तिच्या लघवीनं वाचवले होते ब्रिटीशांचे प्राण !!!

दूसऱ्या महायुद्धातली एक अजरामर कथा….

तर किस्सा असा की, “ज्युलिआना” नावाची एक ब्रिटीनमध्ये कुत्रीण होती. ग्रेट डेन या भरभक्कम जातीची.तस जात सांगायच काही काम नव्हत पण हल्ली जात सांगितली की, समोरच्याचं निम्म काम हलकं होतं. तर आत्ता जात समजली असेल तर आपण पुढे जावूया.

काळ होता दूसऱ्या महायुद्धाचा हिटरल युद्ध जिंकत असतो, असं ब्रिटनच्या गल्लीबोळात बोललं जात होतं. हिकडं चर्चिल पण काय कमी नव्हता. भावा काय जाळ काढलाय म्हणून, ब्रिटीश लोकं चर्चिलला झाडावर चढवत होते. मग चर्चिल सगळ्या जगावर जाळ काढत सुटला होता.

तर याचा परिणाम असा होत होता की, लंडनच्या गल्लीबोळात जाळ निघत होता. म्हणजे जाळ काढणारे बॉम्ब, हिटलर थेट लंडनच्या घरावर टाकून देत. मग ब्रिटिश माणसांची रिमझीम पानासारखी गोळी लागत असे.

तर हि झाली पार्श्वभुमी आत्ता मुळ किस्सा, असच एक दिवस लंडनच्या आकाशातून हिटलरच सैन्य जाळ काढत चाल्ल होत. जाळ काढणारे बॉम्ब, घरांवर येवून पडत आणि एका मिनटातच्या आत ते पेट घेत. असाच एक बॉम्ब जुलियाना (जात -ग्रेट डेन) च्या घरावर पडला.

ज्युलियानाने ते पाहिलं आणि ती बॉम्बच्या दिशेनं झेपावली. आत्ता ज्युलिआना काय राहत नसते म्हणून आजूबाजूचे लोकं तिच्याकडं पाहू लागले. तोच ज्युलिआना न तो बॉम्ब आपल्या लघवीनं विझवला !!! काय्य परत एकदा वाचा ज्युलियानानं तो बॉम्ब आपल्या लघवीनं विझवला. काय ती समयसुचकता !!!!

 

tumblr nt4vr3OKgK1szqwnwo1 1280
weird-facts.org

 

आत्ता वेळ आली ज्युलिआनाच्या उपकाराची परतफेड करण्याची. ती जाणिव ठेवून तिला ब्लू क्रॉस मेडल देण्यात आलं. पण इतक्यावर थांबेल ती ज्युलियाना कसली. तिनं परत एकदा तिचं धाडस दाखवलं आणि आग लागलेल्या एका चप्पलीच्या दूकानातल्या माणसांना तिनं वाचवलं. फक्त यावेळी तिनं लघवी केली नाही.  कारण आगं खूप मोठ्ठी होती. ज्युलियानाला पुन्हा ब्लू क्रॉस मेडल देण्यात आलं.

जगात दोनदा ब्लू क्रॉस मेडल मिळवणारी ती एकमेव कुत्री होती !!!

Leave A Reply

Your email address will not be published.