पतीच्या सुसाईडनंतरही पत्नीने सीसीडीची जबाबदारी खांद्यावर घेऊन टॉप ब्रँड बनवला
आपल्यापैकी अनेकांना 2019 मधील एक धक्कादायक बातमी आठवत असेल जेव्हा भारतातील सर्वात प्रसिद्ध कॉफीहाऊस चेन असलेल्या “Cafe Coffee Day” चे CEO VG सिद्धार्थ यांनी आत्महत्या केली होती..काहीच काळात आपल्या पतीच्या जाण्याचं दुःख बाजूला ठेवून त्यांच्या पत्नी मालविका हेगडे यांनी डिसेंबर 2020 मध्ये कंपनीचे सगळी सूत्रे हाती घेतली. मालविका हेगडे यांचे वडील एसएम कृष्णा, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय परराष्ट्र मंत्री होते.
ज्याप्रमाणे फिनिक्स पक्षी जळतो आणि राखेतून पुनर्जन्म घेतो, त्याचप्रमाणे मालविका यांच्या नेतृत्वाखाली CCD ने 2 वर्षांच्या या अगदी कमी काळातच 7200 कोटींचे भले मोठे कर्ज 1731 कोटींवर आणले आहे.
कोण आहेत या मालविका हेगडे?
दिवंगत व्हीजी सिद्धार्थ यांच्या पत्नी म्हणजेच मालविका हेगडे या देखील एक भारतीय उद्योगपती आहेत. त्यांची दुसरी ओळख म्हणजे, त्या कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सोमनहल्ली मल्लय्या कृष्णा यांच्या त्या कन्या आहेत. तर त्यांची आई प्रेमा कृष्णा या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. कर्नाटकातील बंगलोर येथे 1969 मध्ये जन्मलेल्या मालविकाने तिचे शालेय शिक्षण बेंगळुरू येथील स्थानिक शाळेत केले. त्यांनी बंगळुरू विद्यापीठातून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. तिला एक धाकटी बहीण शांभवी कृष्णा आहे, जी एक बिझनेस वुमन आहे.
त्यानंतर मालविकाने 1991 मध्ये सिद्धार्थ यांच्या सोबत लग्न केले. मालविका लग्नानंतर सीसीसीडी कंपनीत रुजू झाल्या. त्यांना इशान आणि अमर्त्य ही दोन मुले आहेत. तस तर मालविका हेगडे लग्नापासूनच या कॉफीच्या व्यवसायाशी निगडीत होत्या. त्या कॅफे कॉफी डे च्या बोर्डवर होत्या, मालविकाने कॉफी डे ग्लोबल लिमिटेडच्या संचालक म्हणून त्यांची जबाबदारी स्वीकारली होती. पण २०१९ मध्ये पतीच्या निधनानंतर मालविका या कंपनीच्या सीईओ बनल्या.
भारतातील सर्वात मोठी कॉफी चेन कॅफे कॉफी डे (CCD) चे संस्थापक VG सिद्धार्थ यांनी 1996 मध्ये याची सुरुवात केली होती. जगभरातील कॉफी संस्कृती पाहून मूळ कर्नाटकातील सिद्धार्थ यांनी कॉफी शॉप उघडण्याची योजना आखली. सगळ्या अडचणींनंतर कॉफी शॉप सुरू झाले. तेव्हा लोकांनी त्यांना सांगितले की त्याचा व्यवसाय चालणार नाही, पण लोकांच्या सल्ल्याला फाट्यावर मारत त्यांनी CCD ला यशाच्या उंचीवर नेऊन ठेवलं, ज्याची त्यांना स्वतःला अपेक्षा नव्हती.
