१९९२ च्या दंगलीतून एका मुस्लीम कुटूंबाने त्यांचे प्राण वाचवले होते, आणि २६ वर्षांनंतर…
खवय्यांच्या दुनियेत विकास खन्ना या नावाला प्रस्तावनेची गरज नसली तरी इतरांसाठी सांगतो की विकास खन्ना हे सेलिब्रिटी सेफ आहेत. शेफ म्हणून त्यांचं त्यांनी जागतिक कीर्ती मिळवलीये. ‘मास्टरशेफ इंडिया’ या कार्यक्रमाचे जज म्हणून देखील त्यांनी काम बघितलेलं आहे.
मुळचे भारतीय आणि सध्या अमेरिकेत असणारे विकास खन्ना यांनी यांची एक मुलाखत आणि आणि सोशल मिडीयावरील पोस्ट प्रचंड व्हायरल झाली होती. त्यासाठी त्यांचं खूप कौतुक देखील झालं होतं.
रिपब्लिक टीव्हीच्या अनुपम खेर यांच्यासोबतच्या ‘पिपल’ या मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये जेव्हा विकास खन्ना आले होते.
त्यावेळी त्यांनी १९९२ सालच्या मुंबईच्या दंग्यांमध्ये एका मुस्लीम कुटुंबाने आपले प्राण कसे वाचवले होत, याला उलगडा केला होता.
This is one of the happiest day of my life. @AnupamPKher ji had interviewed me last year for @republic & I shared the story of Muslim family that saved my life during riots.
WE FOUND THEM & today I shall break the fast with them
vikas khanna Anupam Kher https://t.co/wldNhL5it2— Vikas Khanna (@TheVikasKhanna) June 11, 2018
अनुपम खेर यांच्यासोबतच्या या मुलाखतीमध्ये विकास यांनी ही घटना सांगितली होती. या घटनेनंतर जवळपास २६ वर्षांनी विकास यांनी या मुस्लीम कुटुंबाला शोधून काढलं आणि आपला ईद त्यांच्याबरोबर साजरा केला.
या भेटीला आपल्या आयुष्यातील हृदयस्पर्शी आणि अविस्मरणीय क्षण असल्याचं सांगत अश्रू, आनंद, दुःख, साहस, गर्व, माणुसकी आणि कृतज्ञता या सर्व भावना एकाच वेळी अनुभवत असल्याचं त्यांनी म्हंटलं होतं.
नेमकी घटना काय होती..?
१९९२ साली विकास हे मुंबईतील ‘सी रॉक शेरेटन’ हॉटेलमध्ये कामाला होते. त्याचवेळी मुंबईत दंगे भडकले होते. कुठल्याच व्यक्तीला हॉटेलमधून बाहेर पडता येत नव्हतं आणि हॉटेलचा नवीन स्टाफ देखील आत येऊ शकत नव्हता. त्यामुळे ते हॉटेलमध्येच अडकले होते.
तेवढ्यात बातमी आली की घाटकोपर परिसरात परिस्थिती खूपच चिघळलिये. विकास यांच्या चिंतेत अजून वाढ झाली कारण त्यांचा भाऊ घाटकोपरमध्ये राहत होता. विकास हॉटेलमधून बाहेर पडले आणि घाटकोपरकडे जाण्यासाठी निघाले. कुणीतरी त्यांना खार स्टेशनपर्यंत सोडलं पण पुढे जाण्यासाठी ट्रेन बंद होत्या.
मुस्लीम कुटुंबाने वाचवले होते प्राण
#RamadanMubarak to all. May this Holy month be filled with blessings of peace, prosperity and love. I was training in…
Chef Vikas Khanna ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಬುಧವಾರ, ಜೂನ್ 17, 2015
अशा परिस्थितीत घाटकोपरकडे जाणारा रस्ता शोधत असताना एका मुस्लीम कुटुंबाने त्यांना अडवलं आणि बाहेरची परिस्थिती अत्यंत वाईट असल्याने आणि जागोजागी दंगेखोर लोक फिरत असल्याने त्यांना आपल्या घरात घेतलं.
तेवढ्यात दंगेखोर लोकांचा एक जमाव त्या घरात घुसला आणि बाहेरून घरात घेतलेल्या ‘विकास’ यांच्याकडे बोट दाखवत ‘हा मुलगा कोण’ अशी विचारणा या कुटुंबाकडे करण्यात आली.
घरातीलच एका व्यक्तीने ‘हा आमचा मुलगा आहे’ असं सांगितलं.
त्यानंतर त्यांनी परत विचारलं की ‘हा मुस्लीम आहे का..?’
त्यावर उत्तर देण्यात आलं, ‘हो’
त्यानंतर दंगेखोर जमाव तिथून निघून गेला आणि पुढे जवळपास दीड दिवस विकास खन्ना हे या कुटुंबातच राहायला होते. या कुटुंबाने आपल्या जावयाकरवी विकास यांचा घाटकोपरमध्ये राहत असलेला भाऊ सुरक्षित असल्याची खातरजमा देखील करून घेतली होती.
कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी आणि सौख्यासाठी रोजा
Like every year since 1992 in the month of Ramadan, I fast for a day.Today was my fast (known as rōza), in honor of a…
Chef Vikas Khanna ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶನಿವಾರ, ಜೂನ್ 24, 2017
या प्रसंगातून बाहेर पडल्यानंतर कामाच्या निमित्ताने विकास हे जगभर फिरत होते पण त्यांचा या कुटुंबासोबतचा संपर्क तुटला होता. पण दरम्यानच्या काळात त्यांनी या कुटुंबाचा शोध देखील थांबवला नव्हता.
विशेष म्हणजे तेव्हाचपासून विकास हे दरवर्षीच्या रमजानमध्ये एक दिवस या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी आणि सौख्यासाठी रोजा ठेवतात. दंगलीत आपले प्राण वाचविलेल्या या कुटुंबाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी हा मार्ग निवडला होता.
शेवटी यावर्षी विकास यांनी या कुटुंबाला शोधून काढलं आणि आपला रोजा या कुटुंबासोबत सोडला.
हे ही वाच भिडू
- हे ख्रिश्चन देशासाठी लढले होते, फक्त ते ख्रिश्चन म्हणून नाही तर भारतीय म्हणून लढले होते.
- मुस्लीम असल्याने डॉ.अब्दुल कलमांची बसण्याची जागा बदलण्यात आली होती..!!!
- कधीकाळी पोलिसांवर दगडफेक केली होती, सध्या जम्मू-काश्मीरमधील फुटबॉलचा चेहरा म्हणून ओळखली जाते!!!
- पाकिस्तानी अधिकाऱ्यांमुळे अपहरण करण्यात आलेल्या ६६ भारतीयांचा जीव वाचला होता !!!