कपिल शर्माच्या शोमध्ये डिलिव्हरी बॉयला ओळखलं पण स्मृती इराणींना नाही

कल्पना करा केंद्रीय मंत्र्यांना एखाद्या कार्यक्रमात बोलवलं अन जेंव्हा ते मंत्री मोहोदया तिथं गेल्या अन त्यांना कुणी ओळखलंच नाही…किती भयंकर अपमान आहे हा. असंच घडलंय आपल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या सोबत. 

हि घटना नेमकी कालचीच आहे. ‘द कपिल शर्मा शो’ तर संपूर्ण देशभरात माहिती आहे. याच शो मध्ये स्मृती इराणी आपल्या ‘लाल सलाम’ या पुस्तकाचे प्रमोशन करण्यासाठी आलेल्या. पण झालं असं कि, त्या सेटवर पोहोचल्या पण तेथील गार्डने म्हणजेच वॉचमन ने त्यांना आतच सोडलं नाही. कारण काय तर त्यांनी स्मृती इराणी यांना ओळखलंच नाही. अन म्हणून त्या गार्ड ने त्यांना सेटवर जाण्यापासून रोखलं.

गार्डला खूप समजावलं तरी त्याने आत प्रवेश दिला नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्मृती इराणी आणि त्यांचा ड्रायव्हर आणि त्यांच्या दोन लोकांची टीम काल संध्याकाळी शोच्या शूटिंगसाठी कपिल शर्माच्या सेटवर पोहोचले होते. 

सेटच्या प्रवेशद्वारावरील सुरक्षा रक्षकांनी मात्र स्मृती इराणी यांना ओळखलंच नाही. त्यामुळे त्यांनी त्यांना आत जाऊ दिले नाही. स्मृती इराणी या त्यांना सांगत होत्या कि, त्यांना सेटवर एपिसोड शूट करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे, त्या शोची खास पाहुणी आहेत. त्यावर गार्ड म्हणाला, ‘आम्हाला कोणताही आदेश मिळालेला नाही, माफ करा मॅडम, तुम्ही आत जाऊ शकत नाही.’

 

आणखी एक म्हणजे त्याचं दरम्यान झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय कुणाचीही परवानगी न घेता कसलाही  विचार न करता आत गेला अन त्याला कुणी अडवलं देखील नव्हतं.

स्मृती इराणी या बराच वेळ गार्डला समजावण्याचा प्रयत्न करत राहिल्या, पण गार्ड काय मान्यच झाला नाही. तेवढ्यात झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय आला, तो कलाकारांसाठी फूड पॅकेट देण्यासाठी आत आला होता, गार्डने त्याला काहीही न विचारता सोडले. यावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी चांगल्याच संतापल्या.

मग काय स्मृती इराणी यांच्या जागी कुणीही असो असा वाईट अपमान कसा काय सहन करणार.. साहजिकच आहे, संतापलेल्या मंत्री स्मृती इराणी शो चे शूट न करताच परतल्या. खासकरून त्या या शोच्या माध्यमातून त्यांच्या पुस्तकाबद्दल बोलणार होत्या.

मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी प्रॉडक्शन टीम आणि कपिल शर्माला फोनही केला, पण संभाषण होऊ शकले नाही. अखेर नाराज होऊन स्मृती इराणी शूटिंग न करताच परतल्या.

 

जेंव्हा कपिल शर्मा आणि त्यांच्या प्रॉडक्शन टीमला याची माहिती मिळाली तेंव्हा सेटवर एकच गोंधळ उडाला. यानंतर प्रॉडक्शन टीमने स्मृती इराणी यांच्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न केला, पण अखेर शूटिंग रद्द करावे लागलेच. या गोंधळानंतर मोठ्या संख्येने पोलिस दल आले आणि त्यांनी कपिलच्या प्रोडक्शन टीमशी बराच वेळ चर्चा केली आणि शूट रद्द केले.

शो रद्द झाल्यामुळे प्रॉडक्शन टीमने सेटशी संबंधित लोकांना आणि प्रेक्षकांना घरी जाण्यास सांगितले.

जेंव्हा त्याला कळलं कि, आपण केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना अडवलं होतं, तेंव्हा त्या गार्ड ने घाबरून सेटवरून पळ काढला. पण हा प्रकार प्रॉडक्शन टीम आणि सर्वांना समजताच भीतीने त्या गार्डने फोन बंद केला. प्रॉडक्शन टीमला सतत प्रयत्न करूनही स्मृती इराणीला शूटिंगवर परत येण्यासाठी पटवता आले नाही.

‘लाल सलाम’ ज्या थ्रिलर पुस्तकाचे प्रमोशन करायला हा शो होणार होता ते पुस्तक लिहायला १० वर्षे लागलीत.

वेस्टलँड पब्लिशिंग कंपनीचे हे पुस्तक २९ नोव्हेंबरला मार्केटमध्ये येणार आहे. तेंव्हा तुम्ही हे पुस्त्क्कपुस्तक वाचूच शकता. मिळालेल्या माहितीनुसार, स्मृती इराणी यांनी ‘लाल सलाम’ हे थ्रिलर पुस्तक सत्य घटनेवर लिहिले आहे.

स्मृती इराणी यांचा एपिसोड शूट होऊ शकला नाही, आता स्मृती इराणी यांच्या पुस्तकाविषयी जाणून घेण्यासाठी वाचक आणि दर्शकांना अजून २९ नोव्हेंबर पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.