कधीकाळी ब्रिटिशांनी गांधीजींना हरवण्यासाठी सिनेमांची मदत घेतली होती.
तीसच दशक. भारतात स्वातंत्र्यलढ्याची चळवळ ऐन भरात होती. गांधीजींचा सविनय कायदेभंग मिठाचा सत्याग्रह समुद्रापार पोहचला होता. अगदी इंग्लंडमध्ये जेव्हा गोलमेज परिषदेसाठी गांधीजी पोहचले तेव्हा त्यांचं अभूतपूर्व असं स्वागत झालं होतं. भारतात तर त्यांची लोकप्रियता अफाट होतीच पण अहिंसेचा प्रेषित असणारा महात्मा म्हणून इंग्लंड अमेरिकेत त्यांचं कौतुक होत होतं.
इंग्लंडच्या सत्ताधाऱ्यांना हि धोक्याची घंटा होती. काहीही करून गांधी या नावाभोवती निर्माण झालेलं वलय नष्ट करणे हि त्यांच्या साठी प्राथमिकतेची गोष्ट झाली होती. त्यासाठी त्यांनी एक आयडिया वापरली. योगायोगाची गोष्ट म्हणजे हीच गोष्ट जर्मनीमध्ये एडॉल्फ हिटलर त्यांच्या विरुद्ध वापरत होता.
त्या आयडियाचं नाव होतं प्रोपगंडा.
साल असावं १९३८.सप्टेंबर महिन्यात मुंबईतील काही चित्रपटगृहांमध्ये ‘द ड्रम’ नावाचा एक इंग्रजी चित्रपट प्रदर्शित झाला होता.
ही लंडन फिल्म कंपनीची निर्मिती होती. दिग्दर्शक झोल्टन कोर्डा. बहुतेक प्रमुख कलाकार ब्रिटिश होते. पण त्या चित्रपटाची खरे आकर्षण होते रे – साबू दस्तगीर. हे पहिले लोकप्रिय भारतीय आंतरराष्ट्रीय अभिनेते. ब्रिटन गाजवून हा चित्रपट मुंबईत आला होता. येथेही तो गर्दी खेचत होता. पन चित्रपट पाहून परतणाऱ्या लोकांच्या मनात काही वेगळ्याच भावना उमटत होत्या, चीड आणि संतापाच्या भावना उमटत होत्या.
साधारण दहा आठवडा गेला आणि त्या संतापाने पेट घेतला. मुंबई फोर्ट भागात दंगल उसळली. अनेक ठिकाणी बंद पाळण्यात आला ते आंदोलन आटोक्यात आणण्यास पोलिसांना आठ दिवस लागले तेव्हा कुठे ते प्रकरण शांत झाले.
असे काय होते त्या चित्रपटात हा चित्रपट म्हणजे छुपा प्रपोगंडा पट होता. कारण तो काळ होता दुसऱ्या महायुद्धाचा. जगातील अन्य देशांप्रमाणे तेव्हा भारत हीसुद्धा प्रपोगंडाचीही युद्धभूमी बनली होती. येथे तो संघर्ष होता ब्रिटन विरुद्ध जपान आणि जर्मनी असा. भारतीय आणि ब्रिटिश सत्तेविरुद्ध बंद करावे यासाठी जपानी प्रपोगंडा कार्यरत होता.
जपानने प्रोपगंडाला अतिशय योग्य नाव दिलेले आहे विचारयुद्ध. 1932 पासून तेथील शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतला विचार पर्यवेक्षण विभाग हे विचारयुद्धाचे काम करीत असायचे.
जपानी प्रपोगंडा चे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी केलेला पॉर्नोग्राफी चा वापर. त्या प्रपोगंडा चे लक्ष खास करून ऑस्ट्रेलियन सैनिक असत. त्यांच्या बायका प्रेमिका यादीतील ब्रिटीश आणि अमेरिकी सैनिकांची कसे लैंगिक चाळे करीत असतात अशी चित्रे असलेली पोस्टकार्ड आणि पत्रके ऑस्ट्रेलियन सैनिकांत वाटली जात. शत्रु सैनिकांचे मनोधैर्य खच्ची करणे हा त्यामागचा हेतू होता.
