भारताला टेन्शन देणारा शाहीन आफ्रिदी एवढा डेंजर कसा बनला ?
‘एकाच खाणीतून असे किती हिरे निघणार ? कुठं ना कुठं संपणारच की. माझ्यानंतर कुठला नॅचरल फास्ट बॉलर असल्याचं मला तरी दिसत नाही,’ हे वाक्य बोलला होता शोएब अख्तर. एकेकाळचा जगातला सगळ्यात फास्ट बॉलर. असा बॉलर ज्याच्याबद्दल राग, असूया आणि भीती या तिन्ही गोष्टी वाटायच्या. शोएब अख्तरची फास्ट बॉलिंग इतकी भारी होती, की ती बघायला मजा तेव्हाच यायची जेव्हा मॅच भारताविरुद्ध नसायची.
इम्रान खान, वसीम अक्रम, वकार युनूस पाकिस्तानची फास्ट बॉलिंगची परंपरा दरारा निर्माण करणारीच होती. त्यात अख्तर प्रचंड जोरात टाकायचा आणि प्रचंड डोक्यात जायचा. अख्तरच्या नंतर मात्र पाकिस्तानची फास्ट बॉलर्सची परंपरा कोण चालवणार असा प्रश्न खरोखर उपस्थित झाला.
कारण त्याच्या नंतरचे बॉलर्स स्पीडमुळं नाही तर राड्यांमुळं लक्षात राहिले. पण प्रत्येक पिढीला एक नवा हिरो मिळतोच, पाकिस्तानलाही मिळाला शाहीनशाह आफ्रिदी.
टी-२० वर्ल्डकप मधली भारत पाकिस्तान मॅच अगदी तोंडावर आलीये. या हाय व्होल्टेज मॅचच्या निमित्तानं सगळ्यात जास्त चर्चा शाहीन आफ्रिदीचीच होतीये. नुकत्याच झालेल्या अफगाणिस्तान विरुद्धच्या वॉर्म अप मॅचमध्ये शाहीनचा यॉर्कर रेहमानुल्लाह गुरबाजच्या पायावर इतक्या जोरात बसला की त्याला ग्राऊंड सोडावं लागलं. भारताविरुद्ध २०२१ च्या वर्ल्डकपमध्येही शाहीन आफ्रिदीनंच मॅच गाजवली होती.
शाहीनमध्ये एवढं काय खास आहे ? त्याचा आजवरचा क्रिकेट प्रवास कसा होता ? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा…