण वर बोललो सरोगसीसाठी, सरोगेट आईकडे मेडिकली फिट असण्याचं प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे, तरच ती सरोगेट माता बनू शकते. दुसरीकडे, सरोगसीचा पर्याय स्वीकार करणाऱ्या जोडप्यांकडे वंध्यत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र असावे लागते. 

त्यात अलीकडेच म्हणजे कोरोनाच्या काळात सरोगसीची प्रकरणे खूप वाढलीत…

कोरोना महामारीनंतर गेल्या दोन वर्षांपासून मंदी आणि बेरोजगारीमुळे सरोगेट मातांच्या संख्येतही वाढ झाली आहे. इतरांच्या घरी सफाईकाम, भांडी किंवा किरकोळ काम करणाऱ्या महिला किंवा कारखान्यात काम करणाऱ्या महिलांनी कमी वेळेत जास्त पैसे कमवण्यासाठी सरोगसीचा अवलंब केला आहे. कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी, मुलांची योग्य काळजी घेण्यासाठी आणि एखाद्याच्या शिक्षणाचा किंवा उपचाराचा खर्च उचलण्यासाठी तरुण वर्गातील महिलांना सरोगसीद्वारे पैसे कमविण्याचा एक सोपा मार्ग दिसतो.,,त्यामुळे या सरोगसी मातांचे प्रमाण वाढले असं काही मीडिया रिपोर्ट्सद्वारे कळतंय..

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.