महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विजेचा झगमगाट पहायला मिळतोय तो दामुअण्णा पोतदार यांच्यामुळे

आज पुणे हे राज्यातल्याचं नाही तर देशातल्या टॉमच्या शहरांमध्ये गणलं  जात. इथले उद्योग धंदे, शिक्षण क्षेत्रातील पुण्याचा वाटा अशा सगळ्याचं गोष्टींमुळे पुणे आज विकसित शहरांकडे प्रचंड वेगाने  वाटचाल करतयं.

पण कोणत्याही शहराला त्याच्या विकासासाठी मुलभूत सुविधांवर भर देणं आवश्यक असतं. या मुलभूत सुविधा म्हणजे रस्ते, पाणी आणि वीज. तेव्हा कुठं जाऊन शहरं झगमगात. आणि पुण्याच्या याचं झगमगाटीत महत्त्वाचा वाटा आहे तो दामूअण्णा पोतदार यांचा.

आता बर्‍याच  जणांसाठी दामूअण्णा पोतदार हे नाव नवीन असेल. पण  मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या लोकांमध्ये या नावाची चर्चा आजही आहे. 

पण भिडू तूमच्या माहितीसाठी  पुण्याच्या विद्यूतीकरणात दामूअण्णा यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली. 

१९३४ साली चेंबरच्या सुरुवातीच्या काळातच संस्थापन वर्षातच ते चेंबरमध्ये आले. चेंबरच्या तीन संस्थापकांपैकी ते एक होते. चेंबरच्या प्रत्येक सभेत ते हजर असायचे.

अडचणीच्या वेळी सभा घ्यावी ती दामुअण्णांनीच! एखादा कटु निर्णय असला की दामुअण्णा त्याचे व्यवस्थित प्रतिपादन करून लोकांना ते पटवून देत  आणि असे निर्णय घेण्यास सर्वांना प्रवृत्त करीत. प्रसंगीं संस्थेच्या दृष्टीने एखादा निर्णय घेणे आवश्यक असले तर त्याची सर्व कटुता आपल्या अंगावर घेऊन असा निर्णय करीत.

त्यामुळेच दामू अण्णांची 1946 आली चेंबरच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली तेव्हापासून 1967 झाली म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत ते मंडळाचे कार्याध्यक्ष होते चेंबरच्या कार्याच्या वाढीचा त्यांनी अनेक प्रकारे हातभार लावला.

१९३५ साली ते बी.ई. इलेक्ट्रिकल ही परीक्षा उत्तीर्ण झाले आणि इलेक्ट्रिकल काँट्रॅक्टरच्या व्यवसायात पडले. त्यात त्यांनी पैसाही चांगला मिळविला. पण बी.ई. मेकॅनिकल असल्यामुळं त्यांना इंजिनिअरिंगचा एखादा व्यवसाय करण्याची इच्छा होती आणि त्यांनी त्यासाठी महाराष्ट्र इंजिनिअरिंग वर्क्स लिमीटेड या नावाची कंपनीही प्रवर्तित केली होती.

परंतु जेव्हा त्यांना आढळून आले की, इलेक्ट्रिकल कॉंट्रॅक्टरचा व्यवसाय संभाळून त्याच्या जोडीला नव्या विटीदांडूने खेळ यशस्वी रीतीने खेळता येणार नाही, त्या वेळी खोट्या इभ्रतीला बळी न पडता त्यांनी ती पुढे न चालवण्याचे ठरवून, ज्यांनी शेअर घेतले होते त्यांची पो शेअरपोटी भरलेली सगळी रक्कम परत करण्याची व्यवस्था केली. जे जमेल तेच करायचे, भलता आवाका घालावयाचा नाही असे त्यांचे धोरण असल्याने ते व्यवसायात यशस्वी झाले.

विद्युत्स्थापत्यामध्ये त्यांचा हात धरणारा कोणी नव्हता. अनेक बारीकसारीक तपशिलाचा विचार करून ते डिझाइन तयार करायचे. १९६० च्या सुमारास पूना इलेक्ट्रिक सप्लाय कंपनीच्या गणेशखिंड सबस्टेशनमध्ये स्फोट होऊन पुण्याच्या वीजपुरवठ्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या.

त्याच वेळी नवीन कारखाने पुण्यात येऊ घातले होते आणि सर्वांच्या पुढे वीजपुरवठ्याचा मोठा प्रश्न होता. त्या वेळचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण त्यावेळी चेंबरमध्ये आले होते. या वीजपुरवठ्याबद्दल त्यांच्या समोर दामुअण्णांनी कारखानदारांची बाजू फार चांगली मांडली. तांत्रिक अडचणी आणि त्यातून मार्ग कसा काढता येईल हे सांगितले, सरकारला अनेक सूचना केल्या.

सभा संपल्यावर यशवंतरावांनी दामुअण्णांना बाजूला घेऊन विचारले,

‘तुम्ही नुसती सरकारवर टीका करणार का काही जबाबदारी घेणार! हे राज्य आता आपल्या सर्वांचे आहे.”

त्यांनी दामुअण्णांची महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळावर तांत्रिक सदस्य म्हणून नेमणूक केली. दामुअण्णांच्या विद्युतस्थापत्य विषयक ज्ञानाचा तो राजगौरव होता. दामुअण्णांची वीज मंडळातील कारकीर्द फार गाजली. सर्व महाराष्ट्रभर फिरून त्यांनी वीजनिर्मिती व वीजपुरवठा ह्याचे उत्तम नियोजन केले आणि त्याची अंमलबजावणी केली. त्यावेळी त्यांनी राज्यात सगळीकडे दौरा केला.

Leave A Reply

Your email address will not be published.