असाच प्रपोगंडा नाझी रेडिओवरूनही करण्यात येत असायचा. जपानचे युद्ध प्रपोगंडा मध्येही रेडिओ चा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला होता. 22 भाषांमधून ते कार्यक्रम प्रसारित करण्यात येत असत. हिंदी ही त्यातील एक भाषा. याशिवाय पत्रके भित्तिचित्रे यातूनही ब्रिटन विरोधी प्रपोगंडा सुरू होताच.
मात्र भारतात या सर्वात प्रभावी होता तो ब्रिटिश प्रपोगंडा. त्याची टेक्निक हि तीच. पहिल्या महायुद्धात वापरलेली होती.
यासाठी लागणाऱ्या साधनांमध्ये एक प्रमुख साधन होते चित्रपटांचे. द ड्रम हे त्याचेच उदाहरण आहे.
प्रेम चौधरी यांच्या ‘कलोनियल इंडिया अँड द मेकिंग ऑफ एम्पायर सिनेमा’ या पुस्तकात या चित्रपटावर एक स्वतंत्र प्रकरणच आहे. त्यात ते सांगतात, ‘भारतातील मुस्लीम संघटना मक मिथकाच्या या चित्रपटाने पुनरुज्जीवन केले आहे. मुस्लिम है मूलतत्त्ववादी आहेत मागासलेले आहेत, आणि देशविरोधी आहेत अशी त्यांची प्रतिमा अधोरेखित केली गेली.’ नाझी प्रपोगंडाकरांनी ‘जड सीस’ मधून ज्यू लोकांची प्रतिमा कशी ठळक करण्याचा प्रयत्न केला होता, तोच प्रकार द ड्रमनेही केला.
वायव्य सरहद्द प्रांतात तेव्हा खान अब्दुल गफार खान यांची ‘रेड शर्ट’ चळवळ आणि काँग्रेस यांची हिंदू मुस्लिम एकतेचे जे प्रयत्न सुरू होते त्यांना शह देणे आणि त्याकरिता त्या भागातील ब्रिटिश धार्जिणे लोकांना तसेच जातीयवादी शक्तींना बळ देणे हा हेतू या चित्रपटा मागे होता.
एकात्म भारताच्या प्रती मे मधून मुस्लिमांना वेगळे काढण्याची ब्रिटिशांचे धोरण मजबूत करण्याच्या प्रयत्नांचा तो एक भाग होता. एडवर्ड बर्णेज हे प्रपोगंडा ला अदृष्य सरकारची कार्यकारी शाखा म्हणतात. येथे तर सरकार दृश्य च होते. त्याने साम्राज्यशाहीच्या रक्षणासाठी भारतीय जनतेविरोधात प्रपोगंडायुद्ध सुरू केले होते त्यातलेच ते एक अस्त्र होते.
चित्रपटाची कथा काल्पनिक होती. वायव्य सरहद्द प्रांत नजीकचे कुठले तरी संस्थान.
तेथे बंड शिजत होते. तेथील राजाशी ब्रिटिशांनी शांतता करार केला त्यामुळे राज्यातील जनता खूप आनंदी झाली. पण त्याच राजाच्या दुष्ट भावाने, गुल खान यांनी राजाचा खून केला. राजपुत्र अझिम ( साबू दस्तगीर ) याचा हा तेच आहे त्याचा डाव होता. परंतु दयाळू शांतीप्रिय आणि शूर ब्रिटिशांनी राजपुत्राला वाचवले. सैतान गुल खान याचा नाश केला. यातील काळी-पांढरी बायनरी स्पष्ट आहे.
ब्रिटीशांच्या बाजूने असलेले मुस्लिम चांगले, विरोधात असलेले वाईट, क्रूर असं यातून दाखवलं गेलं. गुलखान हा तर हिंदूंच्या मनातील मुस्लिम आक्रमकांची तंतोतंत प्रतिमा होती. काफी रांची कत्तल करून संपूर्ण जग इस्लाममय करण्याचे स्वप्न पाहणारा असा गुल खान दाखवण्यात आला.
