तिकडे इराक-कुवेत युद्ध चालू होतं त्यामुळे इकडे कोकण रेल्वे प्रकल्प अडकला होता

कोकण रेल्वे प्रकल्प….एक यशस्वी महाकाय प्रकल्प !!!

या प्रकल्पाचे शिल्पकार ई. श्रीधरन यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा यांना छेदणाऱ्या पश्चिम घाटातून भारतीय कामगारांनी घडवलेलं कोकण रेल्वे हे एक अभियांत्रिकी आश्चर्यच होतं…..जे  आश्चर्य देशात त्याआधी आणि नंतर कधीच घडलेलं नाही.

हा महाकाय प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केवळ सात वर्ष तीन महिने इतकाच कालावधी लागणं हा कोकण रेल्वेच्या शिरपेचातला आणखी एक मानाचा तुरा होता.

याच कोकण रेल्वेचे मुख्यालय नवी मुंबईतील बेलापूर भवनमध्ये आहे आणि महाराष्ट्रात रत्नागिरी आणि कर्नाटक मध्ये कारवार इथे प्रादेशिक कार्यालये आहेत. १९९० पासून सात वर्ष देशाने कोकण रेल्वे मार्गाच्या बांधकामातील कसोटीचा काळ आणि धोकादायक घटना अनुभवल्या आहेत…. या भीषण भूभागातून मार्ग आखताना कित्येक कामगारांचा मृत्यू झाला. या प्रकल्पाच्या बांधकामावेळी झालेल्या मृत्यूची बातमी आली की सगळीकडेच निराशेचं वातावरण वातावरण पसरलेलं असायचं. 

देशाच्या उभारणीमध्ये सर्वसामान्य लोकांच्या योगदानाची आठवण ठेवण्यासाठी रत्नागिरी स्थानकावरील स्मृतिस्थळ उभारण्यात आला आहे..

रत्नागिरी स्थानकावर एक स्ट्रक्चर आहे जे कोकण रेल्वे मार्ग बांधण्याचा अशक्यप्राय काम करणाऱ्या ज्या व्यक्तींना प्राण गमवावे लागले त्या हुतात्म्यांचे स्मरण करण्यासाठी हे ठिकाण निवडलं जातं.. दरवर्षी १४ ऑक्टोबरला या कामगारांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रमशक्ती स्मृतिस्थळावर फुले वाहिली जातात. तीन राज्यांमध्ये बसलेल्या ५९ स्थानकांना जोडणाऱ्या ७६० किलोमीटरच्या कोकण रेल्वेमार्गावर च्या प्रत्येक कार्यालयात, स्थानकात १४ ऑक्टोबरच्या सकाळी दोन मिनिटाचे मौन या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ पाळले जाते…

पण आणखी एक घटना या कोकण रेल्वेच्या प्रकल्पाच्या संबंधित आहे…ती घटना म्हणजे, १९९१ साली झालेलं इराक-कुवेत युद्ध. 

१९९१ साली झालेलं इराक-कुवेत युद्ध आणि कोकण रेल्वे प्रकल्प यांच्यात काही संबंध आहे का, असा प्रश्न विचारला गेला, तर त्याचं उत्तर ‘होय’ असं द्यावं लागेल….हे अनेकांना आश्चर्य वाटेल कि इराक मध्ये होणाऱ्या युद्धाचा आणि कोकण रेल्वेचा काय संबंध ??

