गँग्ज ऑफ वासेपूरच्या नगमा खातूनमुळे रिचा चढ्ढाला ११ पिक्चर मिळाले होते

2012 साली एक जबरदस्त सिनेमा आला होता. सुरवातीला तो बॉक्स ऑफिसवर पडला आणि नंतर जेव्हा तो थेटरातुन उतरला तेव्हा त्याला लोकांनी डोक्यावर घेतलं, कल्ट सिनेमाचा दर्जा मिळाला, समीक्षकांनी कौतुक वैगरे सगळं केलं नंतर याच सिनेमाचा दुसरा पार्ट आल्यावर लोकांनी कौतुक केलं आणि दुसऱ्या पार्ट मध्ये काही समजेना म्हणून पहिला पार्ट कंपल्सरी पाहावा लागला आणि हा दोन पार्टचा सिनेमा हिट झाला. तो सिनेमा होता

गँग्स ऑफ वासेपूर

अनुराग कश्यप दिग्दर्शक असलेला हा सिनेमा memes च्या माध्यमातून लोकांमध्ये तुफ्फान लोकप्रिय झाला. यातल्या प्रत्येक पात्राने वठवलेली आपली भूमिका लोकांच्या मनातून अजूनही उतरणे अशक्य आहे.

सरदार खान, फैजल खान, दानिश, रामाधीर सिंग, डेफिनेट अशी अनेक पात्र लोकांच्या लक्षात राहिली पण यात सरदार खानच्या बायकोची भूमिका पार पाडणाऱ्या नगमा खातूनला लोकं सगळ्या सिनेमाभर पाहताना विसरत नाही.

अगदी घरातली सगळी माणसं बेफाम कत्तल करत सुटलेली असतात आणि नंतर याच लोकांची कत्तल होते तेव्हा फैजल खानला नगमा खातून ज्या भावनेने म्हणते की

कब खून खोलेगा तेरा…

तेव्हा नगमा खातून काय लेव्हलची बाई आहे कळतं. ही नगमा खातूनची भूमिका केली होती रिचा चड्डाने. अनेक लोकांना विश्वास बसत नव्हता की रिचा चड्डाचा हा दुसरा सिनेमा आहे.

तर जाणून घेऊया रिचा चड्डा ते नगमा खातून पर्यंतचा प्रवास.

18 डिसेंबर 1986 रोजी रिचा चड्डाचा जन्म अमृतसर, पंजाब मध्ये झाला. पण करियर करण्याच्या उद्देशाने ती दिल्लीत आली. दिल्लीत आल्यावर थेटरशी संबंध आला आणि नाटकांची गोडी लागली. दिल्लीत मन रमले नाही म्हणून मुंबईत डिप्लोमा करण्यासाठी ती मुंबईत आली. नाटक करण्यात आपलं मन रमत हे तिला लवकर कळलं आणि थेटर ग्रुप जॉईन करून तिने अभिनयही शिकायला सुरवात केली.

यातूनच मॉडेलिंग शी तिचा संपर्क आला , मॉडेलिंग करून थोडेफार पैसे तिला मिळू लागले ज्यावर मुंबईत तिचा राहण्याचा खर्च सुटू लागला. हळूहळू मॉडेलिंगचे फोटो ऍड शूट आणि कास्टिंग दिग्दर्शक लोकांकडे पोहचू लागले.

नाटक करत असताना तिने भारत पाकिस्तान मध्ये जाऊन नाटकांचे अनेक प्रयोग केले होते. या ओळखीपाळखीतुनच एका सिनेमाची रिचा चड्डाला ऑफर आली आणि तो सिनेमा होता ओय लक्की लक्की ओय. हा सिनेमा अंडररेटेडचं राहिला पण यात रिचाच्या कामाचं काही ठिकाणी कौतुकही झालं आणि काही ठिकाणी अशा हिरोईन बॉलिवुडमध्ये चालत नाही अशी टीकाही झाली पण रिचाच्या कामाने बऱ्याच लोकांच्या तिच्या कास्टिंगबद्दल विचार करायला भाग पाडलं होतं.

आपलं पहिल्याच सिनेमातलं काम वाजलं हे तिला कळलं होतं आणि लोकांनाही अंदाज आला होता की कोणीतरी तगडी अभिनेत्री बॉलिवूडमध्ये आली आहे म्हणून.

यानंतर आला अनुराग कश्यपचा सिनेमा गँग ऑफ वासेपूर सिरीजचा पहिला पार्ट.

या सिनेमाचा गाजावाजा भरपूर झाला आणि यात रिचा चड्डाने साकारलेली नगमा खातून उठून दिसली. एकवेळ मनोज वाजपेयीने साकारलेल्या सगळ्यात खुंखार व्हिलन सरदार सिंगला पळवून पळवून ही नगमा खातून मारते. तिने पेटवलेली बदल्याची आग सरदार सिंग मध्ये देखील उतरते आणि तो म्हणतो,

गोली नहीं मारेंगे सालेको, केहके लेंगे

म्हणून हे कपल रामाधीर विरुद्ध रणशिंग फुंकतात. रिचा चड्डा मात्र या सिनेमात भाव खाऊन गेली आणि तिला यासाठी बरेच अवॉर्ड देखील मिळाले.

गँग ऑफ वासेपूरच्या धमाकेदार कामामुळे रिचा पुढचे थेट 11 सिनेमे मिळाले होते हेही विशेष. आपलं एखादं काम वाजलं आणि त्यावर आपल्याला इतक्या मोठ्या प्रमाणावर यश मिळणं हे तसं दुर्मिळ असतं पण रिचा चड्डा डीझर्व करते कारण नगमा खातून म्हणल्यावर तिचाच चेहरा पटकन डोळ्यासमोर येतो. नंतर रिचाने एकदम टॉप क्लास सिनेमामध्ये काम केलं.

मसान, फुकरे, रामलीला, बेनी अँड बबलू, सेक्शन 375 अशा अनेक सिनेमांमध्ये काम केलं पण तिची खरी ओळख राहिली ती म्हणजे नगमा खातून….

हे ही वाच भिडू ;

Leave A Reply

Your email address will not be published.