नागरिकशास्त्रात शब्द ऐकत आलोय पण अँग्लो इंडियन्सचं आपल्या देशात काय स्थान आहे ?

नागरिक शास्त्राच्या पुस्तकात जेव्हा पहिल्यांदा राज्य सभा लोकसभा शिकलो तेव्हा लोकसभेतल्या जागा सांगितलेल्या असायच्या. ५४३ अधिक दोन.. अधिक दोन असं वेगळं मेन्शन केलेलं असायचं.. या दोन जागा असतात अँग्लो इंडियन लोकांसाठी…

तेव्हा अभ्यासापुरतं आकडा पाठ केला खरा पण आता प्रश्न पडला की कोण होते  हे अँग्लो इंडियन्स? लोकसभेत त्यांना राखीव जागा का दिल्या? आपल्या देशात त्यांचं स्थान काय आणि त्यांचा इतिहास काय?

या कम्यूनिटी मधली काही फेमस उदाहरणं सांगायची म्हणजे, रस्कीन बॉन्ड, डायना हेडन, रॉजर बिनी ही काही उदाहरणं आहेत. अँग्लो इंडियन्स कम्यूनिटीचा इतिहास सुमारे २०० वर्ष जुना आहे… भारताच्या संविधानात आर्टिकल ३६६ मध्ये असं लिहिलं गेलंय की,

 An Anglo Indian is a person born or living in india whose father or anyone in the male bloodline was of European descent… 

म्हणजेच Anglo Indian म्हणजे असा व्यक्ती ज्यांचे वडील किंवा त्यांच्या पुरुष वंशावळीतील कोणीतरी एक युरोपियन होते.

आपल्याला अजून एक प्रश्न असा पडतो की अँग्लो इंडियन्स या कम्यूनिटीची भारतात नेमकी संख्या किती आहे.. तर हा आकडा निश्चित असा नाहीये, तरी २०११ च्या जनगणनेनुसार आपल्या देशात साधारणपणे २९६ अँग्लो इंडियन्स राहतात. पण या कम्यूनिटीतल्या लोकांना हा आकडा मान्य नाही… त्यांच्या मते ही संख्या आजही साडे तीन लाख आहे आणि जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला तेव्हा हा आकडा जवळ जवळ २० मिलियन म्हणजेच दोन करोड इतका होता.

अँग्लो इंडियन कम्यूनिटीचे लोकं भारतभर पसरलेले आहेत. पण त्यांची सर्वाधिक संख्या कोलकत्यात होती. कारण कोलकत्ता हे १९११ सालापर्यंत ब्रिटिश ऑफिसर्सचं राहण्याचं ठिकाण होतं, तिथे ब्रिटिशांचं मोठ्या प्रमाणात वास्तव्य असायचं.

आता बघूया की या कम्यूनिटीची सुरवात केव्हापासून झाली.. तर ही गोष्ट आहे १६०० च्या काळातली… ईस्ट इंडिया कंपनी पहिल्यांदा भारतात आली तेव्हा भारतात काही फॅक्टरिज सुरू झाल्या… एक फॅक्टरी आंध्र प्रदेशात होती, एक सूरतमध्ये होती तर एक फॅक्टरी तेव्हाच्या मद्रास म्हणजे आत्ताच्या चेन्नईमध्ये होती.

या फॅक्टऱ्यांमध्ये काम करण्यासाठी अनेक ब्रिटिश लोकांना भारतात बोलावलं जात असे… त्यामुळे अनेक ब्रिटिश तरुण भारतात येऊन सेटल होत असत आणि इथेच आपलं करियर घडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत असत.

तेव्हा मद्रास हे शहर ट्रेडिंग साठी बेस्ट समजलं जायचं. 

आता तिकडून आलेली यंग पोरं इथे येऊन सेटल होणार म्हणजे त्यांच्या लग्नाचं पण जमून यायला पाहिजे. पण इथे विषय काय व्हायचा तर ब्रिटिश महिला काही भारतात यायला तयारच व्हायच्या नाहीत. कारण १६०० च्या काळात युकेवरून भारतात यायचं किंवा भारतातून युकेला जायचं हा प्रवास फार काही सोपा नव्हता त्यामुळे ब्रिटिश महिलांचं भारतात येण्याचं प्रमाण त्याकाळी खूप कमी होतं.

