एम्प्लॉयी सोबत रिलेशन ठेवले म्हणून मॅकडोनाल्डच्या सीईओलाच कंपनीतुन काढून टाकले.
ऑफिसमध्ये चालणारे रिलेशनशिप, अफेअर्स आपण बऱ्याचदा पाहतो, ऐकतो. थोडक्यात कुणाचं कोणासोबत चालू आहे हे ऑफिसमधला एक गॉसिपचा विषय असतो. पण बरेच असेही ऑफिस असतात जिथे नियमच केला जातो कि, तुम्ही तुमच्या कलीग सोबत रिलेशन नाही ठेवू शकत.
सेम हाच नियम जगातील सर्वात मोठी फूड चेन कंपनी असलेल्या मॅकडोनाल्ड कंपनीत देखील आहे….मग कंपनीचा सीईओ का असेना त्यालाही हा नियम लागू होतो. मॅकडोनाल्डचे सीईओ स्टीव्ह इस्टरब्रुक हे आता नियामुळे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. त्याच झालं असं का या साहेबांनी आपल्याच कंपनीतल्या एका कर्मचाऱ्यांसोबत संबंध ठेवले आणि हेच रिलेशन आता त्यांना महागात पडले आहे.
खरं तर स्टीव्ह इस्टरब्रुक आणि त्या महिलेचे रिलेशन हे सहमतीपूर्णच होते पण तरीही कंपनीच्या धोरणाचे उल्लंघन केल्यामुळे त्याला मॅकडोनाल्ड्सने कंपनीतूनच काढून टाकले. सोबतच स्टीव्ह इस्टरब्रुक यांना १०५ दशलक्ष डॉलर्स रोख आणि स्टॉकमध्ये परत करायला लागले.
सोबतच त्यांचे बोर्ड ऑफ डायरेक्टरचं पदही गेलं.
मॅकडोनाल्ड बोर्डाने कंपनीची नियम मोडल्यामुळे स्टीव्ह इस्टरब्रुक यांना संचालक मंडळातून पण काढून टाकले आहे. यामुळे स्टीव्ह इस्टरब्रुकने कंपनीची माफी मागितली. तसेच त्यांनी कंपनीला एक ई-मेलही केला, जो कंपनीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या ई-मेलमध्ये असे लिहिले होते की,
‘माझ्याकडून ती चूक झाली. कंपनीची प्रतिष्ठा राखण्यासाठी मॅकडोनाल्ड बोर्डाचा निर्णय मी स्वीकारतो. मला वाटते आता वेळ आली आहे की मी येथून निघून जावे”. – स्टीव्ह इस्टरब्रुक, मॅकडोनाल्ड कार्यकारी अधिकारी, संचालक मंडळ
मॅकडोनाल्डच्या सीईओसोबत संबंध ठेवल्यामुळे त्या महिलेला देखील कंपनीतून निलंबित करण्यात आले आहे, ती त्याच मॅकडोनाल्डच्या ऑफिसमध्ये काम करत होती. वास्तविक, कंपनीच्या सीईओच्या कर्मचाऱ्याशी संबंध ठेवणे कंपनीच्या धोरणाच्या विरोधात आहे आणि सीईओ ईस्टरब्रुक यांनी असे करून कंपनीचे धोरण मोडले आहे. जरी हे नाते त्या महिलेच्या आणि इस्टरब्रुक यांच्या परस्पर संमतीने होते तरी ते कंपनीच्या नियम बाह्य असल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
२०१९ मधेच त्यांचे रिलेशन उघडकीस आले होते.
ऑक्टोबर २०१९ मध्ये, मॅकडोनाल्ड्सने ईस्टरब्रुक आणि त्या महिला कर्मचाऱ्याशी असलेल्या संबंधांची चौकशी सुरू केली होती. या तपासादरम्यान, असे आढळून आले की ईस्टरब्रूकचे त्या महिलेशी, शारीरिक संबंध आहेत, तसेच काही ठराविक मजकूर पाठवणे आणि व्हिडिओ कॉलचा समावेश असलेले पुरावे सापडले होते.
त्यानंतर कंपनीने इस्टरब्रुक विरुद्ध खटला दाखल केला. चौकशी दरम्यान इस्टरब्रुकने सांगितले होते कि, मॅकडोनाल्डच्या दुसर्या कर्मचाऱ्याशी त्याचे संबंध जिव्हाळ्याचे होते परंतु त्याने कधीही “कोणत्याही मॅकडोनाल्डच्या महिला कर्मचाऱ्याशी शारीरिक लैंगिक संबंध ठेवले नाहीत”. पण कंपनीने करारानुसार, अप्रामाणिकपणा, फसवणूक, बेकायदेशीरता किंवा नैतिक पतन इत्यादी निकषानुसार बोर्डाने नोव्हेंबर २०१९ मध्ये ईस्टरब्रुकला काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता. तसेच नुकसानभरपाई देण्यासाठी सांगितले गेले.
पण त्यानंतरही २०२० मध्ये मॅकडोनाल्डला एक निनावी चिठ्ठी अली होती, ईस्टरब्रूक सीईओ असताना त्यांचे कंपनीतल्या एकाच नाही तर ३ महिला कर्मचाऱ्याशी लैंगिक संबंध होते.
त्यानंतर मॅकडोनाल्ड्सने आणखी एक अंतर्गत तपासणी केली ज्यामध्ये फोटोग्राफिक पुरावे उघड झाले की ईस्टरब्रुकने एकच नाही तर तीन- तीन कर्मचाऱ्यांसोबत शारीरिक लैंगिक संबंध ठेवले होते. कंपनीने खटल्यादरम्यान आपली बाजू मांडत स्पष्ट केले, “त्या पुराव्यामध्ये या कंपनीच्या त्या महिला कर्मचाऱ्यांचे नग्न फोटो आणि व्हिडिओ मिळाले आहेत. जे सर्व २०१८-२०१९ च्या दरम्यानचे आहेत.
आणि पुन्हा एकदा स्पष्ट झाले कि, निर्विवाद पुरावा होता जो स्पष्टपणे सूचित करतो की ईस्टरब्रुक मागील तपासादरम्यान खोटे बोलले होते. त्यामुळे कंपनी या टोकाच्या कारवाईपर्यंत पोहचली आहे.
आता स्टीव्ह इस्टरब्रुकने मॅकडोनाल्ड सोडल्यानंतर, त्यांच्या जागी नवीन सीईओ म्हणून अमेरिका विंगचे अध्यक्ष ख्रिस केम्पझिन्स्की यांना नियुक्त केले जाणारे अशी चर्चा चालूये. कंपनीचे आंतरराष्ट्रीय कामकाज हाताळण्यासोबतच आर्लिंगर यांना यूएस विंगची जबाबदारी देण्यात आली आहे. स्टीव्ह इस्टरब्रुक कंपनीचे सीईओ असतांना कंपनीच्या शेअर्सचे मूल्य चार वर्षांत दुप्पट झाले होते, पण तरीही विक्रीत थोडीशी घट झाली होती. आता नवीन सीईओ हे कामही चांगल्या पद्धतीने हाताळतील अशी अपेक्षा आहे.