अळी निघाल्याच्या प्रकरणानंतर बच्चनने डेरीमिल्कच्या जाहिरातीसाठी शंभरदा विचार केला

भारतात दोनच गोष्टी चर्चेत असतात आणि त्यांचं अख्ख्या भारतालाच आकर्षण असते ते म्हणजे बॉलिवूड आणि क्रिकेट…अर्थातच या सेलेब्रेटींबाबत त्यांच्या कामाबाबत लोकांना कुतूहल असते. या दोन्ही क्षेत्रातील लोकांनी आपल्या जाहिरात क्षेत्रावर कब्जा केला म्हणलं तरी अतिशियोक्ती वाटणार नाही.  टीव्ही, युट्युब कशावरही दर ५ मिनिटाला ज्या जाहिराती येतात त्यात क्रिकेटर/ बॉलिवूड सेलेब्रेटींचा चेहरा दिसावा यात आश्चर्य वाटून घ्यायचं कारण नाही.

आता मोठं-मोठे सेलिब्रेटी आपल्या जाहिरातीत असले कि, त्या ब्रॅण्ड च्या लोकांना इतर गोष्टींचं घेणंदेणं नसते. मग त्या जाहिराती किती भयंकर का असेनात. याचं मुख्य कारण असं, की एकदा का अशा प्रसिद्ध मंडळींना जाहिरातींसाठी करारबद्ध केलं गेलं, की ती जाहिरातसंस्था, ग्राहककंपनी आणि संबंधित सर्जनशील मंडळी जाहिरातीवर मेहनत घ्यायचा कंटाळा करतात. त्यांना वाटतं, की आपल्या जाहिरातीत स्टार आला की संपलं आपलं काम….पण करार केला असला तरीही काही ऍक्टर/क्रिकेटर याबाबत मोठे जागरूक असतात. सावध भूमिका घेतात, काळजीपूर्वक विषय बघून मगच जाहिरात करण्याचा निर्णय घेतात.

पण आम्ही जेंव्हा याबाबत पियुष पांडे यांचं ‘पांडेपुराण’ वाचलं.. त्यात याच विषयाबाबत एक किस्सा घावला..

पियुष पांडे म्हणतात कि, एकदा का तुमच्या जाहिरातीत प्रसिद्ध व्यक्ती येणार असेल, तर तुम्हाला त्यातल्या प्रत्येक बाबीवर दसपट जास्त काम करावं लागतं. कारण त्या प्रसिद्ध व्यक्तीला घेऊन जाहिरात बनवली जाते तेंव्हा प्रेक्षकांना जाहिरातीतली ती प्रसिद्ध व्यक्तीच फक्त लक्षात न राहता, त्या व्यक्तीसोबतच जाहिरातीची संहिता आणि तिची कल्पना या गोष्टीही लक्षात राहतात. त्यामुळे काही व्यक्ती ती जाहिरात करताना विचार करतात. 

यातलं मुख्य उदाहरण म्हणजे अमिताभ बच्चन !

शूटिंगपूर्वी अमिताभ हे जाहिरातीच्या विषयावर, कन्सेप्टवर अगदी बारकाईनं चर्चा करतात. ते त्यामागची भूमिका समजून घेतात, त्याचे संदर्भ आणि जाहिरातीने नेमका काय परिणाम साधणं अपेक्षित आहे त्याचीही चर्चा करतात. स्क्रिप्ट कशी का असेना, प्रत्येक वेळी अमिताभ बच्चन त्यांची प्रत्येक जाहिरात चांगल्याच पद्धतीनं प्रेक्षकांपर्यंत पोचायला हवी यासाठी ते अतिशय जागरूक असतात.

उत्तरदायित्व आणि जबाबदारीची जाणीव असणे याचं श्रेष्ठ उदाहरण म्हणजे अमिताभ बच्चन.

एखादी गोष्ट किती जबाबदारीनं ते करतात याचं एक उदाहरण म्हणजे त्यांनी केलेली कॅडबरी डेरीमिल्कची जाहिरात. 

कॅडबरी ब्रँडची कोणतीही आठवण त्यांच्याशिवाय अपूर्ण असेल! कॅडबरीने २००४ मध्ये अमिताभ बच्चन यांना आपल्या सोबत घेतलं. नेमकं तेंव्हाच कॅडबरी मध्ये अळ्या निघाल्यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली होती. दरम्यान माध्यमांनी आणि लोकांनी ‘कॅडबरी’संदर्भातलं ते किड्यांचं प्रकरण उचलून धरलेलं होतं. मग वातावरण निवळण्यासाठी आणि ब्रँडच्या विश्वासाहार्यतेसाठी आणि ब्रँडचे समर्थन करण्यासाठी कंपनीने अमिताभ बच्चन यांना घेऊन जाहिरात करण्याचे ठरवले. अळीच्या वादानंतर ग्राहकांचा विश्वास परत मिळवण्यासाठी या जाहिरातीची मदत होणार होती. 

‘पप्पू पास हो गया’ ते ‘कुछ मीठा हो जाए’ या थीममुळे कॅडबरीने पुन्हा दमदार पॉल टाकले आणि त्यांच्या या जाहिराती देखील सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आवडल्या होत्या. 

त्यानंतरच ‘पप्पू’ हे पात्र अनेक ब्रँड्समध्ये खूप गाजले होते. 

जेंव्हा त्यांना ‘कॅडबरी च्या जाहिरात आली. तेंव्हा ‘कॅडबरी’ संदर्भातल्या सगळ्या गोष्टी बारकाईनं जाणून घेण्यासाठी ते उत्सुक होते. कारण त्याचदरम्यान माध्यमांनी आणि लोकांनी ‘कॅडबरी’संदर्भातलं ते किड्यांचं प्रकरण उचलून धरलेलं होतं. तो नेमका प्रश्न, त्यावर ‘कॅडबरी’नं देऊ केलेला प्रतिसाद आणि इतर आवश्यक ते संदर्भ असलं एक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच भरत पुरी यांनी अमिताभ यांना सादर केलं होतं.

अमिताभ यांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली, कारण त्यांचं म्हणणं होतं, की ‘ही वस्तू लहान मुलं खाणार आहेत, त्यामुळे ते करणार असलेल्या जाहिरातीमध्ये केवळ सत्यच असलं पाहिजे.’ हा त्यांचा आग्रह होता. हा फक्त पैशांचा प्रश्न नव्हता, तर आपण एक योग्य गोष्ट करीत आहेत याविषयी त्यांना शंभर टक्के खातरजमा करायची होती. एकदा का त्यांना ती गोष्ट पटली, की त्यांनीच नंतर म्हटल्याप्रमाणे त्यांना ‘अभिनय’ करण्याची गरज नव्हती. त्यांनी संपूर्ण विषय जाणून घेतला आणि मग काय, त्यांना पटलेली गोष्टच त्यांच्या अभिनयामध्ये उतरली होती.

अमिताभ यांच्याकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. ते म्हणजे ते अत्यंत मेहनती आणि व्यासंगी, अतिशय पर्फेक्शनिस्ट आहेत…तसेच ते वेळेचे पक्के आहेत. 

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.