‘बिग बॉस चाहते है..’ हा लोकप्रिय आवाज नेमका कुणाचा..?

कलर्स वाहिनीवर सध्या ‘बिग बॉस’ या रीअॅलिटी शोचा  बारावा सिझन सुरु आहे. शो सुरु झाल्यापासून ते सध्याच्या बाराव्या सिझनपर्यंत ‘बिग बॉस’मध्ये अनेक बदल झालेत, अनेक वाद-विवाद देखील या शो मधून समोर आलेत.

असं असताना गेल्या बारा सिझनमध्ये या शो मधील एक गोष्ट मात्र अजूनदेखील बदललेली नाही. ही गोष्ट म्हणजे शो मधील ‘बिग बॉस चाहते है..’ असं म्हणत सलमानपासून ते सर्वच स्पर्धकांना आपला आदेश देणाऱ्या ‘बिग बॉस’चा आवाज.

‘बिग बॉस’च्या या आवाजाने आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. शोच्या चाहत्यांमध्ये हा आवाज प्रचंड लोकप्रिय आहे. पण आजपर्यंत कधीही या आवाजामागचा खरा चेहरा चाहत्यांना शोच्या स्टेजवर बघायला मिळालेला नाही.

चाहत्यांमध्ये मात्र हा आवाज नेमका आहे तरी कुणाचा, याविषयी खूप उत्सुकता आहे. आज आम्ही तुम्हाला सांगतोय ‘बिग बॉस’चा आवाज असणाऱ्या माणसाविषयी सर्व काही..

‘बिग बॉस चाहते है..’ असं म्हणत सर्वांना आपले आदेश देणाऱ्या ‘बिग बॉस’मागचा खरा आवाज आहे अतुल कपूर या व्हॉईस ओव्हर आर्टिस्टचा. २००६ साली जेव्हा प्रथमच भारतात ‘बिग बॉस’ची सुरुवात झाली, तेव्हापासूनच ‘बिग बॉस’ला अतुल कपूर यांचाच आवाज आहे.

कोण आहेत अतुल कपूर…?

bb
‘बिग बॉस’च्या सेटवरील अतुल कपूर उजवीकडून दुसरे

२००० साली सोनी टीव्हीसोबत व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट म्हणून काम करायला सुरुवात केलेले अतुल कपूर यांनी ‘बिग बॉस’व्यतिरिक्त अनेक बॉलीवूड आणि हॉलीवूड सिनेमांना देखील व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट म्हणून आपला आवाज दिलाय. ‘आयरन मॅन’ सिरीजचे तिन्हीही भाग, ‘द अव्हेन्जर्स’ ‘कॅप्टन अमेरिका’ या हॉलीवूडपटाच्या हिंदी डबिंगमध्ये सुपरहिरोंसाठी अतुल कपूर यांचाच व्हॉईस ओव्हर वापरण्यात आला आहे.

संपूर्ण सिझनदरम्यान स्पर्धकांप्रमाणेच एका रूममध्ये बंदिस्त

वेगवेगळ्या माध्यमांमध्ये प्रकाशित बातम्यांनुसार प्रत्येक सिझन सुरु होण्याच्या महिनाभरापूर्वीपासूनच अतुल एका गुपित खोलीमध्ये बंदिस्त असतात. संपूर्ण सीझनमध्ये ते याच खोलीत असतात.

त्यांच्या ठिकाणाविषयी देखील गुप्तता पाळण्यात येते. संपूर्ण सीझनमध्ये त्यांच्याकडे ना मोबाईल असतो, ना संपर्कासाठीचे इतर कुठले साधन. संपूर्ण सिझनदरम्यान आपले कुटुंब आणि मित्र परिवार यांच्याशी देखील त्यांचा संपर्क नसतो.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.