हिंदू मुस्लीम संघर्षात हेच भय होते. ‘द ड्रम’ मधून त्याच देशी बायनरी ला उद्गार देण्यात आला होता. अशा प्रकारचा प्रपोगंडा परिणामकारक ठरतो याचे एक कारण म्हणजे तो प्रचार नव्हे तर वैश्विक सत्य आहे अशी लोकांची धारणा बनलेली असते. त्याला कारणीभूत असतो त्यांचा महा असत्यावरील विश्वास. आणि त्या त्या समाजात लोकप्रिय असलेले पारंपरिक समज. अशा समाजांना बाह्य पुराव्याची आवश्यकताच नसते. वेळप्रसंगी इतिहास खालून तसे पुरावे बनविता येतात.
त्याच्या परिणामकारकतेने चे आणखी एक कारण तर हिटलरने सांगून ठेवलेले आहे. तो म्हणतो,
” बहुसंख्य राष्ट्रांची स्वरूप आणि त्यांचे दृष्टिकोन बायकी असतात. त्यामुळे सैयामी विचार बुद्धी ऐवजी त्यांचे विचार आणि वर्तन यावर राज्यकर्ते ती भावनाशिलता.
‘द ड्रम ‘ नंतर पुढच्याच वर्षी आलेला गंगादीन हा असाच एक प्रपोगंडा चित्रपट.
रुडयार्ड क्लिपिंग यांची गंगादीन नावाची कविता आणि एक कथा यावर हा चित्रपट बेतलेला होता. कॅरी ग्रँड, डग्लस फेअरबॅंक्स यांच्यासारखे नावाजलेले अभिनेते त्यात होते. गंगादीन ची भूमिका केली होती सॅम जेफ यांनी. याचे कथानक ही वायव्य सरहद्द प्रांतात घडते. तीन ब्रिटिश सैनिक त्यांच्यासोबत असलेल्या गंगादीन हा भिष्ती. यांनी ठगांच्या टोळीशी दिलेला लढा अशी ती कहाणी होती . गंगा दिन या पाणक्याचे स्वप्न एकच असते, त्याला ब्रिटिश सैनिक बनायचे असते.
मोठ्या श्रद्धेने तो ब्रिटिशांना मदत करतो. ठगांच्या लढाईत मरता-मरता आपल्या सैनिक साहेबांचे प्राण वाचवतो. त्याच्यावर जन्मास अंतिम संस्कार करण्यात येतात, तेव्हा आपल्याला पडद्यावर त्याचा आत्मा दिसतो. ब्रिटिशांच्या गणवेशात सॅल्युट करत असलेला.
भारतीयांनी ब्रिटिश सैन्यात सामील व्हावे याकरिता ब्रिटिश सरकारचे जोरदार प्रयत्न सुरू असतानाचा हा या काळातला हा हॉलीवूडचा चित्रपट.
गांधींच्या काँग्रेसचा त्या धोरणाला विरोध होता. त्याचे प्रतिबिंब या चित्रपटातही दिसते. साधारणतः एक गंगादीन सोडला तर या चित्रपटातले सगळे नेटिव म्हणजे आपमतलबी, क्रूर पाठीत खंजीर खुपसणारे असेच दिसतात.
ठगांचा गुरु तर त्या सगळ्यांचा बाप. अत्यंत क्रूर षड्यंत्रकारी असा दाखवला होता तो. त्याला या चित्रपटात वेशभूषा दिली होती ती थेट महात्मा गांधींसारखी. तसेच धोतर तसाच खांद्यावरचा पंचा.
गोलमेज परिषदेसाठी महात्मा गांधी ब्रिटनमध्ये गेले होते तेव्हाची त्यांची वेशभूषा पाश्चात्त्य नागरिकांना वृत्तपत्रातून आणि माहिती पटामधून चांगलीच माहीत झाली होती. तशीच वेशभूषा या खलनायक खास देण्यामागचा हेतू सरळच वाकडा होता की त्यास पाहून प्रेक्षकांना गांधी आठवावेत. दोघेही सारखेच दिसतात तेव्हा त्यांचे दुर्गुणहि सारखेच असे प्रेक्षकांना वाटावे म्हणून हा प्रयत्न चालला होता.
हा चित्रपटही ब्रिटन आणि अमेरिकेत चांगला चालला. त्यातील गांधीविरोधी प्रपोगंडाचे एक लक्ष ब्रिटिश आणि अमेरिकन नागरिक हे ही होते.
