माय नेम इज ‘डॉ. डेथ’ आणि मी सुखाने आत्महत्या करण्यासाठीचं मशीन शोधलंय !

साधारणतः ६ महिन्यांपूर्वीची गोष्ट.

‘डॉ. डेथ’ या टोपणनावाने प्रसिद्ध असलेले एक ऑस्ट्रेलियन डॉक्टर रातोरात लोकांच्या चर्चेचा विषय ठरले होते.  जगभरातील माध्यमांनी त्याच्या नावाची दखल घेतली होती. त्याचं नाव चर्चेत येण्यामागे होता, त्यांनी सादर केलेली एक नवीन मशीन. या डॉक्टरने एक अशी मशीन बनवली होती ज्यामुळे कुठल्याही त्रासाशिवाय एखादा व्यक्ती आत्महत्या करू शकणार होती, असा त्यांचा दावा होता.

त्या डॉक्टरचं खरं नाव डॉ.फिलीप नित्स्चे. पण ते माध्यमांमध्ये फेमस आहेत डॉ.डेथ या नावानेच. लोकांना वेदनारहित आत्महत्येची वाट दाखवणारे डॉ. डेथ.

आहेत कोण हे डॉक्टर डेथ..?

डॉ.फिलीप नित्स्चे हे ऑस्ट्रेलियन डॉक्टर आहेत जे इच्छामृत्यू संदर्भात काम करतात. त्यासाठी त्यांनी १९९७ साली एक्झिट इंटरनॅशनल नावाची स्वयंसेवी संस्था देखील स्थापन केलेली आहे. या संस्थेचे संचालक म्हणून ते काम बघतात. जगभरात इच्छामरणाला कायदेशीर मान्यता देण्यात यावी यासाठी ते या संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न करताहेत.

त्यांनी इच्छामृत्यूसंबंधी राबविलेल्या यशस्वी अभियानानंतर ऑस्ट्रेलियातील एका प्रांतात इच्छामृत्यूसंबंधीचा कायदा अस्तित्वात आला होता. त्यानंतर त्यांनी ४ लोकांना यशस्वीपणे इच्छामरण मिळवून दिलं होतं. त्यासाठी त्यांनी विकसित केलेल्या एका मशीनचा उपयोग करण्यात आला होता. या मशीनबद्दल  मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाल्यानंतर मात्र ऑस्ट्रेलियन संसदेने हा कायदा रद्दबातल ठरवला होता.

इच्छामरणासाठी नवीन मशीन विकसित

गेल्या वर्षी फिलिप यांनी एक नवीन मशीन विकसित केलंय, जिला त्यांनी  ‘सार्को’ असं नाव दिलंय. ही मशीन सुद्धा त्यांनी लोकांना वेदनारहित आत्महत्येचा (इच्छामृत्यूचा) मार्ग मोकळा करून देण्यासाठी तयार केलीये. या मशीनमध्ये एखाद्या व्यक्तीने प्रवेश करण्यापूर्वी तिची ऑनलाईन पद्धतीने मानसिक चाचणी घेतली  जाते.

मानसिक चाचणीत जर संबंधित व्यक्ती पास झाली तर तिला एक कोड देण्यात येतो, जो पुढच्या २४ तासांसाठी व्हॅलीड असतो. मशीनमध्ये प्रवेश करणाऱ्या व्यक्तीला हा कोड विचारण्यात येतो. हा कोड मशीनशी जुळला तर परत एकदा त्या व्यक्तीला खरंच इच्छामरण हवंय का, हे तपासण्यासाठी काही प्रश्न विचारले जातात.

मशीनमधल्या व्यक्तीला विचारण्यात आलेल्या प्रश्नांची जर मशीनमधील व्यक्तीने सकारात्मक उत्तरं दिली तर आतमध्ये असलेला नायट्रोजन वायू सक्रीय होतो आणि तो मशीनमधल्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी करतो. काही काळातच आतमधली व्यक्ती बेशुद्ध होते आणि थोड्या वेळाने त्या व्यक्तीचा जीव जातो.

कुठल्याही इच्छामरण हव्या असलेल्या व्यक्तीला आनंदाने मरण्यासाठी ही मशीन बनविण्यात आल्याचं डॉ. फिलीप सांगतात. या संपूर्ण प्रक्रियेला ते ‘विवेकी आत्महत्या’ असं म्हणताना आपण कधी मरायचं हे ठरवणं हा व्यक्तीचा मुलभूत अधिकार असल्याचं देखील ते सांगतात.

मोठ्या प्रमाणात वाद विवाद

डॉ. फिलीप यांनी विकसित केलेल्या या मशीनमुळे मोठ्या प्रमाणात वाद-विवाद देखील झाले होते. हिटलरच्या छळछावणीत गॅस चेंबरमध्ये केल्या गेलेल्या लाखो ज्यूंच्या हत्येमुळे मृत्यूसाठी गॅसचा वापर करण्यासंबंधी जगभरात एक नकारात्मकता आहे आणि त्यामुळेच अनेकजण या मशीला गॅस चेंबरचं ग्लोरिफाइड व्हर्जन मानतात.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.