कोटींमध्ये विकल्या जाणाऱ्या मांडूळ सापामुळे खरंच गुप्तधन सापडतं का ?

बातम्यांमध्ये कायम एक आपण वाचत, ऐकत अलोत कि, मांडूळ जातीच्या सापाची तस्करी करणार्यांना पोलिसांनी पकडले. अमुक शहरात कोटींच्या किंमतीमुळे मांडूळ साप विकतांना रंगेहाथ पकडले इत्यादी. 

अगदी अलीकडेच नेहेमीप्रमाणेच पोलिसांनी मांडुळाची तस्करी करणाऱ्याला पकडलं. कराडजवळ रेड सॅण्डबो’ जातीच्या मांडुळासह त्याची तस्करी करणाऱ्याला अटक केली होती. सर्वसाधारण शेतात आढळणाऱ्या रानातील मांडूळाची ३० लाखांची किंमत सांगितली गेली. पण एका साध्याश्या कीटकाची किंमत इतकी जास्त ?? ही किंमत ठरवली कोणी? अंधश्रद्धेपोटी मांडूळाची तस्करी होत असेलही. मात्र, त्याची किंमत इतकी जास्त असेल हे पटतच नाही. आणि म्हणूनच अंधश्रद्धोपोटी वाढणाऱ्या मांडूळाच्या किमतीमागची आर्थिक घडीही बघायला लागेल. 

पण महाराष्ट्र, भारतातच नाही तर जगातच फक्त मांडूळ जातीच्याच सापाची तस्करी का केली जाते ? खरंच हा साप कोटींच्या मोलात का विकला जातो ?

तुम्ही गावाकडे हि अशा गप्पा ऐकल्या असतील, मांडूळ नावाचा दोन तोंडाचा साप जर वाड्यात सोडला, कि तो साप जिथंपर्यंत सरपटत जाणार आणि ज्या जागेवर थांबणार त्याच जागी खणून काढलं धन मिळतंय…हो या गप्पा सऱ्हास कानावर आजच्या काळातही पडतातच. तुम्ही म्हणाल मग हे असले अंधश्रद्धेचे प्रकार इथेच चालत असणार, फारतर फार देशातल्या राज्यांमध्ये चालत असणार. तर असं नाहीये.

या मांडूळ जातीच्या सापाला युरोप आणि अमेरिका सारख्या प्रगत देशांमधूनही मागणी असते. 

म्हणजेच अंधश्रद्धा काय फक्त भारतातच नाही तर बाहेरच्या देशात देखील आहे आणि म्हणूनच हि साप लाखों, कोटींमध्ये विकली जातात. 

बाहेरील देशात या सापाची वाढती मागणी आहे पण त्यामागे एक वैज्ञानिक कारण आहे ते म्हणजे, या देशात हा साप पाळायला कायद्याने परवानगी आहे पण तेथे या सापाची उत्पत्तीच होत नाही. कारण या देशांमध्ये थंड हवामान असते आणि मांडूळ जातीचा नावाचा हा साप उष्णकटिबंधात आढळतो. आणि म्हणूनच हा साप बाहेरील देशातल्या थंड हवामानात जास्त काळ तग धरू शकत नाही. आणि जरी टिकला तर त्याची वाढ ठराविकच होत असते. 

भारत, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, भूतान या देशांमधील हवामान मांडूळ या सापाला खूपच पोषक असते. त्यातल्या त्यात भारतात तर सर्वाधिक मांडूळ जातीचे साप आढळतात.

पण या काळ्या बाजारातले काही नियम असतात ते म्हणजे, या  कमीत-कमी ३ किलो किंव्हा त्याही पेक्षा जास्त असायला लागते तरच  देशात कोटींची किंमत मिळते. पण विषय असाय कि, प्रत्येक साप हा ३ किलोचा असतोच असं नाही, मोजकेच साप आढळतात ज्यांचे वजन इतके जास्त असते. 

आता महत्वाचा प्रश्न म्हणजे, हा साप कोटींच्या किंमतीत का विकला जातो ?

