बारा भानगडी न करता एकाच गोष्टीमागे लागले आणि स्पार्क्स सारखा ब्रँड उभा राहिला

भावांनो आपल्या भिडूचं एक प्रिंसिपल आहे. आपल्या जनतेचा शब्द कधी खाली पडू द्यायचा नाही. जनतेला जे आवडणार ते आपण करणार.अशीच आमच्या एका व्हिडिओच्या खाली तुमच्यापैकी काहींनी रिलॅक्सो या चपला बनवणाऱ्या कंपनीबद्दल सांगा म्हटलं. मग खास लोकाग्रहास्तव भिडू बसला रिसर्च करायला. सलमान भाईजान या कंपनीची जाहिरात करतात हे एवढंच आपल्यला माहित होतं त्यामुळं  थोडं डीपमध्ये जावं लागलं आणि त्यातूनच मग लै भारी माहिती बाहेर आली.

सलमान खान बरोबरच,खिलाडी अक्षय कुमार ,दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा हे सुद्धा या ब्रँडचे अँबेसेडर राहिलेत. आता तुम्ही म्हणाल आम्ही तर यांना या ब्रॅण्डच्या जाहिरातीत पाहिलं नाहीए. तसं तुमचं बरोबरचंय म्हणा. मला पण तोच प्रश्न पडला. 

तर सिन असा आहे की आपला खिलाडी कुमार ज्या स्पार्क्स ब्रॅण्डची जाहिरात करतो तो रिलॅक्सोच्याच मालकाचं आहे. एवढंच काय तर बहामास, फ्लाइट आणि स्कूलमेट हे ब्रँड सुद्धा रिलॅक्सोच्याच मालकाचे आहेत.

तर हे सगळे ब्रँड आहेत रमेश कुमार दुआ यांच्या मालकीचे. त्यांचा वडिलोपार्जित चपलांचा आणि सायकलचा बिझनेस होता. रमेश कुमार दुआ यांनी मग फक्त चपलांच्या धंद्यावरच लक्ष घालण्याचं ठरवलं. मात्र पुढे त्यांच्या बिझनेसच्या त्यांचा भाऊ, वडील आणि ते स्वतः अशा वाटण्या झाल्या. वडिलांवरील कर्जाची पण वाटणी होणार होती. मात्र जेव्हा ते कर्जाची वाटणी मागायला गेले तेव्हा भावाने हात वरती केलं.

मग शेवटी डोक्यावर एक लाखाचं कर्ज घेऊन दुआ यांना आपल्या बिझनेसची सुरवात करावी लागली.

या व्यवसायत कामाला आलं त्यांचा शिक्षण. चपलांच्या बिझनेमध्ये ठसा उमटवण्यासाठी दुआ यांना  माहित होते की त्याचा व्यवसाय वापरत असलेल्या मुख्य कच्ची वस्तू रबरबद्दल त्यांना अधिक समजून घेणे आवश्यक आहे.

त्यासाठी मग त्यांनी युकेच्या स्टिक आणि रबर इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घ्यायचं ठरवलं. मात्र कॉमर्स शाखेत पदवीधर असणाऱ्या दुआ याना या कॉलेजमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. पण दुआ यांना काही करून कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचाच होता.

 ” मला फक्त कॉलेजमध्ये रबराबद्दल शिकण्यासाठी यायचं आहे तुम्ही डिग्री दिली नाही तरी चालेल” असं मोठ्या तळमळीने त्यांनी कॉलेज प्रशासनाला सांगितलं. 

कॉलेजनं पण मग त्यांचं डेडिकेशन पाहून त्यांना प्रवेश दिलाच.

कॉमर्स ग्रॅज्युएट आणि मग रबर तंत्रज्ञानाची माहिती यांचा त्यांनी मग पुरेपूर उपयोग करून घेतला. बाटा, मेट्रो यांसारखे ब्रँड लेदरचा चपलांवर लक्ष देत असताना दुआ मात्र या क्षेत्रात उतरले नाहीत. त्यांनी आपलं सगळं लक्ष रबरापासून बनणाऱ्या चपलांकडं लावलं होतं.

१९७६ मध्ये दिल्लीमध्ये केवळ एका हवाई चप्पलच्या उत्पादनासह सुरू झालेली कंपनी आज चार ब्रँडमध्ये ४०० विविध प्रकारचे शूज आणि चप्पल बनवणारी बनली आहे. ज्यामध्ये हवाई चप्पलपासून स्नीकर्स पर्यंत सर्व काही समाविष्ट आहे. गेल्या चार दशकांमध्ये, Relaxoनं विकल्या गेलेल्या जोड्यांच्या संख्येनुसार सर्वात मोठी भारतीय फुटवेअर उत्पादक बनली आहे.

रमेशकुमार दुआ यांच्या यशस्वी होण्यामागील महत्वाचं जी दोन कारणं सांगितली जातात ती म्हणजे बारा भानगडी ना करता एकातंच लक्ष घालणं आणि जे करतोय त्याचं पूर्ण नॉलेज घेणं.

Leave A Reply

Your email address will not be published.