29 जुलै 2019 रोजी त्यांचे पती म्हणजेच सीसीडी चे CEO व्हीजी सिद्धार्थ यांनी आत्महत्या केली होती. त्याआधी ते अचानक बेपत्ता झाले होते,
29 जुलै 2019 रोजी सिद्धार्थ अचानक बेपत्ता झाले होते, एके दिवशी ते आपल्या ड्रायव्हरसोबत बेंगळुरूहून सकलेशपूरला जात असताना त्यांनी आपल्या ड्रायव्हरला चिकमंगळूरच्या दिशेने जाण्यास सांगितले आणि अचानक ड्रायव्हरला एका पुलाजवळ थांबण्यास सांगितले. गाडी थांबली कि ते गाडीतून उतरले आणि ड्रायव्हरला पुलाच्या शेवटी गाडी थांबवायला सांगितली. ड्रायव्हर तासनतास थांबला पण सिद्धार्थ काय परत आलेच नाही. त्यांचा फोनही अचानक बंद झाला होता. ड्रायव्हरने त्यांचा खूप शोध घेतला पण ते काय सापडले नाहीत. शेवटी ड्रायव्हरने मालविकाच्या मोठ्या मुलाला फोन करून माहिती दिली आणि नंतर जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन एफआयआर दाखल केला. पोलिसांनी 30 जुलै 2019 रोजी शोध मोहीम सुरू केली होती. 31 जुलै 2019 रोजी सकाळी 7:43 वाजता पोलिसांना नेत्रावती नदीत एक मृतदेह सापडला. आर्थिक त्रासाला कंटाळून सिद्धार्थने आत्महत्या केल्याचे बोलले जात होते. प्रत्यक्षात पहिल्या तिमाहीत आर्थिक समस्यांमुळे कंपनीला 280 स्टोअर्स बंद करावी लागली. त्याच वेळी, कंपनीच्या दैनंदिन विक्री दरातही लक्षणीय घट झाली होती…. आणि म्हणून त्यांनी हार मानत आत्महत्येचा पर्याय स्वीकारला होता
त्यानंतर ANI द्वारे मीडियामध्ये त्यांची सुसाईड नोट पब्लिश केली होती, ज्यामध्ये सिद्धार्थ हे एक फायदेशीर व्यवसाय मॉडेल तयार करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल माफी मागत होते. तसेच खाजगी इक्विटी भागीदार आणि इतर कर्जदात्यांचा दबाव आणि आयकर विभागाचा छळ असह्य झाल्याचे त्यांनी या चिठ्ठीत म्हटले होते.
पण पतीच्या निधनानंतर मालविका मानसिकरीत्या उद्धवस्त झाल्या होत्या, बराच काळ त्यांचा डिप्रेशन मध्ये गेला. पण हळूहळू त्यांनी स्वतःला सावरलं आणि कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. पण कंपनीवर कर्जाचा डोंगर होता ज्यामुळे त्यांच्या पटीने आत्महत्या केली होती. एकीकडे पतीच्या निधनाने त्यांना मानसिक धक्का बसला होता, तर दुसरीकडे बाजारातील सर्वात मोठी कंपनी म्हणून त्यांना हजारो कोटींची कर्जबाजारी कंपनी पुन्हा उभी करावी करायची होती. भारतातील कॉफी किरकोळ बाजारपेठेतील सर्वात मोठा ब्रँड, कॅफे कॉफी डे आणि तिची मालकीण मालविका हेगडे यांची स्टोरी म्हणजे एक मोठं उदाहरण आहे.जरी दिवंगत व्हीजी सिद्धार्थ हे CCD चे अधिकृत अध्यक्ष होते, पण २००८ पासून CCD चे दैनंदिन कामकाज मालविकाच हाताळत होत्या. CCD मध्ये त्यांचे ४% इक्विटी शेअर्स आहेत. मालविका या निसर्गप्रेमी आहेत, त्यांनी पर्यावरणाची जाण ठेवत अनेक उपक्रम देखील राबवले आहेत. त्यांनी त्यांच्या पतीसमवेत ३००० हजाराहून अधिक झाडे लावली होती.
आज CCD हा भारतातील सर्वात मोठा कॉफी सर्व्हिंग ब्रँड आहे.
बेंगळुरू स्थित CCD देशभरात शेकडो स्टोअर चालवते आणि अनेक मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करते. CCD मध्ये सुमारे १७०० कॅफे, सुमारे ४८,००० वेंडिंग मशीन, ५३२ किओस्क आणि ग्राउंड कॉफी विकणारी ४०३ दुकाने आहेत.
मालविका हेगडे यांनी जेव्हा CCD चे CEO म्हणून पदभार स्वीकारला तेव्हा कंपनी कर्जात बुडाली होती. भारतात असे अनेक उद्योगपती होते जे मोठ्या प्रमाणावर कर्ज घेऊन परदेशात पळून गेले आणि तिथले नागरिकत्व घेऊन लपले, पण मालविका हेगडे घाबरण्यातल्या नव्हत्या. सीसीडीमध्ये काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांची जबाबदारी आणि परिस्थिती त्यांना समजत होती.
मालविकाने केवळ धैर्यच दाखवले नाही, तर सीईओ म्हणूनही त्यांनी आपली क्षमता दाखवून दिली आहे. 2019 मध्ये 7000 कोटी रुपये असलेले कर्ज 21 मार्चपर्यंत 1779 कोटी रुपयांवर आले आहे. कंपनीवरील एकूण कर्ज 1779 कोटी आहे, त्यापैकी 1263 कोटी दीर्घकालीन कर्जे आणि 516 कोटी अल्प मुदतीची कर्जे आहेत. CCD पुन्हा बाजारात आली आहे आणि हळूहळू कंपनीची आर्थिक स्थिती सुधारत आहे. जसजसा कोरोनाचा प्रभाव कमी होत जाईल तसतसे त्यात आणखी सुधारणा होण्याची खात्री दिली जातेय. मालविका हेगडेची मेहनत हे भारतीय उद्योग जगतातील लोकांसाठी एक अद्भुत उदाहरण आहे हे मात्र नक्की !!!
हे ही वाच भिडू :