फोर्डमधल्या पहिल्या महिला इंजिनिअर ज्या टाईम मॅगझिनच्या कव्हरवर पण झळकल्या होत्या

एकदा पायवाट पडली कि त्यावरून जाणारे हजारो असतात पण भारी तेच असतात जे ती पायवाट पहिल्यांदा शोधतात. जगात रोज करोडो माणसं येतात नी जातात पण लक्षात तेच राहतात जे कळपाच्या मागं नं जाता काहीतरी वेगळा करतात. असाच एक नाव आहे दमयंती गुप्ता यांचा. त्या सर्व अडचणींना न जुमानता पदवी मिळवून फोर्ड कंपनीची पहिली महिला अभियंता बनण्यात यशस्वी ठरल्या होत्या. पण इथपर्यंत पोहचण्याचा त्यांचा प्रवास सोपा नव्हता.

पाकिस्तानमधील सिंधमधील (जे भारताचा भाग होते), स्त्री शिक्षणाला खूप महत्त्व देणाऱ्या हिंगोराणी कुटुंबात १९४२ मध्ये त्यांचा जन्म झाला. 

मात्र फाळणीच्या वेळी आपली सगळी जमीन -जायदाद सोडून त्यांचे कुटुंब भारतात  स्थलांतरित झालं. कराचीवरून मुंबईला स्तलांतरित व्हावा लागलेल्या या कुटुंबाने आपली  कुटुंबाने धनदौलत मागे सोडली असली तरी आपली ‘मूल्ये’ मात्र बरोबर आणली होती .

त्यामुळं भारतात आल्यानंतरही या कुटुंबानं आपल्या मुलींना शिकवलंच.

 दमयंती सांगतात लहान असताना त्यांच्या घरात पंडित नेहरू यांची भाषणं रेडिओवर आवर्जून लावली जात. 

अशाच एका  भाषणात नेहरू म्हणाले ““भारताला स्वातंत्र्यानंतर अभियंत्यांची गरज आहे. फक्त मुलंच नाही तर मुलीही”. नेहरूंच्या या स्पृतीदायी भाषणानं दमयंती यांना आपल्याला भविष्य कशात बनवायचं आहे याची दिशा मिळली होती.

इंजिनेअरिंगला प्रवेश घेणाऱ्या भारतातील पहिल्या महिल्यांपैकी त्या एक होत्या.

मेकॅनिकल इंजिनेरींगला ऍडमिशन घेतल्यांनंतर त्यांना अनेक अडथळ्यांना सामोरं जावं लागलं. 

त्यांच्या कॉलेजमध्ये गर्ल्स टॉयलेट हा प्रकारच नव्हता. त्यामुळं वर्षभर त्यांना  टॉयलेट वापरण्यासाठी मैलभर प्रवास करावा लागत होता. लागलं. शेवटी कॉलेज प्रशासनालाही कळून चुकलं कि ही बाई इथून पूर्ण कोर्से होईपर्यंत हटणार नाही आणि मग कॉलेज प्रशासनानं गर्ल्स टॉयलेट बनवलं. मात्र या आणि अनेक संकटाना तोंड देत दमयंती गुप्ता यांची चिकाटी वाढतच होती.

१९व्या वर्षी हेन्री फोर्ड यांचं चरित्र वाचल्यापासून दमयंती यांच्यावर फोर्डबाबांचा मोठा प्रभाव पडला होता. 

त्यामुळं मेकॅनिकल इंजिनीरिंगनंतर फोर्डमध्येच काम करण्याचा त्यांनी मनाचा निर्धार केला होता.१९६०च्या दशकात भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या लोकांची विशेषतः स्त्रियांची संख्या अगदीच नगण्य होती. पण तरीही दमयंती यांनी अमेरिकेत जाण्याचं ठरवलंच आणि त्यांच्या कुटुंबाबाने पण त्यांना पाठिंबा दिला.

 मग जानेवारी १९६७ मध्ये त्या अमेरिकेतील मोटर सिटी डेट्रॉईटला पोहोचल्या. त्यांच्याकडे बर्फाचे बूट  उबदार जाकीट , कार असं काहीच नव्हतं मात्र प्रचंड आत्मविश्वास तेवढा होता. जेव्हा मी पहिल्यांदा फोर्डसाठी अर्ज केला तेव्हा मला नाकारण्यात आले पण मी हार मानली नाही. मी काही महिन्यांनंतर पुन्हा प्रयत्न केला. 

फोर्ड महिलांना घेत नाही हे अमेरिकेने मान्य केला असताना ही बाई दोनदा अप्लाय करते हा कंपनीच्या एचआरला धक्काच  होता. 

शेवटी त्याने त्यांचा  बायोडाटा बघितला आणि म्हणाला तुम्ही इंजिनियरिंगच्या नोकरीसाठी अर्ज करत आहेस पण आमच्या इथे एकही महिला नाही. का घेत नाही? या आवेशात दमयंती एचआरला म्हणाल्या  ”मी इथे आहे. मी इथे आहे, जर तुम्ही मला संधी दिली नाही तर तुमच्या कंपनीत महिला कर्मचारी कशी असेल.” त्यांच्या या बाणेदार उत्तरानं शेवटी फोर्ड पण नमलं  आणि त्यांनी दमयंती यांना फोर्ड मोटर कंपनीत पहिल्यांदा कामावर घेतलं.

पुढे त्यांनी या कंपनीत अनेक पदे भूषवली. त्यांच्या या कामाची दखल घेत टाईम मॅगझीनना त्यांच्या कव्हर पेजवर दमयंती यांना स्थान दिलं होतं.

दमयंती, ज्या आता त्यांच्या पतीसोबत फ्लोरिडामध्ये राहतात , त्या म्हणतात , “तुम्हाला एखाद्या गोष्टीत इंटरेस्ट आढळल्यास, त्याकडे जा आणि कधीही मागे वळून पाहू नका..”.

हे ही वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.