प्यायला बसल्यावर बोलबच्चन टाकायचे असतील, तर आधी ही माहिती लोड करुन घ्यायला हवी…

पिल्यानंतर झिंगणाऱ्यांचे दोन प्रकार. एक हू म्हणून तोंडाचा पट्टा चालू करणारे आणि दुसरे आपण भलं आणि आपली दारू भली म्हणत निवांत त्यांचं ऐकणारे. पिउन इंग्लिश चालू करणारे पहिल्याच कॅटेगरीमध्ये. तर सीन असा आहे की, दुसऱ्या पेग नंतर तार लागली की कॉन्फिडन्स जातोय पार ढगात. त्यामुळं तोंडातून काहीही बाहेर पडू द्या, १०० टक्के खरं असल्याच्या तोऱ्यातच बाहेर पडतंय.

आता बोलायाला सुरवात कशी करायची किंवा आइस-ब्रेकर कसा टाकायचा ही शांत बसणाऱ्यांची नेहमीचच रडरड. राव तुम्ही खरंच लय लोड घेताय. मस्त ग्लासमध्ये आइस क्यूब टाका आणि दारु पासनंच सुरवात करा की.

बसला नसाल, तर वही पेन घ्या आणि माहिती लिहायला सुरुवात करा…  

व्हिस्की बनवतात तेव्हा ब्राऊन कलरची नसतेय पण जेव्हा एजिंगसाठी बॅरेलमध्ये भरतेत तेव्हा तिचा रंग आणि टेस्ट पण बदलतेय.

जिन आणी टॉनिक दोन्ही UV लाइटच्या खाली चमकतेत. मिल्कशेक जेव्हा सुरु झालं होतं, तेव्हा त्यात दारूच वापरायचे. काहींना मोकळे ग्लास बघायची सवयच नसते, पण असेही आहेत ज्यांची मोकळा ग्लास बघून टरकते त्याला सेनोसिलिकाफोबिया म्हणतात. असले रँडम फॅक्टस पुढचाच्या डोळ्यात डोळे टाकून फेका. बाजूच्याला पुढचा पॅक भरायला सांगू शकताय, त्यामुळं तुम्ही थांबू नका.

हां चालू व्हा! बाजूला मैत्रीण वोडका घेऊन बसलेय बघा, आता मोर्चा तिच्याकडं वळवा. कपड्याचा लई वास येत असेल तर अंगावर थोडा वोडका डियो म्हणून वापरता येतोय. जास्त करू नका नाहीतर डाग पडतेत. जगात वोडका सगळ्यात जास्त विकला जातोय आणि त्याची सुरवात रशियातल्या एका शेतकऱ्यानं केली होती. त्यात पण वोडका सुरवातीला औषध म्हणून बाजारात आणला होता.

बाजूला नुसती ८% अलोकोहोलची किंगफिशर घेऊन बसलेल्या त्या टमराळ्याला सांगा- जगातल्या सगळ्यात स्ट्रॉंग बिअरमध्ये ६७.५ %अल्कोहोल असतंय. नुसते फॅक्ट फेका अजिबात सुट्टी नाही द्यायची.

पुढं चला अजून रात्र जागवायचीय. आता अजून ज्ञान पाजळवायला कायदा आणि दारूचा कंटेंट देतो.

 जर तुमच्याकडं दारू पिण्याचं लायसन्स असेल, तर देशीचे एक-एक लिटरचे दोन खंबे एकावेळी स्वत:कडे ठेवू शकताय. इंग्लिश असेल तर एकावेळी एक डझन खंबे बाळगू शकताय.

बियर असेल तर ८५० मिलीच्या बारा बाटल्या एकावेळी जवळ ठेवू शकताय. बर हे गणित घरात साठवून ठेवायला पण तितकंच आहे. अजून उघडयावर दारू पिली हे चालतंय की नाही? यावर कायद्यात तसं स्पष्ट काही नाहीए मात्र तरीही पोलीस पकडतेत.

आता हे सगळे सांगितलेले फॅक्टस १००टक्के खरे आहेत. पण पुढच्याला १०० टक्के कॉन्फिडन्सने सांगून पटवायची जबाबदारी तुमची. एवढं सगळं लक्षात नाही राहिलं, तरी तुम्हाला जे माहितीये त्यावर बिनधास्त चालू व्हा. शेवटी मजा येणं म्हत्त्वाचंय. बाकी कोविडचे जे निर्बंध आहेत ते पाळून सेलिब्रेशन करसाल अशी अशा आहे. भावांनो आणि बहिणींनो चिअर्स!!!! 

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.