भगतसिंग वाचले ! चंद्रशेखर आझाद “आझाद” झाले. ते फक्त यांच्यामुळे.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महिला स्वातंत्र्यसेनानींचा जेव्हा कधी विषय निघतो तेव्हा एका नावाच्या उल्लेखाशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही.

ते नांव म्हणजे क्रांतिकारकांच्या ‘दुर्गा भाभी’.

क्रांतिकारकांमध्ये ‘दुर्गा भाभी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘दुर्गावती वोहरा’ या भगतसिंगांचे क्रांतिकारक साथीदार भगवती चरण वोहरा यांच्या पत्नी होत्या. भगवती चरण वोहरा हेच भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांना बंदूक आणि बॉम्ब बनवून देत असत.

पण फक्त क्रांतिकारक वोहरा यांची पत्नी ही काही दुर्गा भाभींची ओळख नव्हती. त्या स्वतः देखील या सर्वच क्रांतिकारकांच्या खांद्याला खांदा देऊन ब्रिटीशांशी लढत होत्या.

वोहरा दाम्पत्य एका संपन्न पार्श्वभूमी असलेल्या घरातून येत असे, परंतु त्यांनी आपलं तन-मन-धन देशाच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी अर्पित केलं होतं. १९३० साली एका बॉम्बची चाचणी घेताना भगवती चरण वोहरा यांचा मृत्यू झाला परंतु त्यानंतर देखील दुर्गाभाभी क्रांतीकारकांच्या साथीत ब्रिटिशांशी लढत राहिल्या.

भगतसिंग यांनी खरच मेरा,रंग दे बसंती गायलं होतं का ?

स्वातंत्र्यलढ्यात तोफेच्या तोंडी गेलेले देशातील पहिले पत्रकार.

क्रांतीकारकांना शस्त्रास्त्रे पुरविण्याचं काम त्या करत असत.

डिसेम्बर १९२८ साली जेव्हा भगतसिंग यांनी सँडर्सची हत्या केली होती. त्यानंतर भगतसिंग आपले साथीदार  सुखदेव यांच्यासह लाहोरमध्ये दुर्गा भाभी यांच्या घरी गेले होते. यावेळी लाहोरमध्ये पोलिसांचा कडेकोट पहारा होता आणि भगतसिंग यांना लवकरात लवकर लाहोर सोडणं आवश्यक होतं. त्यावेळी ब्रिटिशांना हुलकावणी देण्यासाठी बनवलेल्या योजनेनुसार ‘दुर्गा भाभी’ देखील भगतसिंगांची पत्नी बनून लाहोर ते कोलकाता या प्रवासात सहभागी झाल्या होत्या.

रेल्वे स्थानकावर देखील साधारणतः ५०० पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता.

हे सर्व पोलीस भागतसिंग यांच्याच शोधात होते. भगतसिंग यांनी वेषांतर केलं होतं आणि ते ‘अँग्लो इंडियन’ बनले होते. सोबत त्यांची पत्नी बनलेल्या दुर्गादेवी आणि कारकुनाच्या भूमिकेत सुखदेव हे देखील होते. ट्रेनमध्ये चढल्यानंतर पोलिसांनी या तिघांची देखील चौकशी केली परंतु ठरलेल्या योजनेनुसार सर्वांनी आपापल्या भूमिका वठवल्या आणि पोलिसांना गुंगारा देत आपला कोलकात्यापर्यंतचा प्रवास त्यांनी पूर्ण केला.

बंदूक चालवण्याचं प्रशिक्षण देखील त्यांनी घेतलं होतं आणि या कलेमध्ये त्या निष्णात समजल्या जात असत. १९३० साली त्यांनी गव्हर्नर हॅलीवर गोळीबार केला होता पण या हल्ल्यात हॅली थोडक्यात वाचला होता. चंद्रशेखर आझाद यांनी इंग्रजांच्या हाती न लागण्यासाठी स्वतःवर गोळी झाडून घेतल्याची माहिती आपल्याला आहेच.

भारतासाठी लढलेली दहशतवादी संघटना.

भारताची गुप्तचर संघटना RAW चा जन्म या एकाच व्यक्तीच्या विश्वासातून झाला होता !!!

आझादांना ही बंदूक दुर्गा भाभी यांचीच आणून दिली होती. त्यांच बंदुकीच्या जोरावर चंद्रशेखर आझाद म्हणत, मी सापडणार नाही. एकवेळ आझाद होईल. चंद्रशेखर आझाद यांनी स्वत:च्या पिस्तुलाने गोळी खावून आझाद झाले.

भगतसिंग आणि साथीदारांना झालेली फाशीची शिक्षा आणि चंद्रशेखर आझाद सोडून गेल्यानंतर मात्र दुर्गा भाभी एकट्या पडत गेल्या. पुढे आपल्या मुलाला घेऊन त्या भारतातल्या वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्यास होत्या.

ऑक्टोबर १९९९ साली त्याचं निधन झालं. आज देखील ज्यावेळी महिला क्रांतिकारकांचा विषय निघतो, त्यावेळी त्याचं नांव अग्रगण्य असतं.

 

Leave A Reply

Your email address will not be published.