मग या ब्रिटिश यंग पोरांनी पोर्तुगीज आणि फ्रेंच महिलांसोबत लग्न करायला सुरवात केली… त्यावेळी दक्षिण भारतात या फ्रेंच आणि पोर्तुगीजांच्या वस्त्या होत्याच. पण इथे अजून एक प्रॉब्लेम असा झाला की आपल्या धर्मात कशा अनेक जाती आहेत, उपजाती, पंथ आहेत तसं ख्रिश्चन धर्मांतही होतं म्हणजे या फ्रेंच आणि पोर्तुगीज महिला होत्या रोमन कॅथॉलिक पंथाच्या आणि ब्रिटिश पोरं होती प्रोटेस्टंट पंथाची आणि या दोन पंथामध्ये सुद्धा त्याकाळी भांडणं होती… त्यांच्या आपापसातल्या वादाला इंग्लिश रिफॉर्मेशन असं म्हणतात.

या वादामुळे ईस्ट इंडिया कंपनीला या दोन पंथात होणारी लग्न मान्यच नव्हती. मग त्यानंतर युकेमधून आलेल्या ब्रिटिश पोरांनी भारतीय स्थानिक मुलींशी लग्न करायला सुरवात केली. ईस्ट इंडिया कंपनीला हा पर्याय मात्र मान्य होता. फक्त मान्यच नाही त्यांना हा पर्याय इतका आवडला की त्यांनी १६८७ साली एक नवीन पॉलिसीच काढली. 

एका ब्रिटिश ऑफिसरने भारतीय महिलेशी लग्न केलं आणि त्यांना मूल झालं तर ५ रुपयांचं बक्षीस मिळणार अशी ती पॉलिसी होती. त्यांना होणाऱ्या मुलांना त्याकाळी यूरोपीयन्स आणि एशियन्स एकत्र करून युरेशियन्स असं म्हटलं जायचं. हळू हळू संख्या वाढायला लागल्याने त्यांची एक कम्यूनिटी तयार व्हायला लागली, त्यांचा एक समाज तयार झाला आणि आज आपण या समाजाला अँग्लो इंडियन समाज म्हणून ओळखतो.

१८०० च्या काळात अँग्लो इंडियन समाजाची खूप भरभराट व्हायला सुरवात झाली… एकतर लग्नातच ब्रिटिश शासनाकडून बक्षीस मिळत होतं त्यामुळे आर्थिक सुबत्ता होती, शिवाय या समाजातले बरेचसे लोकं आर्मी आणि नेव्हीमध्ये सुद्धा काम करणारे होते. १८०० च्या शेवटाला तर हा समाज इतका पॉप्युलर झाला आणि त्यांची संख्या इतकी वाढली की भारतात राहणाऱ्या इंग्रजांपेक्षाही अँग्लो इंडियन्सच भारतात जास्त होते.

पण याचा परिणाम असा झाला की अँग्लो इंडियन्सची वाढणारी लोकसंख्या आणि त्यांची होणारी भरभराट ब्रिटीशांच्या डोळ्यात खूपायला लागली. त्यांना असं वाटायला लागलं की असंच जर होत राहीलं तर अँग्लो इंडियन लोकं त्यांच्याही पेक्षा अधिक वरचढ ठरायला लागतील.

मग त्यांनी काही नियम काढले. १७८६ साली एक नियम असा बनवला गेला की या समाजाची जी मूलं आहेत त्यांच्या वडिलांचं जर निधन झालं तर ही मुलं शिक्षणासाठी इंग्लंडला जाऊ शकत नाहीत… शिवाय अजून एक नियम असा बनवला गेला की ब्रिटिश आर्मी, नेव्ही, मध्ये अँग्लो इंडियन समाजाच्या मुलांना प्रवेश मिळणार नाही.

जितके पण या समाजाचे लोकं ब्रिटिश आर्मीमध्ये काम करत होते त्या सगळ्यांना त्यांच्या पोजिशन वरून निलंबित करण्यात आलं, त्यांना काढून टाकण्यात आलं. त्यानंतर १८२५ साली या समाजाचे काही लोक एकत्र आले आणि त्यांनी पिटिशन काढलं, समान हक्कांसाठी. यातच एक होते j. w. Ricket जे १८३० साली इंग्लंडला गेले, ब्रिटिश parliament मध्ये जाऊन लढले आणि त्यांना यशही आलं.

त्यावेळी एक नवीन क्लॉज अॅड केला गेला ज्यात असं म्हटलं होतं की all persons regardless of birth or colour were entitled jobs in the civil and military services in india…. म्हणजेच काय तर अँग्लो इंडियन समाजाला भारतातल्या सिविल आणि मिलिटरी सर्विसेसमध्ये सहभागी होण्याची मुभा देण्यात आली.

