मोदींची स्तुती केल्यामुळे नाही तर टायपिंग मिस्टेकमुळे चुकीची पदवी दिली गेलीये..

उत्तर प्रदेशातील अलीगड मुस्लिम विद्यापीठात एक अजबच प्रकार घडलाय..एका विध्यार्थ्याने मोदींची स्तुती काय केली त्याला आपली डिग्री वापस करायला लागली..अलिगढ मुस्लिम विद्यापीठ आता (AMU) सोशल मीडियावर वादाचा विषय बनला आहे. दानिश रहीम असं या विद्यार्थ्याचं नाव आहे.

होय झालं असं कि, उत्तर प्रदेशातील अलीगड मुस्लिम विद्यापीठात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केल्यामुळे विद्यापीठाने दानिश रहीम या पीएचडी प्राप्त विद्यार्थ्याला पीएचडीची डिग्री परत मागितली आहे अशी तक्रार या विद्यार्थ्याने केली आहे. मात्र विद्यापीठाने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

या रिसर्च स्कॉलरने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून न्याय मागितला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करावा, अशी मागणी दानिशने केली आहे. दानिशने या दोन्ही नेत्यांना पत्रं लिहून ही मागणी केली आहे.

दानिश रहीमच्या म्हणण्यानुसार, पीएम मोदींचे कौतुक केल्यामुळे त्यांना त्यांची पीएचडी पदवी परत करण्यास सांगण्यात आले आहे. दानिशच्या आरोपानुसार, त्यांना त्यांची भाषाशास्त्राची पदवी परत करण्यास सांगण्यात आले आहे आणि LAMM मार्केटिंगमधील जाहिरातीची भाषाची पदवी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.पण यामागे खरं कारण पीएम मोदींचे कौतुक केल्यामुळे त्यांना त्यांची पीएचडी पदवी परत करण्याच्या सूचना मिळाल्या आहेत, असं दानिश याचं म्हणण आहे.

पण विद्यापीठाचे असं म्हणणे आहे कि,  

“विद्यार्थ्याने एलएएमएम फॅकल्टीमध्ये संशोधन केलंय तर त्यांना एलएएमएमच्या ऐवजी चुकून  भाषाशास्त्रातील पीएचडी पदवी दिली गेली, म्हणून त्यांना चुकून दिलेली डिग्री वापस करा म्हणून सांगितलं गेलं जेणेकरून त्यांनी संशोधन केलेल्या विषयाची डिग्री देण्यात येईल”.  

दानिशने भाषा विज्ञान विभागातून एलएएम अभ्यासक्रमासाठी एमए आणि पीएचडी केली आहे. या विभागाकडून भाषा विज्ञानाची पीएचडी डिग्री दिली जाते. मात्र, दानिशने एलएएममध्ये एमए केलं आहे. तर त्यांना एलएएममध्ये पीएचडीची डिग्री मिळायला हवी. टायपिंगच्या चुकीमुळे दानिश यांना भाषा विज्ञानातील पीएचडी डिग्री देण्यात आली आहे. त्यामुळे त्याला डिग्री बदलण्यास सांगितलं आहे, असं विद्यापाठीचे प्रवक्ता शैफी किडवे यांनी सांगितलं आहे.

विद्यार्थ्याला अनवधानाने भाषाशास्त्रात पीएचडी पदवी देण्यात आली आहे. विद्यापीठाने टायपिंगची चूक असल्याचे कारण सांगितले गेलेय.

नेमकं प्रकरण आहे ???

२७ ऑक्टोबर २०१६ रोजी त्यांनी भाषाशास्त्र विभागात संशोधन अभ्यासक म्हणून प्रवेश घेतला. ९ मार्च २०२१ रोजी त्यांनी पीएचडी पदवी मिळवली. त्यांनी ‘न्यूज टॉक: इन्व्हेस्टिंग द लँग्वेज ऑफ हिंदी-उर्दू न्यूज मीडिया’ या विषयावर पीएचडी केली आहे.

दानिश च्या सांगण्यानुसार, ९ मार्च २०२१ रोजी हि पदवी देण्यात आली होती. दानिशची सहकारी मारिया नईमला देखील नोव्हेंबर २०२० मध्ये पीएडीची डिग्री देण्यात आली होती. पीएडी मिळून सहा महिने झाल्यानंतर  ४ ऑगस्ट २०२१ रोजी या दोन्ही विध्यार्थ्यांना विद्यापीठाने एक पत्रं पाठवलं. त्यात असं नमूद केलेलं कि, तुम्हाला चुकून हि पदवी देण्यात आली आहे ती परत करावी.

दानिशने सांगितल्यानुसार, त्यांना हे पत्रं आल्यानंतर खूप धक्का बसला. त्यांच्या लक्षात आलं कि, या दरम्यानच्या २२ डिसेंबर २०२० रोजी पंतप्रधानांचं कौतुक केलं होतं. पंतप्रधानांनी जेंव्हा अलीगड यूनिव्हर्सिटीच्या कार्यक्रमाला संबोधित केलं होतं. तेव्हा दानिशने त्यांचं कौतुक केलं होतं. तेंव्हा माध्यमांनी दानिशची मुलाखत देखील दाखवली होती. 

दानिशने पंतप्रधानांची स्तुती केल्यानंतर त्यांना विद्यापीठाकडून थोडी विलक्षण वागणूक दिली जाऊ लागली.

८ फेब्रुवारीतो  रोजी दानिशचा वायवा होता. त्यापूर्वी त्यांना चेअरमनने बोलवून घेतलं होतं. तू विद्यार्थी आहेस. कोणत्याही राजकीय पक्षाच्या बाबत तू अशी उघडपणे भूमिका मांडणं योग्य नाही. राईट विंगच्या भुमिकेप्रमाणेच तू त्या दिवशी बोलत होता, असं चेअरमन दानिशला म्हणाले होते, असा दावा  दानिशने केला आहे.

एएमयूच्या निर्णयामुळे संतप्त झालेल्या डॉ.दानिश रहीम यांनीही उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दानिश रहीमने सांगितले की, विद्यापीठाने आपली फसवणूक केली आहे. हे कोणत्याही विध्यार्थ्यासाठी खूपच त्रासदायक आहे. त्यावेळेस मी चेअरमनला कोणतंही उत्तर दिलं नाही. त्यानंतर मला डिग्री मिळाली. पण आता चुकून डिग्री दिल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत मी विद्यापीठाला पत्रं दिलं आहे. पण त्यावर अजून काही उत्तर आलं नाही किंवा कार्यवाही ही झाली नाही. त्यामुळे मी नाईलाजाने कोर्टात धाव घेतली आहे.  विद्यापीठाने विद्यार्थ्याच्या करियरशी खेळू नये. असं दानिश यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले. 

या प्रकरणावर ७ डिसेंबरला सुनावणी होणार आहे…तेंव्हाच कळेल काय ते ..

 

Leave A Reply

Your email address will not be published.