“सबको एकट्ठा करो…आज मुजफ्फरनगर का भौकाल खत्म करना हैं”

“सबको एकट्ठा करो…आज मुजफ्फरनगर का भौकाल खत्म करना हैं”

मोहित रैनाच्या पहाडी आवाजात भौकाल’ या सुपरहिट वेब सीरिजच्या दुसऱ्या सिझन मधला हा डायलॉग ऐकला अन भौकालची प्रतीक्षा संपली…या प्रतिक्षेला पूर्णविराम देत अलीकडेच भौकालचा दुसरा सिझन ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे.

हा सीझन प्रेक्षकांना मुझफ्फरनगरच्या दुनियेत घेऊन जाईल, जो एकेकाळी यूपीच्या मातीतल्या  जंगलराजसाठी कुप्रसिद्ध आहे….जिथे मारामारीपासून ते खुनापर्यंत प्रत्येक प्रकारची भितीदायक गोष्ट सुद्धा अगदी सहज केली जाते. त्याचं वावगं ना तेथील जनतेला असतं ना गुन्हेगारांना कायद्याचा चाप असतो. कायद्याला अन पोलीस प्रशासनाला हातातलं खेळणं समजल्या जाणाऱ्या या गुंडशाहीला कंट्रोल करण्यासाठी दबंग ऑफिसर मैदानात उतरतो…अन सगळ्यांची दाणादाण उडते. 

पण हा या सिरीजची अन मोहित रैनाच्या ऍक्टिंगच्या बद्दलची एक खास गोष्ट म्हणजे रैना ज्याप्रकारे एन्काउंटर स्पेशालिस्ट ऑफिसरची भूमिका करतो तिथे कोणत्याही प्रकारे ओव्हरऍक्टिंग वाटत नाही…ना हवेत उडून तो गुंडांच्या छाताडावर बुक्की मारतो ना पायाने जमिनीवरची धूळ उडवतो…हा साधा सिम्पल अधिकारी , फॅमिली मॅन जो कायद्याने गुन्हेगारीवर नियंत्रण आणू पाहतो..

पण ज्यांच्या खऱ्या आयुष्यावर हि सिरीज आहे ते ऑफिसर कोण आहेत याची माहिती तुम्हाला नसेल तर आम्ही सांगू कि, उत्तर प्रदेशातील एन्काउंटर स्पेशालिस्ट आयपीएस ऑफिसर नवनीत सेकेरा यांच्या जीवनावर आधारित ही सिरीज आहे. ज्यामध्ये मोहित रैना यांनी आयपीएस ऑफिसर नवनीत सेकेरा यांची भूमिका केली आहे. उत्तर प्रदेशातील त्या ‘सुपर कॉप’ म्हणून त्यांना ओळखलं जातं. 

यानिमित्ताने एन्काउंटर स्पेशालिस्ट नवनीत सेकेरा यांचा एक किस्सा फार इंटरेस्टिंग आहे. तो म्हणजे, वॉन्टेड गुन्हेगारांच्या नातेवाईकांना ऑफिसमध्ये बोलावून चहा ते त्यांना चहा ऑफर करायचे. 

एन्काउंटर स्पेशालिस्ट नवनीत सेकेरा हे ठाण्यात वॉन्टेड गुन्हेगारांच्या नातेवाईकांना चहा देत असायचे. नवनीत सेकेरा यांनी स्वतः एकदा त्यांच्या आयुष्यातला चकमकीचा एक किस्सा शेअर केला. जेंव्हा त्यांचा मेरठ कोर्टात गुन्हेगारांसोबत चकमक झाली होती. पण त्यांच्या सांगण्यावरून त्यांना कधीच गुन्हेगारांना ,मारायचे नसते तर त्यांना शरण आणणे हेच त्यांचे टार्गेट असते पण कधीकधी पर्याय उरत नाही.

नवनीत सिकेरा यांना त्याबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की प्रत्येक गुन्हेगाराने आत्मसमर्पण करावे अशी त्यांची इच्छा असते. 

इतकेच नाही तर ते असंही म्हणतात कि, त्याबद्दल ते गुन्हेगारांच्या  कुटुंबातील सदस्यांना आधी फोन करून समजावून सांगायचे की त्यांच्या पोराने सरेंडर करावे…नाही तर मग जो या सिस्टममधून जातो तो गुन्हेगार नक्कीच मारला जाईल.

‘एका यूट्यूब चॅनलशी बोलतांना नवनीत सेकेरा यांनी म्हणलेलं कि, पोलीस प्रशासनाची हि जबाबदारी आहे कि, त्यांनी जनतेला एक निर्भय आणि शांतता, सुव्यवस्था असलेला समाज निर्माण करावा. लोकांच्या मनात प्रशासनाच्या बाबतीत विश्वास निर्माण करणे ही पोलिसांची जबाबदारी आहे.  जर लोकांमध्ये, नागरिकांमध्ये गुंडांची, गुन्हेगारांची भीती असेल , त्यांची दहशत असेल तर आम्हा पोलिसांचा या समाजासाठी काही एक फायदा नाही. 

त्यांनी सांगितलं कि, अनेक वेळा असंही घडलंय कि, गुंडांच्या पालकांनी आपल्या गुंड मुलाला खोलीत बंद करून ठेवलेलं असतं आणि आम्हाला बोलावलं जातं की, साहेब आमच्या गुन्हेगार असलेल्या या पोराला घेऊन जा, त्याला अटक करा”.

मेरठ कोर्टात जेंव्हा गोळीबार झाला होता तेंव्हा नेमकं काय घडलं होतं?

