दारू प्यायला मिळावी म्हणून चर्चिल देखील झुकला होता

पाठ्यपुस्तकातून पहिल्यांदा चर्चिल समजला. चर्चिलने हा निर्णय घेतला, चर्चिलने तो निर्णय घेतला. भारतीय स्वातंत्र्य लढ्यापासून ते जगाच्या इतिहासापर्यन्त सर्वत्र चर्चिलचं नाव हमखास यायचं. त्यानंतर आयुष्याचा कठिण काळ सुरू झाला तो MPSC चा.

या काळात खऱ्या अर्थाने चर्चिल किती डॉन माणूस होता याची खात्री पटली. भल्याभल्या देशांना तो आपल्या खिश्यात घेवून फिरू शकतो याची जाणिव चर्चिल वाचताना झाली. चर्चिल समजून घेण्याची ही दूसरी वेळ होती. पण चर्चिल तेव्हा देखील समजला नाही.

चर्चिल खऱ्या अर्थाने समजला तो तिसऱ्या वेळी. आयुष्यात टेबल नावाची गोष्ट आली आणि

चर्चिल नावाचा एक टॉम क्रुझ माणूस तितकाच मोठ्ठा बेवडा होता हे समजू लागलं. 

जगभरातल्या दारूड्यांमध्ये तिसऱ्या पेगनंतर चर्चिला किस्सा रंगतो. वेळापत्रकानुसार दारू पिणारा तो जगातला एकमेव नेता असेल.

इंग्लडचा अनभिषिक्त सम्राट असणारा हा नेता पण इतिहासात अशीही एक वेळ आली जेव्हा चर्चिलला दारू पिण्यासाठी अमेरिकेकडे अर्ज करावा लागला होता.

झालेलं अस की ते साल होतं १९३१ चं.

अमेरिका आणि इंग्लडच तेव्हा चांगल जमायचं. त्यावेळी चर्चिल विविध विषयांवर लेक्चर देण्यासाठी अमेरिकेला गेला होता. आत्ता पुढची आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे तेव्हा अमेरिकेत दारूवरती बंदी आणण्यात आली होती. हाय का चेष्टा. अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशात कधीकाळी दारूबंदी होती हे सांगून देखील पटणार नाही. पण आमच्यावर विश्वास ठेवा खरच तेव्हा अमेरिकेत दारूबंदी होती. आणि आपल्या चर्चिल साहेबांनी अशा देशात जावून ज्ञान देण्याचा संकल्प केलेला.

दारू नसल्याने चर्चिल महाशय अमेरिकेत पाय ठेवताच वैतागले होते. त्यांनी दोन नंबरने कुठे दारू मिळते याची चौकशी केली पण इंग्लडच्या या माणसाला अमेरिकेतली माणसं ऐकून घेतील अशी परस्थिती नव्हती. मग काय झालं तर चर्चिल त्याच फस्ट्रेशनमध्ये न्यूयॉर्कला असणाऱ्या आपल्या मित्राला भेटायला गेला. त्याला भेटून दोन चार थेंब मुखात पडलीत का असा एक विचार होता आणि दूसरा विचार म्हणजे एखादा ओळखीचा ़डॉक्टर मिळाला तर त्याच्याकडून दारू पिण्याची शिफारस घेवून दारू पिता येईल असा एक विचार होता.

अशातच एक घोळ झाला. चर्चिल महाशय नेमके रस्ता क्रॉस करताना एका गाडीला धडकले.

नाही म्हणायला ही धडक गंभीर होती पण हात पाय मोडण्याइतकं काही चर्चिल साहेबांना झालं नाही. विस्टन चर्चिल यांना मात्र या अपघातामुळे न्यूयॉर्कमधल्या एका हॉस्पीटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं.

त्यानंतर काय झालं तर डॉक्टरांनी त्यांना दारू पिण्याचा परवाना दिला. खाली फोटोत असणारा हाच तो परवाना.

त्यावर प्रतीदिन किमान 250ml दारू त्यांना पिण्यासाठी द्यावी असा परवाना आहे. अमेरिकेकडून चर्चिल यांना दिलेला हा परवाना जसे जसे चर्चिल जग खिश्यात घेवून फिरू लागले तसा तसा चर्चेत येवू लागला.

नंतरच्या इंटरनेट क्रांन्तीच्या जमान्यात हा परवाना अट्टल बेवड्यापर्यन्त पोहचला. पण या सर्वांमध्ये चर्चिल त्या गाडीला खरोखर धडकले होते की खराच तो अपघात होता हे मात्र कधीच सिद्ध होवू शकलं नाही. 

twitter

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.