महात्मा गांधी हे ब्रिटिश साम्राज्याचे शत्रू क्रमांक एक. तेव्हा त्यांचे आणि त्यांच्या बरोबरच काँग्रेसचे राक्षशीकरण करण्याची विविधअंगी प्रयत्न ब्रिटन अमेरिकेत सुरू होते. याबाबत नेहमीप्रमाणेच अमेरिकी नागरिक हे ब्रिटिशांच्या प्रपोगंडा ला बळी पडले होते. त्यातील अनेकांच्या मते काँग्रेस ही फॅसिस्ट संघटना होती. तिचे नेते हुकूमशहा होते.
एकाच वंशाचा (हिंदू) तिच्यावर वरचष्मा होता. तिचा गणवेश धोतर आणि गांधीटोपी ठरलेला होता. काँग्रेस संघटना गांधींची पूजा करत होती. हे सारे नाझी सारखेच असल्याचे ब्रिटिश प्रपोगंडा सांगत होता. आणि त्यावर अमेरिकी जनता विश्वास ठेवत होती.
1935 साली व्हॅन ब्युरन स्टुडिओ या कंपनीने तयार केलेला आणि अमेरिकेतील आर के ओ रेडिओ पिक्चर्स या कंपनीने वितरित केलेला एव्हरीबडी लाईक्स म्युझिक हा चित्रपट या प्रपोगंडाचाच नमुना होता. दोन रिळांचा तो विनोदपट होता. त्यात एका पात्राला गांधीजी प्रमाणेच वेशभूषा देण्यात आली होती. ते पात्र होते एका वेश्या बरोबर राहणाऱ्या अनैतिक दारुड्याचे. हा चित्रपट भारतात प्रदर्शित करताना त्यातील तेवढा भाग काढण्यात आला होता. अन्य देशांत तो तसाच दाखविण्यात आला होता.
गांधीजींच्या या अशा प्रतिमाहाननाच्या प्रयत्नांच्या तीव्र प्रतिक्रिया भारतात उमटत होत्या. भारतीय चित्रपट सृष्टी हि त्यापासून दूर नव्हते. ब्रिटिश प्रॉपर खंडाला आपल्या पद्धतीने तिने विरोधही केल्याचे दिसते. त्या वेळच्या अनेक चित्रपटांमधून गांधीजींच्या तत्व विचारांची गौरवही चित्र रंगवल्याचे दिसते
1921 चा संत विदूर हे त्याचे उत्तम उदाहरण आहे या मूक पटावर ब्रिटिश सेन्सॉरने प्रारंभी बंदी घातली होती याचे कारण त्यातील विदुरा चे पात्र हुबेहूब गांधीजी होते द्वारकादास नावाच्या अभिनेत्याने ती भूमिका केली होती ती स्वता गांधींसारखे दिसायचे, उंच आणि किडकिडीत. गांधींचे बोलणे चालणे हे त्यांच्या व्यक्तिरेखेतून स्पष्ट दिसत होते. नंतर मग अनेक दृश्यांची कापाकापी करून या चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी देण्यात आली.
‘द ड्रम’ प्रमाणेच गंगादीन हा चित्रपट भारतात प्रदर्शित झाला तेव्हा त्यालाही लोक रोषाचा सामना करावा लागला. बंगाल आणि बॉम्बे प्रांतात त्यावर बंदी घालण्यात आली. गंगादीन मधील काही प्रसंगाची उजळणी करणारा स्टीव्हन स्पीलबर्ग दिग्दर्शित ‘इंडियाना जोन्स अँड द टेंपल ऑफ डुम’ हा 884 सालचा चित्रपट ही भारतात वादग्रस्त ठरला होता. पाश्चात्य जगतात भारताची साचेबद्ध प्रतिमा बनविण्यात ताशा चित्रपटांचा मोठा वाटा आहे.
संदर्भ- प्रोपगंडा लेखक रवी आमले
हे ही वाच भिडू
- सिनेमाचं प्रमोशन करण्यात आलं, गांधीजीनी पाहिलेला पहिला सिनेमा
- गांधीजी सुद्धा प्रेमात पडलेले, लग्न मोडायची वेळ आली होती.
- पक्षासाठी निधी गोळा करताना सरदार पटेल म्हणाले, गांधीजी महात्मा आहेत , मी नाही