पुढे मग या समाजाने भारतातल्या अनेक क्षेत्रामध्ये काम करायला सुरवात केली. उदाहरणार्थ ICSE बोर्ड तुम्हाला ऐकून माहीतच असेल, १९५८ साली हे बोर्ड सुरू केलं अँग्लो इंडियन समाजाच्या फ्रँक अॅंथनी यांनी.. पण शिक्षण क्षेत्रात अँग्लो इंडियन कम्यूनिटीचं योगदान खूप आधीपासूनच होतं. म्हणजे अँग्लो इंडियन समाजातल्या लोकांची इच्छा अशी असायची की आपल्या मुलांना इंग्लिश मिडियम मध्ये, चांगल्या इंस्टीट्यूट मध्ये शिकता यावं,

त्यावेळी त्यांचं वास्तव्य मद्रास आणि कोलकत्ता मध्येच जास्त असल्याने त्यांच्यातर्फे तिथे अनेक शाळा आणि कॉलेजेस उभारण्यात आली. गेनार्ड स्कूल, ला मार्टिनेर स्कूल, सेंट झेवियर्स कॉलेज या सगळ्या शाळा आणि कॉलेजेसची सुरवात ही अँग्लो इंडियन समजानेच केली होती. आज ही नावं शिक्षण क्षेत्रात खूप मोठी नावं समजली जातात. आधी ह्या इंस्टीट्यूट्स फक्त या समजापुरत्याच मर्यादित होत्या पण कालांतराने त्या सगळ्यांसाठी खुल्या केल्या गेल्या.

शिक्षणासोबतच, रेल्वे सेक्टर मध्ये सुद्धा अँग्लो इंडियन समाजाने बरीच कामगिरी केली. All india association for anglo Indians नुसार १९२१ साली जवळ जवळ ११,००० अँग्लो इंडियन्स रेल्वेत कामाला होते.

१९४७ साली म्हणजेच भारताला जेव्हा स्वतंत्र्य मिळालं तेव्हा २० मिलियनच्या आसपास अँग्लो इंडियन्स भारतात रहात होते.

त्यावेळी त्यांनी भारतीय संस्कृती आत्मसातही केली होती, पण ब्रिटिशांनी सुद्धा त्यांची अनेक प्रकारे मदत केली होती, जर ब्रिटिश भारत सोडून गेले तर भारतीय जनता आपल्याला स्वीकारेल का याची थोडी फार भिती या समाजात होती, त्यामुळे या समाजातले अनेक लोकं तेव्हा भारत सोडून युके, कॅनडा, न्यूएझीलँड, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी स्थायिक झाले.

मात्र काही जण भारातातच राहिले. आणि यातलेच एक होते फ्रँक अँथनी. फ्रँक अँथनी यांनी अँग्लो इंडियन्स आणि इतर अनेक मायनॉरिटी ग्रुप्स साठी रिजर्वेशनची सोय लावण्यात खूप मोठं योगदान दिलं आणि आवाज उठवला..

आत्तापासून १० वर्षांनी आरक्षणाचे नियम तसेच ठेवायचे की नाही हे पाहता येईल पण स्वातंत्र्याच्या काळात मात्र मायनॉरिटी कम्यूनिटीजना हे आरक्षण मिळणं खूप महत्वाचं ठरतं, असं त्यांनी म्हटलं. आणि या सगळ्या कारणांमुळेच संविधान सभेत आर्टिकल ३३१ समाविष्ट केलं आणि लोकसभेत अँग्लो इंडियन्ससाठी दोन जागा राखीव ठेवण्यास सुरवात झाली.

या दोन राखीव जागांसाठी आपल्या देशाचे राष्ट्रपति २ अँग्लो इंडियन लोकांना निवडायचे आणि मग ५४५ जागा भरायच्या. पण २०२० सालच्या जानेवारी महिन्यात, आता या समाजाची भारतात उरलेली संख्या फार कमी आहे असं म्हणून हा कोटा हटवला गेला होता.

फ्रँक अँथनी यांना अँग्लो इंडियन समजासाठीच्या त्यांच्या योगदानामुळे या समाजात खूपमोठं स्थान दिलं गेलं. ते नेहमी असं म्हणायचे, The more we love, and are loyal to india, the more india, will be loyal to us….! 

तर हा होता अँग्लो इंडियन कम्यूनिटीचा इतिहास.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.