पहिल्याच आशियाई स्पर्धेचा विडा उचलून भारतानं विकासाचा पाया घातला होता

भारत हा वेगाने विकसित होणाऱ्या देशांमध्ये गणला जातो. आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि पार क्रीडा क्षेत्रात सुद्धा. क्रिकेटमध्ये तर भारतीयांची कामगिरी नव्यानं काही सांगायला नको, पण गेल्या ऑलम्पिक मध्ये भारतीयांचा जलवा चांगलाच गाजला.

खेळाच्या बाबतीत बोलायचं झालं तर भारतात इतर बड्या देशांसारख्या फॅसिलीटी कदाचित नसतील पण प्रोत्साहन मात्र मोठ्या प्रमाणात मिळतं, मागच्या काही वार्षिक बजेट पहिले तर लक्षात येईल खेळांसाठी जाहीर होणाऱ्या आकड्यात मोठी होत आहे. त्यामुळे खेळाच्या बाबतीत सुद्धा भारत विकसित होतोय असं म्हणायला काहीच हरकत नाही.

भारतानं पहिल्यांदाचं नेतृत्व करत खेळाच्या बाबतीत स्वतः ला सिद्ध केलं होत. आणि तेव्हापासून भारतात खेळाच्या विकासाला सुरुवात झाली.

स्वातंत्र्य आधीच्या काळात फक्त ऑलिम्पिकचं सगळ्यात प्रतिष्ठेचा क्रीडा सोहळा मानला जायचा.पाचही खंडांतील देश त्यात सहभागी होतात त्यामुळं हळूहळू जगभरात क्रीडासंस्कृतीला चालना मिळाली. यातूनच आशियाई स्पर्धेची कन्सेप्ट समोर आली. याला प्रत्यक्षात उतरवण्याचं काम एका भारतीयाने केलं. ते म्हणजे प्राचार्य गुरुदत्त सोंधी.

आशियाई स्पर्धा ही कन्सेप्ट मांडणं आणि पहिल्या आशियाई स्पर्धेचं आयोजन करणं यात गुरुदत्त सोधींचा मोठा वाटा.

तसं पाहिलं तर दुसऱ्या महायुद्धाच्या आधी पूर्वेकडील भागात अॅथलेटिक्स स्पर्धा आणि पश्चिम आशियाई क्रीडा स्पर्धा व्हायच्या. १९१३ मध्ये मनिलामध्ये पूर्वेचं ऑलिंपिक झालं होतं, तर १९३० मध्ये पश्चिम आशियाई स्पर्धा झाली होती. पण त्यानंतर आशियातील बऱ्याच देशांमध्ये राजकीय उलथापालथ घडायला लागली त्यामूळं १९३४ साली ही स्पर्धा बंद पडली.

पुढे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९४९ मध्ये प्रा. सोंधी यांनी आशियातील इतर क्रीडा संघटकांच्या मदतीनं आशियाई क्रीडा स्पर्धा भरवण्याची कल्पना मांडली. तिला दादही मिळाली. १९४९ साली दिल्ली येथे झालेल्या आशियाई राष्ट्रांच्या बैठकीत ‘एशियन गेम्स फेडरेशन’ या संस्थेच्या संविधानास मान्यता देण्यात आली. या स्पर्धेत मागचा उद्देश होता आशिया खंडातील देशांमध्ये खेळांना चालना मिळावी.

आता कन्सेप्ट भारताची म्हंटल्यावर आयोजनाच्या पहिला बहुमान भारतालाच मिळणं सहाजिकचं होतं. ही स्पर्धा आधी १९५० मध्ये घेण्याचं ठरलं होतं, पण पुढे ती लांबणीवर पडली. पण पुढच्याच वर्षी म्हणजे १९५१ मध्ये ४ ते ११ मार्च दरम्यान ही स्पर्धा दिल्लीत भरवण्यात आली.

भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी या आशियायी स्पर्धचे उदघाटन केले होते.

