रोडरोमिओंनी त्रास दिला की, बिहारच्या मुली डायरेक्ट या दबंग ऑफिसरला फोन करायच्या….

बिहारमध्ये आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांची काय कमी नाही. तुम्ही बिहारच्या अशा अनेक अधिकाऱ्यांची नावं ऐकली असतील जे फक्त सोशल मिडियावर नाही तर लोकांच्या मनात देखील तितकेच फेव्हरेट अधिकारी ठरलेत..त्यातले तुम्ही मनु महाराज, विकास वैभव, लिपी सिंह यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांची नावे ऐकली असतील, त्याचप्रमाणे आणखी एक आयपीएस अधिकारी आहे, जो आपल्या कामाच्या शैलीसाठी प्रसिद्ध आहे. 

आम्ही बोलतोय ते म्हणजे शिवदीप लांडे यांच्याबद्दल… IPS ऑफिसर शिवदीप लांढे हे २००६ बॅचचे IPS अधिकारी आहेत, ज्याचं नाव जरी काढले तरी गुन्हेगारांचे पाय थरथर कापतात 

 बिहारमध्ये काही मोजक्या आयपीएस अधिकाऱ्यांपैकी शिवदीप लांडे हे असे अधिकारी आहेत, ज्यांनी आपल्या कार्यामुळे वेगळी ओळख निर्माण केली आहे.

बिहार कॅडरचे आयपीएस शिवदीप लांडे सध्या मुंबईत पोलिस गुन्हे शाखेत डीआयजी म्हणून कार्यरत आहेत. त्याचबरोबर पाच वर्षांच्या प्रतिनियुक्तीनंतर ते बिहारमध्ये परतणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून ते बिहारमध्ये सर्व्हिसला सुरुवात करणार आहेत.

शिवदीप लांडे यांची पहिली पोस्टिंग मुंगेरच्या नक्षलग्रस्त जिल्ह्यातील जमालपूरमध्ये ASP मोहिमेवर करण्यात आली होती. जवळपास दोन वर्षे येथे सर्व्हिस बजावत असताना त्यांनी गुन्हेगारी नियंत्रणात बजावलेली भूमिका मुंगेरची जनता आजही विसरलेली नाही. मग ते पाटणामधील सिटी एसपी पदावर असो किंवा अररिया, किशनगंज आणि रोहतास येथील पोलीस अधीक्षक आणि राज्यपालांचे ओएसएडी म्हणून असो. सर्वोत्तम कामगिरी करत आयपीएस लांडे यांनी गुन्हेगारी क्षेत्रात आपली दहशत निर्माण केली.

शिवदीप लांडे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत हि माहिती दिलीये.

या पोस्टमध्ये त्यांनी लिहीलेय कि, ‘महाराष्ट्रामधील माझ्या कार्यकाळाचे पाच वर्ष पूर्ण झाले. मी दहशतवाद विरोधी पथक, एटीएस मुंबई मधून डीआयजी म्हणून माझा कार्यभार सोपवत आहे. मी आता ‘आपल्या बिहार’मध्ये सेवा करण्यासाठी परत येत आहे. ‘ 

शिवदीप लांडे बिहार कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत.

मुळचे महाराष्ट्रातले असलेले शिवदीप लांडे मुंबईत पोलीस गुन्हे शाखेत डीआयजी म्हणून कार्यरत होते. याआधी बिहारची राजधानी पाटणा येथे सिटी एसपी देखील ते होते. अररिया आणि रोहतास जिल्ह्याचे पोलीस अधीक्षकही होते.

दबंग अधिकारी शिवदीप लांडे यांनी पटना येथे एसपी म्हणून कार्यरत असतांना, ब्रँडेड कंपन्यांच्या नावाने फसवणूक करणारं जाळ पकडलं होतं, तसेच बनावट नोटा छापणाऱ्यां टोळीचा निकाल हि लावला होता. आणखी एक म्हणजे बनावट औषधांची विक्री करणाऱ्यांविरोधात मोहीम राबवून तेथे आपली दहशत निर्माण केली होती…

एकदा एका बिझनेसमन ची हत्या झाल्यानंतर मोठा तणाव निर्माण झाला होता, सर्व दुकाने बंद केली गेली होती. त्याच दरम्यान त्यांनी एका गुन्हेगाराला पकडलं अन भर रस्त्याच्या मधोमध मारले होते. 

मागे ५ वर्षांपूर्वी जेंव्हा शिवदीप लांडे यांची बदली झाली होती, तेंव्हा अक्षरश: बिहारची जनता रडली होती.

या आयपीएस अधिकाऱ्याच्या गोष्टी इथेच संपत नाहीत, त्यांनी लांडे यांनी बिहार राज्यातील मुलींच्या सुरक्षेसाठी उत्कृष्ट पाऊल उचलले होते. कोणत्याही प्रकारची समस्या सहज सोडवण्यासाठी ते प्रसिद्ध होते.

बदमाश लोकांना लगाम घालण्यासाठी त्यांनी पाटण्यातील शाळा कॉलेजांबाहेर सुरक्षा वाढवली की मुली त्यांच्या चाहत्या झाल्या होत्या. असे म्हटले जाते की अधिकारी लांडे  यांचा वैयक्तिक नंबर मुलींकडे देखील होता. कुठे काही जर झालं तर मुली त्यांना फोन करायच्या आणि शिवदीप लांडे स्वतः  घटनास्थळी पोहाचयाचे, आणि रोड रोमियोगिरी करणाऱ्यांना धडा शिकवायचे.

लोकांमध्ये त्यांची लोकप्रियता इतकी वाढली की, बिहारच्या पोलीस महासंचालकांनी शिवदीप लांडे यांची पाटणा शहराच्या एसपीवरून पोलीस मुख्यालयात बदली केली होती, तेंव्हा तेथील लोकांनी त्यांच्याकडे लक्ष वेधून घेतलं. त्यांच्या बदलीच्या निषेधार्थ लोकं रस्त्यावर उतरले होते. 

लोकांनी कँडल मार्चही काढला. इतकंच नाही तर त्यांच्या बदलीच्या बातमीने अनेकजण रडतानाही दिसले होते आणि आता सिंघम लांडे हे ५ वर्षांनंतर बिहारमध्ये आल्याने मुंगेर आणि भागलपूरचे डीआयजी बनण्याची चर्चा चालूये.

 

 

 

 

 

 

 

 

आता पाच वर्षांनंतर दारूबंदी कायद्यावरून सुरू असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीमध्ये, बिहारमध्ये परतणाऱ्या आयपीएस शिवदीप लांडे हे त्यांच्यावर देण्यात आलेल्या जबाबदाऱ्या कशा पार पाडतील याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.