खरंच दिलीप कुमारांनी आपली संपत्ती वक्फ बोर्डाला दान केली होती का?
दिग्गज अभिनेते दिलीप कुमार आता आपल्यात नाहीत, त्यांना जाऊन काहीच काळ लोटला आणि त्यांच्याबद्दलचे काही समज-गैरसमज सगळीकडेच पसरायला लागले आहेत. त्यातला एक दावा म्हणजे दिलीप कुमारांनी आपली संपत्ती वक्फ बोर्डाला दान केली आहे, पण यात किती सत्यता आहे हे हि पाहणे महत्वाचे ठरेल.
ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार उर्फ युसुफ खान यांची पर्सनल लाइफ आणि प्रोफेशनल लाइफ नेहेमीच चर्चेत राहिली आहे.
दिलीप कुमारांनी राजकारणात देखील एन्ट्री मारली होती, २००० ते २००६ मध्ये ते राज्यसभा संसद राहिले आहेत.
त्यांच्या कलेच्या योगदानाबद्दल त्यांना भारताचा दुसरा सर्वोच्च नागरिक सन्मान पद्मविभूषण मिळाला आहे तर पाकिस्तान सरकारचा निशान-ए-इम्तियाज हा पुरस्कार मिळाला आहे.
त्यांचा जन्म १९२२ चा पेशावर मधला, फाळणीनंतर ते भारतात आले आणि दिलीप कुमार नाव लावून आपल्या कलेच्या जोरावर मोठं साम्राज्य उभं केलं.
हे सर्व वादंग दिलीप कुमार यांच्या नावामुळे होतेय का ?
दिलीपकुमार यांच्या मृत्यूच्या काही तासांनंतरच कित्येक सोशल मीडिया युझर्सने म्हटले आहे की, दिलीप कुमारने आपली संपत्ती स्वयंसेवी संस्था किंवा वृद्धाश्रमाला देण्याऐवजी वक्फ बोर्डाला दान केली.
सोशल मीडिया आणि भाजपाच्या आयटी सेल ने याबाबतीत अनेक ट्वीट व्हायरल केले, त्यात एक म्हणजे भाजपाचे कार्यकर्ते माजी संयोजक गौरव महाजन यांनी एक ट्विट केलं, दिलीपकुमार यांनी त्यांची ९८ कोटींची संपत्ती एनजीओ किंवा वृद्धाश्रमाला देण्याऐवजी वक्फ बोर्डाला दान केली होती. गौरव यांचे खोटे ट्विट ५०० पेक्षा जास्त लोकांनी लाईक केले गेले आहे.
मुतलिमों की क्रोनोलॉजी समझे:- दिलीप कुमार असल नाम यूसुफखान जीते जी हिंदू नाम रखकर बॉलीवुड मे खूब पैसा कमाया,
लेकिन मरते समय 98 करोड़ की अपनी प्रॉपर्टी किसी वृद्ध आश्रम या अनाथालय चलाने वाले किसी एनजीओ को नहीं अपने मजहबी मुतलिम वक्फ बोर्ड के नाम कर गए!
— गौरव महाजन (@GAURAVBJP4INDIA) July 7, 2021
मुहम्मद युसूफ उर्फ दिलीप कुमार के लिए आंसू बहाने वाले काफिर दोगलों, आंखे खोलो और देखो…
वो अपनी संपत्ति वक्फ-बोर्ड को देकर गया है
मंदिरों को फूटी कौड़ी भी नहीं दी..— Janardan Mishra (@janardanmis) July 7, 2021
दिलीप कुमार याचं खरं नाव युसुफ खान म्हणूनच हे असल्या प्रकारचे ट्वीट फिरवले जात आहेत हे तर स्पष्ट दिसून येतंय. अनेकांनी रीट्वीट करत अगदी त्वेषपूर्वक भाषेत लिहिले कि, “मुळचा पाकिस्तानचा युसुफ खान हिंदू नाव धारण करून,हिंदुच्या पैशांवर जगून शेवटी ती संपत्ती मुस्लिमांच्या वक्फ बोर्डाला दान दिली”.
अनेकांनी दिलीप कुमारांना जिहादी म्हणलं आहे.
तब्येतीने ते जरूर हवालदिल होते पण खूप कमी जणांना माहिती आहे कि, दिलीप कुमार यांनी त्यांच्या पाश्च्यात करोडो रुपयांची संपत्ती ठेवून गेले आहे.
अभिनेत्याचे ट्विटर अकाउंट चालवणारे माऊथशटचे या संस्थेचे संस्थापक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी फैसल फारुकीने देखील हे संपत्ती दान केलेले आरोप फेटाळले आहेत. त्यांनी स्पष्ट केले कि, “हे सर्व ट्वीट बनावट आयडीद्वारे तयार केलेले बनावट ट्विट आहेत. जे पूर्णपणे खोटे आहेत, त्यांच्या कंटेंट मध्ये काहीच सत्य नाही”.
दिलीप कुमार आणि वक्फ बोर्ड यांच्यात प्रकारच्या व्यवहाराची नोंद नाहीये, न इतर कुठलाही लेखी पुरावा नाही.
दिलीप कुमार हे बॉलीवूड मधील पहिले व्यक्ती होते ज्यांनी त्यांच्या फिल्म साठी १ लाख रुपयांची मागणी केली होती. विशेष म्हणजे त्यांच्या करिअर मधला हा ‘ज्वार भाटा’ पहिलाच मुव्ही होता. त्यांनी वयाच्या ५४ व्या वर्षापर्यंत फक्त ६२ चित्रपट केले. पण त्यातले एक ना एक चित्रपट हे दमदार राहिले आहेत.
हे हि वाच भिडू :
- दिलीप कुमार आणि सायराबानोच्या प्रकरणात मध्यस्थी करणारे शरद पवार !
- जेव्हा कारगील युद्धात दिलीप कुमार मध्यस्थी करतात.
- दिलीपकुमारांनी ट्रोलिंगला तसच प्रेमानं उत्तर दिलं असतं जस त्या ॲसिडहल्ला करणाऱ्याला दिल होतं