बसीरन ‘अम्मी’ आपल्या ८ पोरांच्या जीवावर दिल्लीत गॅंग चालवायची

डॉन,बसीरन उर्फ़ अम्मी

आजही दिल्लीतील संगम विहार भागात या या लेडी डॉनची भीती असल्याचे सांगितले जाते. या लेडी डॉनला परिसरात भीतीपोटी सर्वजण प्रेमाने ‘मम्मी’ म्हणतात.

बसीरन आपल्या ८ मुलांच्या जीवावर संगम विहार भागात दहशत निर्माण केली होती. बसीरन आणि त्याच्या आठ मुलांवर कमी अधिक नाही तर गंभीर ११३ गुन्हे दाखल आहेत. यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी, सुपारी देऊन खून करणे अशा गुन्हांचा समावेश आहे.

आता हळुहळू बसीरनची गुन्हेगारी राजवट संपुष्टात येत आहे. तिचे दोन मुले तुरुंगात आहेत तिचे तीन मुल अजूनही फरार आहे. तर डॉन अम्मीचे तीन मुले जामिनावर बाहेर आहेत. या लेडी डॉनला शोधण्यासाठी संगम विहार पोलिसांनी अथक प्रयत्न केले होते. शेवटी गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात तिला अटक करण्यात आली.

लहान मुलांना अंमली पदार्थांचे व्यसन लावून गुन्हे घडवून आणायची.  

बसीरन आणि त्याचे मुलचं गुन्हे करत असे नाही. ते राहत असलेल्या  परिसरातील निष्पाप मुलांकडून गुन्हे करुन घेत. आधी त्या अल्पवयीन मुलांना गुंगीचे औषध पाजायचे आणि मग त्यांना गुन्ह्याची प्रत्येक बारकावे शिकवायची. एवढेच नाही तर या अल्पवयीन मुलांना प्रशिक्षण देऊन असे गुन्हे करायला लावले जात की, ज्यात पकडले गेले तरी ते सहज सुटू शकतील. 

संगम विहार परिसरात बसीरनची एवढी दहशत होती की, तिने त्याने सरकारी मालकीचे बोअरवेलही आपल्या ताब्यात घेतले होते. ज्याला सरकारी बोअरवेलचे पाणी घ्यायचे होते त्याला ते बदल्यात तेथील लोकांनी तिला पैसे द्यावे लागाचे. 

बसीरन या गुन्ह्याची सुपारी घेऊन तिचे मुले आणि त्यांनी प्रशिक्षण दिलेला अल्पवयीन मुलाला गुन्हा कसा करायचा हे सांगायचे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगम विहार परिसरातील बहुतांश अल्पवयीन मुलांना गुन्हेगारीच्या विश्वात ढकलण्याचे काम या लेडी डॉनने केले आहे. बसीरनच्या नावाखाली या निष्पाप मुलांनी आतापर्यंत अनेक मोठे मोठे गुन्हे केले आहेत. बसीरनच्या आठही मुलावर अनेक खटले दाखल आहेत. 

एकट्या बसिरन याच्यावर खून, खुनासह नऊ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याचवेळी तिचा मोठा मुलगा शमीम याच्यावर ४१, दुसरा मुलगा शकीलवर १५, तिसरा मुलगा वकिलावर १३, चौथा मुलगा सनी याच्यावर ९, पाचवा मुलगा फैजल याच्यावर ९ गुन्हे सहावा मुलगा राहुल याच्यावर ३ तर सातवा मुलगा सलमान याच्यावर २ गुन्हे दाखल आहेत. बसीरनचा धाकटा मुलगा हा सुद्धा अल्पवयीन आहे. 

बसीरनच्या या अल्पवयीन मुलावर ११ गुन्हे दाखल आहेत. बसीरन यांच्या मुलांविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, दरोडा, चोरी, अवैध शस्त्र बाळगणे कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

दिल्लीतील संगम विहार भागात असलेले बसीरनचे घर सध्या न्यायालयाच्या आदेशाने सील करण्यात आले आहे. पण एकेकाळी दिल्लीची ही लेडी डॉन याच घरातून आपलं साम्राज्य चालवायची.

या महिला डॉनने पोलिसांपासून वाचण्यासाठी घराभोवती सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते, जेणेकरून पोलिसांना सुगावा लागताच ती आपल्या मुलांसह घरापासून काही अंतरावर असलेल्या जंगलातून पळून जाऊ शकत. एवढेच नाही तर बशीरनचे मुले कुठलाही गुन्हा केल्यानंतर गुन्ह्याच्या खुणा याच जंगलात गाडून टाकायचे.

बसीरनने संगम विहार परिसरात राहणाऱ्या मुन्नी नावाच्या महिलेकडून तिच्या भावाचा खून करण्यासाठी ८० हजारांची सुपारी घेतली होती.आणि त्याची हत्या केली होती. त्याच्या खून सुद्धा याच जंगलात पुरला. सध्या बशीरन पोलिसांच्या ताब्यात असून, या भागात खर्‍या अर्थाने तो व त्याचे फरार मुले पोलिसांच्या ताब्यात आल्यावरच त्याच्या भीतीतून मुक्तता मिळेल.

 हे ही वाच भिडू 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.