मेरठच्या कोर्टात झालेल्या एन्काउंटरवर नवनीत सेकेरा म्हणतात, ‘मेरठमधील कोर्टात झालेली चकमक अगदी खरी होती कारण कोर्टात एन्काउंटरची योजना कोणीही बनवणार नाही. ज्या न्यायालयात हजारो लोकं उपस्थित असतात अन त्यात तिथे पोलिसांनी एन्काऊंटरची योजना आखावी, हे कसं शक्य आहे? अन हे कोर्ट तर माझ्या घराजवळच होते. ही घटना कळताच मी लगेच बाहेर पडलो आणि धावत तिथे पोहचलो. तेंव्हा तिथे गोळीबार होत होता त्यामुळे मीही तिथे पोहोचलो पण त्यानंतर गोळीबार झाला नाही.

आपल्या एन्काउंटर असण्याच्या भूमिकेबद्दल ते हे देखील वारंवार स्पष्ट करत असतात कि, ‘मी तत्त्वतः कधीही चुकीचे केले नाही आणि करणार देखील नाही. अन जरा का मी कायद्याच्या बाहेर जाऊन काही मनमानी कारभार केला तरी मला या खुर्चीवर बसण्याचा अधिकारच उरणार नाही. अनेक गुन्हेगार असे हिस्ट्री शीटर बनले होते आणि त्यांच्यावर कधीही गुन्हा दाखल झाला नव्हता, अशा सराईत गुन्हेगारांना मात्र मी कायमच धडा शिकवत आलो आहे आणि पुढे देखील शिकवणार हे देखील ते तितक्याच खंबीरपणे म्हणतात.

कोण आहेत हे नवनीत सिकेरा ??

नवनीत सेकेरा यांचा जन्म २२ ऑक्टोबर १९७१ हे उत्तर प्रदेश कॅडरचे १९९६ च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत. सध्या, पोलीस मुख्यालय लखनौ, उत्तर प्रदेश पोलीस येथे गृह आणि कल्याणचे अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत आहेत.

नवनीतने एटा जिल्ह्यातील ऑल बॉईज स्कूलमधून हायस्कूल पास केले, त्यानंतर तो दिल्लीच्या हंसराज कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी गेला. मात्र कॉलेजमध्ये इंग्रजी येत नसल्याने त्याला प्रवेश अर्ज देण्यात आला नाही. फॉर्म न मिळाल्याने त्यांनी हार न मानता स्वतः पुस्तके खरेदी करून अभ्यास केला. त्यांच्या कठोर मेहनतीमुळे त्यांनी एकाच वेळी IIT सारखी परीक्षा उत्तीर्ण केली आणि IIT रुरकीमधून सॉफ्टवेअर अभियांत्रिकीमध्ये पदवी पूर्ण केली.

पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नवनीत यांनी आयआयटी दिल्लीमध्ये एमटेकसाठी ऍडमिशन घेतलं. मात्र, वडिलांसोबत झालेल्या अपघातामुळे त्यांना पोलीस सेवेत रुजू होण्यास प्रवृत्त केले. नवनीत सांगतो की त्याच्या वडिलांना काही धमकीचे फोन येत असायचे. त्यांचे वडील याबाबत तक्रार करण्यासाठी एकदा पोलीस ठाण्यात गेले, मात्र पोलिसांनी कारवाई न करता वडिलांचा अपमान करत त्यांना पोलीस ठाण्यातून हाकलून लावलं होतं. 

याच घटनेचा नवनीतवर खूप परिणाम झाला आणि त्याने एमटेक सोडून यूपीएसी परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला. आणि पहिल्याच अटेंम्प्ट त्यांनी UPSC IAS परीक्षा पास केली…तेही कोणत्याही कोचिंगचा सहारा न घेता नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली होती. त्यांची रँक इतकी चांगली होती की त्यांना सहज आयएएस पद मिळू शकत होते. पण त्यांनी आयपीएस होण्याचे स्वप्न पाहिले आणि तेच निवडले. वयाच्या ३२ व्या वर्षी ते लखनौचे सर्वात तरुण एसएसपी बनले होते.

रमेश कालियाच्या एन्काउंटरनंतर ते पहिल्यांदा चर्चेत आले होते……

 

लखनौमध्ये कुख्यात गुंड रमेश कालियाच्या एन्काउंटरनंतर आयपीएस नवनीत सिक्केराचं नाव चर्चेत आलं होतं. त्यांनी आतापर्यंत ६० चकमकी केल्या आहेत. २००१ मध्ये, GPS-GIS आधारित ऑटोमॅटिक व्हेईकल लोकेशन सिस्टम (AVLS) विकसित केल्याबद्दल उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांना ५ लाखांचे बक्षीस दिले होते. यासोबतच २००५ आणि २०१३ मध्ये पोलीस खात्यातील अद्भूत योगदानाबद्दल त्यांना राष्ट्रपती पदकही मिळाले आहे.

नवनीत सेकेरा हे सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असतात. एवढेच नाही तर फेसबुकवर येणाऱ्या लोकांच्या तक्रारींवरही ते तातडीने कारवाई करत असतात. सर्वसामान्यांच्या सुरक्षेसाठी नवनीत पोलिस सेवेत रुजू झाले होते आणि हाच उद्देश ते अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण करत आहेत म्हणूनच अशाच धाडसी अधिकाऱ्यांच्या आयुष्यावर असे अनेक सिरीज, सिनेमा याव्यात…

हे हि वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.