इराणमधील १९७९ च्या इस्लामिक क्रांतीनंतर इराणशी असलेल्या संबंधांना सद्दाम हुसेनने महत्त्व दिले आणि इराणच्या नवीन सरकारला मान्यता दिली. असे असूनही इराणने सद्दामची सत्ता उलथवून तेथे इराणी क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न केला. यासोबतच इराण-इराक सीमेशी संबंधित भाग ताब्यात घेण्यात आला. यानंतर दोन्ही देशांच्या सैन्यात सीमेवर वारंवार चकमकी होत होत्या. सप्टेंबर १९८० मध्ये सद्दामने इराणसोबतचा १९७५ चा करार नाकारला. काही दिवसांनी इराकी सैन्याने इराणवर हल्ला केला. इराकने इराणी हवाई तळ आणि इतर धोरणात्मक लक्ष्यांवर जोरदार बॉम्बफेक केली. हल्ल्याच्या एका आठवड्यानंतर, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने दोन्ही बाजूंनी युद्धविराम करण्याचे आवाहन केले. संयुक्त राष्ट्राने दोन्ही देशांना शांततेने वाद सोडवण्याचे आवाहन केले. पण दोन्ही बाजूंनी युद्ध सुरूच ठेवले. पुढे या युद्धाने आखातातील इतर भागांनाही वेढले. हे युद्ध नंतर अमेरिकेच्या हस्तक्षेपानंतर २००३ मध्ये संपुष्टात आलं. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील युतीने इराकी सैन्याचा पराभव करून कुवेतला त्याच्या ताब्यातून मुक्त केले. २००३ मध्ये सद्दाम हुसेनला फाशी दिल्यानंतर आखाती युद्ध संपले…हे सगळं जाऊ द्या पण जेंव्हा १९९१ मध्ये इराकने कुवेतवर केलेल्या हल्ल्यानंतर आखाती युद्ध सुरू झाले होते. 

तेंव्हा इकडे कोकण रेल्वेचा प्रकल्प जोमाने प्रगती करत होता आणि नेमकं त्याच दरम्यान या इराक-कुवेत युद्धाला तोंड फुटलं होतं….अन त्यामुळे झालं असं कि, भारतामध्ये इंधनाचा अभूतपूर्व तुटवडा निर्माण झाला. युद्धामुळे निर्माण झालेल्या या इंधनतंगीमुळे अनेक मोठ्या प्रकल्पांचं कामकाज थांबवण्यात आलं होतं. या परिस्थितीतही कोकण रेल्वे प्रकल्प मात्र थांबला नाही, किंवा त्याच्या कामाचा वेग कमीही झाला नाही, ही असामान्य बाब होती. 

या ऐतिहासिक मोहिमेच्या अंमलबजावणीच्या टप्प्यापर्यंत पोचण्यासाठी प्रकल्पचमूने किती जोरकस तयारी केली होती, याचंही उत्कृष्ट उदाहरण या निमित्ताने दिसून आलं होतं. या प्रकल्पाच्या बांधकामासाठी कोकणपट्ट्यात शेकडो वाहनांना वर खाली प्रवास करावा लागत होता. सोयीच्या ठिकाणी त्यांना इंधन पुरवण्यासाठी आवश्यक प्रमाणात इंधनाचा साठा पेट्रोल केंद्रांमध्ये आधीच करून ठेवण्यात आला होता. 

अचानक सुरू झालेल्या युद्धाचा फटका संपूर्ण जगाला बसला, अनेक प्रकल्प ठप्प झाले, पण कोकण रेल्वेचं बांधकाम नेहमीप्रमाणे सुरू राहिलं.

भविष्याचा अंदाज बांधण्याची काही अद्भुत शक्ती कोकण रेल्वे प्रकल्पाच्या चमूकडे होती असा याचा अर्थ नाही. प्रकल्पाला आवश्यक इंधनसाठा टिकून राहील यासाठी आवश्यक प्राथमिक नियोजन व निष्ठेने केलेले कष्ट यांमुळे हे घडलं होतं. नजीकच्या इतिहासातील सर्वांत मोठ्या इंधन तुटवड्यांपैकी एक ठरलेल्या या काळातही या प्रकल्पाचं काम विनाअडथळा सुरू राहिलं, याचं कारण साध्या दूरदृष्टीमध्ये होतं….

संदर्भ : मेट्रोमॅन श्रीधरन (एम.एस अशोकन)

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.