यामागे असणारी अंधश्रद्धाच मुख्य कारण आहे आणि त्या अंधश्रद्धेचे गैरसमज म्हणजे,  बऱ्याच लोकांना वाटतं कि, हा साप दुतोंडी आहे. त्यातलं एक तोंड तो सहा महिने आणि दुसरं तोंड तो दुसरे सहा महिने वापरतो. पण या गैससमजात जगणाऱ्या लोकांना हे पटत नाही कि, खरं तर या सापाला एकच तोंड असते. त्याचं शेपूट हे टोकदार नसल्यामुळे तोंडासारखंच भासतं. आता कोटींमध्ये विकला जाणारा हा साप अंधश्रद्धा म्हणून विकला जातो, त्याला आंतराष्ट्रीय बाजापेठेत मोठी मागणी असते. 

मांडूळाच्या शरीरात असणारी हाडे हि या काळ्या जादूसाठी वापरली जातात. मंत्रोच्चार करून हि हाड   गळ्यात घातली तर तो माणूस अदृश्य होतो असा गैरसमज आहे. पण सांगितलं जात कि, या तांत्रिक विद्येला कमीत कमी ५ वर्षांचा काळ जाऊ द्यावा लागतो.

दुसरा गैसमज म्हणजे, या मांडूळ सापावर काही तांत्रिक प्रयोग करून धन मिळते असं म्हणतात. जर तांत्रिक विद्या यशस्वी झाली तर पैशांचा पाऊस पडतो असाही समज असल्यामुळे, श्रीमंत होण्याच्या लालसेपोटी लोकं मांडुळासाठी कोट्यवधी रुपये मोजायला तयार होतात. विकणाऱ्या लोकांना हेच पाहिजे असतं आणि मग प्राण्याची तस्करीचे प्रमाण वाढते. 

या काळ्या जादूच्या वापरासाठी सोडलं तर इतरही काही कारणं आहेत ज्यामुळे या सापाची मागणी बाहेरच्या देशात आहे.

काही लोकं असा दावा करतात कि, या सापाच्या शरीरात असं एक रसायन आढळतं ज्याच्यापासून सोनं बनवलं जातं. जेवढा मोठा मांडूळ तेवढं जास्त सोनं म्हणून जास्तीत जास्त मांडूळ तस्करी बाजारात डिमांड मध्ये असतो. 

दुसरं एक कारण म्हणजे, बाहेरील काही देशांत मांडूळापासून एक प्रकारचे औषध तयार केले जाते जे सेक्स पॉवर वाढवते असं सांगितलं जातं. युरोप, अमेरिकेत काही वृद्ध पुरुष एकटेच राहतात. संपत्तीची कमी नसते पण शारीरिक संबंध ठेवण्यासाठी, त्यासाठी यौव्वन शक्ती कितीतरी पटीने वाढवण्यासाठी त्यांना या औषधाची गरज असते. वर आपण बोलल्याप्रमाणे त्या देशांमध्ये मांडूळ जातीचे साप मिळत नसतात. म्हणूनच या सापांना मागेल ती किंमत देण्यास तयार होतात. भारतामध्ये या सापाच्या तस्करीवर बंदी जरी असली तरी काही लोकं लपून या सापांना पाळतात आणि चोरून जहाजावाटे इतर देशांमध्ये पाठवतात. 

आणखी एक दावा म्हणजे या सापामुळे एड्स हा आजार बरा होतो. 

मांडूळाच्या शरीरामध्ये मिळणाऱ्या काही रसायनांमुळे एड्स नावाचा आजार बरा होतो गैरसमज आहे. काही लोकं असंही म्हणतात कि, एड्स असणाऱ्या रुग्णाला मांडूळ साप खायला दिला तर एड्स एकदम बरा होतो. हेही एक कारण आहे कि याची मागणी वरचेवर वाढत आहे. पण याबद्दल वैज्ञानिक दावा मात्र कुणीही केलेला नाही..आम्ही देखील अशा प्रकारचा कोणताही दावा करत नाही ना अंधश्रद्धा पसरवत नाहीत. 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.