फक्त २५० फुल्लपगारी माणसांवर काम करणारं विकिपीडिया नक्की चालतं तरी कसं.

काही भावड्यांचं एक ठरलेलं वाक्य असतंय  ”अरं फॅक्टयं, इंटरनेटवर बघितलंय!”. मग येतात दुसरे कार्यकर्ती तो थोडं डीप जाणार आणि सांगणार “खरंय रे! गुगल केलंय”. आणि आता येतात लेजेंड जे परमसत्य कळल्याच्या अविर्भावात सांगणार “विषयच नाही ना, विकिपीडियावर लिहलंय ते जशाच्या तसं सांगतोय “. तर आता लक्षात घ्या की हे असलं मोठं -मोठं बोलून हे कार्यकर्ते खोटी पण माहिती देऊ शकतेत. कारण जसं इंटरनेट आणि गुगलवर कोणीही माहिती टाकू शकतंय तसंच विकिपीडियावरही कोणीही ग्यान पाजळु शकतोय.

आता लगेच दुसऱ्या टोकाला जाऊन विकिपीडियावर सगळंच खोटं असतंय असं म्हणू नका. 

कुठलही मत बनवायच्या आधी त्याची पूर्ण माहिती देणं भिडूचं आद्यकर्तव्य आहे. त्यामुळं कुठल्याही विषयाबद्दल किमान दोन वाक्यतरी माहिती देणारं विकिपीडिया एवढी माहिती कसं गोळा करतं ते आधी बघूया.

विकिपीडियाकडे फक्त २५० कर्मचारी फुलपगारी काम करतात.

२० वर्षात, विकिपीडियाने जवळपास ३०० भाषांमध्ये ५० दशलक्ष लेख जमा केले आहेत. त्यामुळं फक्त २५० फुल्ल टाईम कर्मचाऱ्यांवर विकिपीडिया एवढी माहिती कशी जमा करतं हे कोडंच आहे.

तर विकिपीडियाची सुरवात केली जिमी वेल्स आणि लॅरी सेंगर यांनी. 

तसं ते दुसऱ्या एका प्रोजेक्ट वर काम करत होते. विकिपीडिया त्यांनी एक सहज साइड-प्रोजेक्ट म्हणून सुरु केला होता. पण पुढ़े जाऊन त्यांचं हेच प्रॉडक्ट चाललं. ‘विकी’ ज्याचा हवाईन भाषेत फास्ट असा होतॊ आणि ‘एनसायक्लोपेडिया’ म्हणजेच विश्वकोश या दोन शब्दांनपासून विकिपीडिया हे नाव वेबसाईटला देण्यात आलं.

तर आता येऊ आपल्या मेन प्रश्नावर. Free as in freedom या तत्वानुसार विकिपीडिया सगळी माहिती फ्री देतं. 

आणि दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे विकिपीडिया वेबसाइटवर कोणत्या जाहिरातही दाखवत नाही. मग एवढी माहिती विकिपीडिया जमा कशी करते तर तुमच्या आमच्यामधून येणाऱ्या  २,५०,००० स्वयंसेवकांच्या टीमद्वारे. हे व्हॉलेंटर्स कोणतीही फी न घेता विकिपीडियावर काम करत असतात.

आता तुमच्या आमच्यासारखे म्हटल्यावर आपल्यापैकी काही अतिशहाणे खोटी माहिती भरू शकतात, त्याचबरोबर कोणाबद्दल अपमानास्पद माहिती टाकणे, समजत तेढ निर्माण करणारी माहिती अपलोड करणे अश्या गोष्टी घडू शकतात. मग इथं विकिपीडिया ऍक्शन मोडमध्ये येतं.विकिपीडियाचे प्रशासक जी पानं “तोडफोड” तसेच अपमानास्पद भाषा किंवा खोटेपणाच्या अधीन आहेत त्यांना थेट एडिट करण्यापासून मॉडरेट करतं. 

पण मग दिलेल्या माहिती किती खरी आहे, त्या माहितीचा दर्जा कसा आहे हे कोण बघतं हा सहज पडणारा प्रश्न. तर हे विकिपीडिया सेल्फ पॉलिसींग तत्वावर चालतं. म्हणजे विकिपीडियाचे स्वयंसेवकच त्यांना एकादी माहिती चुकीची किंवा अर्धवट वाटली तर त्यात बदल करतात किंवा नवीन माहिती समाविष्ट करतात. नवीन माहिती टाकताना ते त्याचा पुरावाही देतात.

आता तुम्हाला जर स्वयंसेवक बनायचं असेल तर तुम्हाला विकिपीडियावर लॉग इन करावा लागत नाही.

तुम्हाला फक्त साईटवर रजिस्टर करावा लागत. आता हे रेजिस्ट्रेशन करण्यासाठी एकदम बेसिक माहिती द्यावी लागते आणि तुम्ही फेक नावाने अकाउंटही बनवू शकता. आणि इथंच विकिपीडियाचा सीन गंडतो. त्यामुळं विकिपीडियावर लिहलेल्या अनेक आर्टिकलवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातं.

आता येऊ विकिपीडियाच्या रेव्हेनु मॉडेलवर. तर विकिपीडिया कोणतीच स्पॉन्सरशिप किंवा जाहिरात घेत नाही. तर ते लोकांनी दिलेल्या देणगीवर विकिपीडिया काम करतं. पण लोकांना फुकटची सवय त्यामुळं ते पण नाही म्हटल्यावर शेवटी
“आम्ही तुम्हाला नम्रपणे विचारतोय स्क्रोल करू नका, आम्ही मोजक्याच वाचकांच्या देणग्यांवर अवलंबून असतो, परंतु 2% पेक्षा कमी वाचक देणगी देतात द. तुम्ही फक्त £150दिले तर…विकिपीडिया भरभराट होऊ शकेल. धन्यवाद.” असं मेसेज विकिपीडियावर झळकला होता.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.