वासेपुरमधला थाना प्रभारी गोपालसिंग दहा वर्षानंतर पंचायतचा उप-प्रधान पांडेजी झाला..

पंचायत 2 रिलीज झाला आहे. त्यानंतर या सिरीजमधल्या बऱ्याच पात्रांची चर्चा सुरू आहे. सचिव अभिषेक त्रिपाठी , प्रधान ब्रीजभूषण दुबे, ग्रामसहाय्यक अर्थात उपसचिव विकास, रियल प्रधान मंजू देवी,  रिंकी… 

पण यात सगळ्यात भारी अन् टच् झालेलं पात्र आहे ते उप प्रधान प्रल्हाद पांडेजी यांच.

अक्राळविक्राळ शरीर पण डोक्याने अगदी लहान पोरासारखं असणारं हे पात्र. उप प्रधान म्हणून कायम प्रधानांसोबत असणारं हे कॅरेक्टर म्हणजे या सिरीजमध्ये सर्वांना जोडणारं दूवा ठरलय. सिरीज जशी जशी शेवटाकडे जाते तसं तसं हे पात्र रंगत जातं अन् अगदी शेवटच्या एपिसोडमध्ये गोष्टीचा खरा नायक म्हणून उप प्रधान प्रल्हाद पांडेचं समोर येतात.. 

प्रल्हाद पांडेंच खरं नाव फैसल मलिक हा माणूस जेव्हा मुंबईत स्ट्रगल करायला आला तेव्हा त्याच्याकडे बघून त्याला कोण रोल देत नव्हतं. तेव्हा तो समोरच्याला सांगायचा की कोणत्याही अक्रालविक्राल व्हिलनचा रोल आला, किंवा नुसतं मागं उभारायचं असेल तरी माझी आठवण ठेवा.. 

दहावीत या माणसाने पाच वर्ष घालवली. पाचव्या प्रयत्नानंतर दहावी पास झाला. त्यानंतर लखनौ मध्ये १२ वी आणि BCom केलं… 

आत्ता पुढे काय…? 

तेव्हा याच्या वडिलांनी याला MBA करण्यासाठी मुंबईला जायला सांगितलं. घरची परिस्थिती तशी चांगली असल्यानं प्रोब्लेम नव्हता. दहावीत पाच वेळा बसलेला असूनही वडिलांनी त्याला MBA करण्यासाठी मुंबईला पाठवलं. पण पठ्याला स्वत:वर विश्वास होता. त्यामुळं त्यानं MBA ला ॲडमिशनचं घेतलं नाही. जे पैसे घरातून आले त्यावर चैन करायची हा उद्योग सुरू झाला. 

त्यानंतर कॉलेजची वेळ गेली. आत्ता खरा स्ट्रगल सुरू झाला. करण्यासारखं एकच काम होतं अन् ती म्हणजे ॲॅक्टिंग. कुठेतरी साईड रोल मिळेल म्हणून फिल्मसिटीच्या चकरा रोजच्या झाल्या. पण झालं अस की  फैसल हा पहिल्यापासूनच अंगाने जाम माणूस. त्यामुळे कुठेतरी बाजूला उभा करणाऱ्यामध्ये देखील हा बसत नव्हता. लगेच गडी उठून दिसायचा. अक्रालविक्राल रोलची माहिती पण तशी कमीच मिळायची.. 

म्हणून त्याने एडिटींग शिकून घेतली. घरची परिस्थिती चांगली असल्याने अगदीच रस्त्यावर झोपण्याची वेळ आली नाही हेच काय ते चांगल. 

पण फैसल मलिकच्या ॲक्टिगच्या करियरला पहिला ब्रेक मिळाला तो गॅंग ऑफ वासेपुर… 

खालची इमेज पहा. हा फोटो पाहिला तरी अरे हा तर आपला,

गोपाल सिंग थाना प्रभारी धनसर..

Screenshot 2022 05 24 at 9.18.35 PM

अगदी बारीक रोल मिळालेला गड्याला पण कुत्सित हास्य, नालायकपणा आणि बेरकीपणा या कॅरेक्टरने चांगलाच पकडलेला. त्याचं हे हासणं असो की वैंसे भी हम कुछं नहीं कर सकते अस वरिष्ठांना सांगण असो. वासेपुरमधला फैसल चांगलाच लक्षात राहिला. 

त्यानंतर तो लोकांसमोर येत राहिला पण तो प्रोड्युसर म्हणून.

बायकोसोबत त्याने कंपनी सुरू केली.  रिव्हॉल्वर राणी, मै और चार्ली, सात उच्चके अशा सिनेमांचा तो एक्झिक्युटीव प्रोड्युसर राहिला. पण टिव्ही सिरीजच्या पलीकडे ॲक्टिंगच काही करियर गेलं नाही.

फक्त झालं अस की, एखाद्या फ्रॉड सैय्या सारख्या ठिकाणी तो दिसला. त्यापलीकडे करियर बेबसिरीजच्या पलीकडं सरकलं नाही. त्यालाही कळालेलं की आपलं ॲक्टिंगच करियर काय धक्क्याला लागणार नाही. त्यामुळं तो पण प्रोड्युसर झालेला… 

तेव्हा अचानक गड्याकडे पंचायत सिरीजची ऑफर आली. त्याचा आक्राळविक्राळ देह बाजूला ठेवून त्याला या सिरीजसाठी विचारणा झाली होती. तेव्हा त्याचं म्हणणं होतं की क्राईम, शिव्या, भांडण, रक्त सोडून सिरीज चालणार नाही. पंचायत मध्ये यातलं काहीही नाही.

पण गड्यानं खूषीनं पंचायतचा रोल घेतला आणि तो जिंकला. थोडक्यात काय तर 2012 साली वासेपूर आलेला अन् 2022 साली पंचायत आला. या काळात ॲक्टिंगची गाडी धक्क्याला लागली नाही पण गड्यानं लावून धरलं अन् जिंकल.. 

हे ही वाच भिडू

 

Leave A Reply

Your email address will not be published.