या स्पर्धेत आशिया खंडातील ११ देशांच्या ५०० खेळाडूंनी भाग घेतला होता. अॅथलेटिक्स, बास्केटबॉल, सायकलिंग, फूटबॉल, स्विमिंग आणि वेटलिफ्टिंग अशा सहा खेळांचा या स्पर्धेत समावेश करण्यात आला.

या स्पर्धेत जपानला सगळ्यात जास्त २४ गोल्ड मेडल मिळाली, तर भारताने १५ गोल्ड मेडल नावावर करत दुसरा नंबर पटकावला.

या स्पर्धेनंतर दर चार वर्षांनी स्पर्धेचं आयोजन करण्याची प्रथा पडली. स्पर्धेच्या निमित्ताने त्या त्या देशात क्रीडा संस्कृती रुजवण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जाऊ लागले. त्यातूनच क्रीडाज्योतीचा देशभर प्रवास घडवून आणणं, स्पर्धेच्या ठिकाणी ज्योत प्रज्वलित करणं, शपथ घेणं अशा गोष्टी नंतर सुरू केल्या गेल्या.

आता स्पर्धा म्हंटल की वाद विवाद होणार हे साहजिक. २०१८ साली असचं काहीस चित्र पाहायला मिळालं. त्या साली इंडोनेशियातल्या जकार्ता इथं आशियाई स्पर्धा होणार होत्या. पण स्पर्धेला सुरुवात होण्याच्या आधीच इंडियन ऑलम्पिक असोशिएशन वादात सापडलं.

म्हणजे झालं काय, प्रत्येक स्पर्धेच्या वेळी असोशिएशन खेळाडू आणि प्रशिक्षक यांचा सगळा खर्च उचलत असायचे. पण जकार्ता इथं होणाऱ्या या स्पर्धेच्या वेळी ओशिएशननं नवीन फर्मान काढलं कि, आपल्या संबंधित नसलेल्या प्रशिक्षक आणि खेळाडूंनी उदघाटन समारंभासाठीच्या ड्रेस कोड, प्रशिक्षण आणि खेळाच्या किटचा खर्च आपल्याला खिशातून करायचा.

आता आंतराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धा म्हंटल्यावर खेळाचे किट भारीतले असतात. त्यात रोलर स्केटिंग, सॉफ्ट टेनिस, ब्रीज, साम्बो, पेन्काक सिलाट, कुरॅश, सिपॅक टकरॉ, आणि स्पोर्ट क्लायम्बिंग असे खेळ आहेत ज्यांचा किटचा खर्चचं पेलवणारा नव्हता, त्यात याच खेळांसाठी भारतातून जवळपास ८३ आथिलेट्स आणि ३० -३१ अधिकारी जाणार होते, म्हणजे होणाऱ्या खर्चाचा विचार तुम्ही करू शकता, त्यामुळे फेडरेशनने याचा विरोध केला. .

यावर असोशिएशनने सफाई देत म्हंटल कि, आम्ही आयओएसोबत संबंधित नसलेल्या फेडरेशनला स्पर्धेत खेळायची संधी देतोय हीच मोठी गोष्ट आहे. वाद बरेच दिवस सुरु राहिला शेवटी इंडियन ऑलम्पिक असोसिएशननं  झुकत माप घेतलं आणि या पैशांची भरपाई करून देऊ असं म्हंटल. मग नंतर खेळाडू स्पर्धेसाठी रवाना झाले आणि १ गोल्ड मेडल, १ सिल्वर मेडल आणि ४ ब्रॉन्झ मेडल आपल्या नावे केलं.

दरम्यान, ऑलम्पिक नंतर आशियाई ही जगातली दुसरी मोठी आंतरराष्ट्र क्रीडा स्पर्धा ठरलीये. आतापर्यंत ९ देशांमध्ये या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं. ज्यात आशियातील सगळे ४५ देशांचा सहभाग असतो. तसं आधी ४६ देश होते पण राजकीय कारणांमुळे इस्रायलला या स्पर्धेत खेळायला बंदी घातली.  

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.