३ रुपयाच्या तिकीटावर ३ कोटींचा व्यवसाय करणारा “अशी ही बनवाबनवी” आज बत्तीस वर्षांचा झाला.

तारिख २३ सप्टेंबर १९८८. आजच्या दिवशीच एका इतिहासाची नोंद झाली.

अनेकदा लढाया करणाऱ्या योद्धांना माहित नसतं आपण जे करतोय ते इतकं मोठ्ठं आहे की त्याची नोंद पुढे इतिहासात घेतली जाईल. काहीस असच काम “बनवाबनवी” वाल्यांनी करुन दाखवलं. आज या पिक्चरला बत्तीस वर्ष पुर्ण झाली. तरिही अज्जून ना लिंबू कलरच्या साडीचा रंग उतरला ना! सत्तर रुपये जिवंत झाले !! 

आमच्यासारख्या गरिब पोरांना तर इस्त्रायलसारखा देश तर अजून डायबेटिसच्या औषधासाठीच प्रसिद्ध असल्यासारखा वाटतो. 

धनंजय माने एकविसाव्या शतकात असता तर तो आज MPSC करत असता अस पात्र. रोज वेगवेगळ्या मेस लावून टेस्टिंग टेस्टिंग करत राहिला असता. सगळ्या कथेचा जीव होता तोच धनंजय मानेच. अशोक सराफनं हे पात्र त्याच्या अस्सल टायमिंगवर जिवंत केलं. पण त्याचा जीव तो आपला जीव. लिंबू कलरची साडी आजही प्रेयसीची उगीच आठवण आणुन देते. “हा माझा बायको” म्हणून धनंजय माने जेव्हा लक्ष्याची ओळख करुन द्यायचा तेव्हा उगीचच लिंबू कलरच्या साडीबद्दल वाईट वाटायचा. खरं समाधान तर काय हो माने !! च्या हाकेतून यायचं. 

Screen Shot 2018 09 23 at 9.48.17 AM

दूसरं पात्र जगवलं ते लक्ष्यानं. बिडीचं डोहाळ हे उभ्या महाराष्ट्रानं झोपून पाहिलेलं प्रकरण. पिक्चरमधली दोन नंबरची साडी हि परश्याचीच. नवऱ्यानं टाकलय वो ! म्हणल्यावं हंबरडा फोडणारा परश्या हा कथेचा जीव की प्राण होता. लक्ष्या नसता तर बनवाबनवी चाल्लाच नसता हे मान्य करायलाच पाहीजे.

सगळ्यात हाईट सिन असायचा तो म्हणजे, धनंजय माने इथच राहतात का ? 

त्यानंतर नंबर येतो तो आपल्या महागुरूंचा. सुधा आणि सुधारी दोन्हीकडं फडाकडी दिसणारं हे पात्र. तसे ते आजही फडाकडेच दिसतात. सुधीर हातात किल्ली फिरवत यायचां आणि सुधाची आठवण मराठीतली पहिली कॅन्सर झालेली अभिनेत्री म्हणून आजही लोकं काढतात इतकी अस्सल होती. सचिन पिळगावकर या पिक्चरचे डायरेक्टर होते. तेव्हा माहित नव्हत हे इंटरनेटच्या युगात कळलं आणि आपण या त्यांनी डायरेक्ट केलेले सगळे पिक्चर शोधून पुन्हा पुन्हा कन्फर्म करु लागलो. 

सगळ्यांच्या विस्मृतीत गेलेलं चौथ पात्र होतं शंतनुच.

शंतनु नाव फेमस झाल्यानं कित्येक पिढ्यात एक एक शंतनु पिक्चरनंतर जन्माला आला. आज शंतनु नाव असणारी पोरं पंचवीस ते तीसच्या दरम्यानच आहेत हिच शंतनु नावाची मज्जा. एक पात्र जरा डाउन पाहीजे पण परफेक्ट बसलं पाहीजे अस ते पात्र होतं. डॉक्टर असणाऱ्या शंतनू उगीच MPSC च्या गर्दित HINDU वाचणारा वाटायचा. 

शेवटचं पात्र विश्वासराव सरपोतदार. हलकटपणा देखील शुद्ध असू शकतोय हे सांगणारा पहिला माणूस. सरपोतदार हे असंख्य पेठेतल्या लोकांच प्रतिनिधित्व करायचं अस वाटून जातं.  

तर या भन्नाट “अशी हि बनवाबनवी” या पिक्चरनं इतिहास रचला. सचिन म्हणाला होता,

“हा पिक्चर सिल्वर ज्युबिली करणार पण तो चुकला. या पिक्चरने पिढ्यांची सिल्वर ज्युबिली करणार आहे. पुढच्या कित्येक पिढ्या हा पिक्चर पाहून हसत राहतील. तेव्हा प्रभात सिनेमाच्या थिएटरात ३ रुपयचं तिकीट असायचं तेव्हा या पिक्चरनं तीन कोटी मिळवले.

आत्ताच्या हिशोबानं १०० कोटींच्या पण कुठल्या कुठं जाणारा हा पिक्चर होता. पण या सर्व गोष्टीत एक महत्वाचा मुद्दा राहिला बनवाबनवी हिट करणारा खरा पडद्यामागचा हातं ? 

कोण होती ती व्यक्ती जिने खऱ्या अर्थाने बनवाबनवी हिट केला ? माहिती करुन घ्यायचं आहे तर हे वाचा की मग, 

2 Comments
  1. Amol Pawar says

    Atishay Uttam asa cinema, cinematil sarv patr aapaplya naykala utkrusht ritya nibhavtat…
    aaj hi ajramar aslela ha chitrapat prekhshak mhnun kadhi hi visarta yenar nahi.

Leave A Reply

Your email address will not be published.