टॅटूमुळे घावलं, लुधियाना कोर्टात एका माजी हवालदारानेच बॉम्बस्फोट केलाय

पंजाब भारतातलं तसं सधन राज्य. हरित क्रांती आणि परदेशातील स्तलांतरितांकडून येणार पैसा यामुळं पंजाबच्या अर्थव्यवस्थेचं चांगलंच बल्ले बल्ले होतंय. मात्र या येणाऱ्या पैशाने पंजाबची तरुणाई मात्र बिघडलेय. ‘उडता पंजाब’मध्ये झिंगलेल्या पंजाबचं चित्र आपण सगळ्यांनी पाहिलंय. पोलीस,राजकारणी  यांना सुद्धा ड्रग्सच्या तस्करीत अटक झालेय. अशाच एका केस मध्ये अटक करण्यात आलेल्या हवालदारानं मात्र सगळ्या सीमा पार केल्यात.

तर या हवालदारचं नाव आहे गगनदीप सिंग उर्फ गुग्गी.

पंजाब पोलीसमध्ये शिपाई म्हणू रुजू झालेल्या गुग्गीला लाइफस्टाईल मात्र पंजाबी गाण्यातल्या रॉकस्टार सारखी जगायची होती.

ज्यांना गजाआड करायचं त्यांच्याबरोबरच गुग्गी आता ‘बसू’ लागला होता. एक्सट्रा इनकमसाठी आता तो आता दुसरे मार्ग शोधायला लागला होता. त्यानं मार्ग शोधला पंजाबमधल्या सगळ्यात मोठ्या काळ्या धंद्यात. अंमली पदार्थांच्या तस्करीत.

गुग्गी आता लाल दिव्याच्या गाडीतून ड्रग्सची डिलिव्हरी देत होता. या दोन नंबरच्या धंद्यातून तो एक नंबरचा पैसा कमवू लागला होता.  त्याला पाहिजे तशी लाइफस्टाइल त्याला आता मिळाली होती. 

रॉकस्टार सारखं टॅटूचे फोटो तो माय लाइफ माय रूल्सच्या कॅप्शन टाकून तो इंस्टाग्रामवर लाईक्स घेऊ लागला होता.  

मात्र त्याचे हे धंदे जास्त काळ टिकले नाहीत पोलिसांनी लवकरच त्याला बेड्या ठोकल्या. दिल्लीवरून चंदीगडला हेरॉईनची तस्करी करत असताना पोलिसांनी त्याला रंगेहात पकडलं. पोलीस डिपार्टमेंटच ड्रग्स तस्करीत अडकलंय म्हटल्यावर राज्य सरकारला तुफान टीकेचा सामना करावा लागला. सरकारनं पण गुग्गीवर कडक कारवाई करत त्याला पोलीस सेवेतून बडतर्फ केलं.

गुग्गीला अमली पदार्थांच्या तस्करीसाठी २वर्षे जेलची हवा खावी लागणार होती.

भारतात जेलमध्ये आरोपी सुधारण्यापेक्षा अजून बिगडतो असा आतापर्यंतचा अनुभव अनेकांनी बोलून दाखवला होता. गुग्गीच्या बाबतीतही तेच झालं. जेलमध्ये त्याच्यापेक्षा खत्री आरोपींशी त्याची ओळख झाली. त्यामध्ये खलिस्तानी अतिरेकी, मोठे आंतरराष्ट्रीय ड्रुग्स तस्कर यांच्याशी त्यानं उठ -बैस सुरु केली.पुढे बेल घेऊन जेलमधून आल्यानंतर तो या नेटवर्कच्या संपर्कात राहिलाच.

आता आपल्यावर चालू असलेली केस कशी मिटवायची याचा तो विचार करत होतो. मग त्यानं कोर्टातून भेटणारी तारीख पे तारीख संपवण्यासाठी कायमचा उपाय शोधला. 

कोर्टात असलेल्या रेकॉर्ड रूमलाच उडवून टाकण्याची योजना आखली होती. 

त्यानुसार तो लुधियाना हायकोर्टात बॉम्बदेखील घेऊन आला. मात्र बॉम्बची फायनल सेटिंग करताना बॉम्ब फुटला आणि त्यात गुग्गीचा चिंधड्या उडाल्या होत्या.  शेवटी त्याच्या टॅटूवरून त्याची ओळख पटवावी लागली. 

ऐन निवूडणुकीच्या तोंडावर आणि ते हि कोर्टसारख्या अतिसुरक्षित ठिकाणी झालेल्या स्पोटामुळं चन्नी सरकारवर जोरदार टीका होतेय. त्यात सरकारनं ह्या बॉम्बस्फोटामध्ये खलिस्तानी अँगल असल्याचा संशयही व्यक्त केलाय. अमृतसरच्या बेअदबीच्या घटनेनंतर आता या बॉम्बस्फोटाच्या या घटनेत परकीय ताकदीचा हात आहे का याचाही तपास केला जात आहे. गुग्गीला बॉम्ब बनवण्यापासून त्याचे साहित्य कोणी पुरवले याचाही पोलीस तपास करत आहेत .मात्र जे एका माजी हवालदारानेच कोर्ट उडवून दिल्यानं पंजाबच्या कायदा व्यवस्थेचे धिंडवडे निघालेत एवढं मात्र नक्की.       

Leave A Reply

Your email address will not be published.