पाकिस्तानमधील गुरुद्वारा आता शीख समुदायासाठी पुन्हा एकदा उघडणार…

अशा काही वास्तू ज्यामागे काही इतिहास आहे, किंव्हा त्याची पार्श्वभूमी काही राजकीय घटनांशी जोडली जाते त्या वास्तू खरोखरंच लक्षात राहून जातात पण स्थानिक लोकांसाठी त्या वास्तू सवयीच्या होऊन जातात.

अशीच एक वास्तू म्हणजे पाकिस्तान मधील गुरुद्वारा.

हो हे पाकिस्तानमध्ये शिखांचे पविस्त्र स्थान, फक्त हेच नव्हे तर पाकिस्तान मध्ये अजूनही काही  हिंदू धर्माची मंदिरे आहेत. तुम्ही काराकोरम महामार्गावर जातांना  इस्लामाबादच्या उत्तरेस १६० किलोमीटर लांब गेलात तर मानसेहरा शहर लागेल आणि याच शहरात हा गुरुद्वारा आहे.

मानसेहरा हे पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात वसलेले एक शहर आहे. हे पाकिस्तानचे सर्वात मोठे शहर समजले जाते. शहराचे संस्थापक जे होते सरदार महासिंह मीरपुरी यांच्या नावावरून या शहराचं नाव पडलं असा इतिहास आहे.

हे आत्ता का सांगण्याचं कारण अलीकडेच असा निर्णय घेण्यात आला आहे कि,

हा गुरुद्वारा पुन्हा एकदा प्रार्थनेसाठी उघडण्यात येणार आहे.

एव्हिएक्यू ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्डाने पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांताच्या मानसेहरा शहरातील काश्मीर महामार्गावरील गुरुद्वारा श्री गुरुसिंग सभेचा ताबा हा मूळ अधिकाऱ्यांकडे होता, त्यांच्याकडून हा ताबा घेत तो मूळ शीख धर्मियांसाठी प्रार्थनेसाठी खुला करण्याचा निर्धार केला आहे.

या आधी म्हणजेच १९९९ पासून हा गुरुद्वारा मानसेराच्या नगरपालिका प्रशासनाने ताब्यात घेतला आणि त्याचे रुपांतर सार्वजनिक ग्रंथालयात केले होते.  

हा गुरुद्वारा म्हणजे पाकिस्तान मधील आर्किटेक्चरचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून ओळखला जातो.

या शहरात शिखांसाठी अन्य कोणतेही प्रार्थना स्थळ नाही. पण सद्या हे स्थळ उघडणार हा निर्णय पाकिस्तान मधील त्यातल्या त्यात मानसेरामधील मूळ शीख लोकांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 

ईटीपीबीच्या श्रीइन्सचे उपसंचालक इम्रान गोंडल यांच्या सांगण्याप्रमाणे, “नागरी सचिवालय पेशावर येथे ईटीबीपीने मोहतासम बिल्ला यांच्यासमवेत गुरुद्वारा श्री गुरुसिंग सभेचा कब्जा घेण्याचा मुद्दा उपस्थित केला.

या मुद्यावर पालीकेचे विशिष्ट सचिव तसेच अधिकाऱ्यांनी सखोल विचारविनिमयानंतर त्यांनी ईटीपीबीची भूमिका स्वीकारली आणि काही प्रशासकीय अडचणी सोडवू आणि मग गुरुद्वाराचा ताबा आम्हाला देण्याची तयारी दर्शविली आहे”.

ग्रंथालयाला स्थलांतरित करण्यासाठी योग्य जागा शोधल्यानंतर इमारत प्रशासन ईटीपीबी सोपवली जाणार आहे.

आणि त्यानंतर  गुरुद्वारामध्ये आवश्यक ते बांधकाम केले जाईल, गुरुद्वारा श्रीसिंग सभेत पुन्हा श्रीगुरूग्रंथ साहिब स्थापन केल्यानंतर प्रार्थनेसाठी खुलं केलं जाणार आहे.

१९०० च्या काळात हि वास्तू बांधण्यात आली होती. फाळणीनंतर श्रीगुरू ग्रंथ साहिब कोणत्याही प्रकारे या गुरुद्वारामध्ये आणले गेले नाहीत, असे पाकस्थित शीख इतिहासकार शाहिद शब्बीर सांगतात, गुरु ग्रंथ साहिब पालखी अजूनही त्या इमारतीत अबाधित आहे.

‘लॉस्ट हेरिटेजः द शीख लिगेसी इन पाकिस्तान’ आणि ‘द क्वेस्ट कॉन्टीन्यूज’ – या दोन पाकिस्तानमधील शिखांवर आधारित असलेल्या पुस्तकात लेखक अमरदीप सिंह म्हणतात,

“गुरुद्वाराची इमारत ग्रंथालयाच्या रूपात वापरणे देखील वारसा ठेवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. ग्रंथालय म्हणून जरी वापर झाला तरी त्यामुळे एक सुंदर रचना जतन करण्यास मदत झाली आहे. यातून हेच दर्शविले गेले आहे कि, की जर शासनाची इच्छा असेल तर, गुरुद्वारासारख्या इमारतीचा वापर मानवतेच्या उन्नतीसाठी केला जातोय”.

शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष बीबी जागीर कौर यांनी करतारपूर साहिब कॉरिडोरची भारतीय बाजू उघडण्याच्या मागणीचे पाकिस्तान शीख गुरुद्वारा प्रबंधक समितीने स्वागत केले. आणि लवकरच भारतीय शिख यात्रांसाठी सर्व सोयी-सुविधा योग्य वेळी पुरवल्या जातील याची ग्वाही दिली गेली.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.